शब्दकोडे ३२

किशोर देवधर
सोमवार, 31 मे 2021

शब्दकोडे ३२

आडवे शब्द : 
१.     जवळचा रस्ता असताना लांबच्या मार्गाने जाण्याचा प्रकार, उलटा घास घेणे, 
६.     लवण, खारट पदार्थ, 
७.     छपरावरच्या पाण्याची धार जेथून पडते ती जागा, 
८.     क्वचित, साधारणपणे, 
११.     दात पडलेला, 
१२.     भव्य, महाकाय, 
१४.     दोन डोंगरांमधील खोल जागा, 
१५.     काटेरी वनस्पती, 
१६.     चेहऱ्याची ठेवण किंवा त्यावरील हावभाव, 
१८.     प्रचंड, खूप मोठा, 
१९.     दृष्ट लागू नये म्हणून लहान मुलांच्या गळ्यात घालतात ती माळ, 
२०.     ही दुःखे सरल्यावरच सुख येणार, 
२१.     माहितगार, जाणकार, 
२२.     बैलावर नियंत्रण ठेवणारी दोरी, 
२४.     मोराच्या पिसांची उंच टोपी घालून सकाळी गाणी म्हणत भिक्षा मागणारा, 
२५.     बिळे पाडणारा उंदरासारखा पण मोठ्या आकाराचा प्राणी, 
२७.     डोक्याच्या केसातील ऊचे पिल्लू, 
२८.     तबल्याचा जोडीदार,
२९.     मृदंगाच्या तोंडाभोवतालचे कातडी कडे

उभे शब्द : 
१.     कोल्ह्याला आंबट असलेल्या फळाचा निचरून काढलेला द्राव, 
२.     ताटातूट, वियोगाचे दु:ख, 
३.    पूर्व दिशा, 
४.     अवजड वस्तू उचलण्याचे यंत्र, क्रेन, 
५.     झाडाची बारीक मुळे, 
७.     दगड फोडण्याचे काम करणारा, 
९.     गोड सारण घातलेली पुरी, 
१०.     सनई, चौघडा यांचा संच, 
१३.     गेंड्याच्या कातडीचा, निर्ढावलेला, 
१४.     खलाशी, तांडेल, 
१५.     निष्पाप, 
१७.     फुटून वेगळे राज्य स्थापन करणे, वेगळी चूल मांडणे, 
२१.     ही कोळशाची करायला गेल्यावर हात काळे होणारच, 
२२.     काठीच्या दोन्ही टोकांना पारडी बांधून केलेले अवजड वस्तू वाहून नेण्याचे साधन, 
२३.     मैनेचा सखा, पोपट, 
२६.     पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर

संबंधित बातम्या