शब्दकोडे ३९

किशोर देवधर
सोमवार, 26 जुलै 2021

शब्दकोडे ३९

आडवे शब्द : 
१.     जमिनीची नोंद असलेला सरकारी उतारा, 
४.     वेळूची मुरली, 
६.     फळझाडांना येणारी फुले, 
७.     अस्तित्वाची खोटी जाणीव किंवा प्राचीन संस्कृत नाटककार, 
८.     घरातले प्रश्न या चौकात आणून सोडवू नयेत, 
९.     महिला, स्त्री, 
११.     खंडोबाला अर्पण केलेली मुलगी, 
१२.     अस्वस्थपणे काहीतरी हालचाली     करण्याची सवय, 
१३.     बाहेर जाण्याचा मार्ग, 
१५.     चिटोरा, कागदाचा तुकडा, 
१७.     कारस्थान किंवा घोड्याला दिलेले हिसके, 
१८.     ओढा, मोरी, 
१९.     लेखी डावपेचाने गळा कापणारा, 
२२.     कलिंगड, 
२४.     लांब व अरुंद खड्डा, 
२५.     मुलायम, मऊ, 
२७.     घाऊक खरेदी विक्री किंवा चोप, 
२९.     पैसा किंवा बांगलादेशचे चलन, 
३१.     क्रौंच, चक्रवाक पक्षी, 
३३.     स्त्रियांचा नाकातील एक दागिना, 
३५.     भरून आलेले आकाश, ढगाळ हवामान, 
३६.     कटोरा, मोठी वाटी

उभे शब्द : 
१.     गोड बोलून, समजावून पटवण्याचा मार्ग, 
२.     युद्धातील समेट, 
३.     पायऱ्‍या असलेली मोठी विहीर,
४.     गावाच्या सीमेवरील कमान, 
५.     जलाशयाकाठी उगवणारी वनस्पती, गवत, 
७.     लोहाराच्या भट्टीत हवा भरण्याची किंवा बाण ठेवण्याची चामडी पिशवी, 
८.     अफूपासून तयार केलेला अमली पदार्थ,
१०.     ज्याला खरकट्याचा स्पर्श नाही असे किंवा अशा प्रकारच्या भांड्यात पदार्थ करपत नाही, 
११.     कामगारांवर देखरेख ठेवणारा, 
१४.    बापापेक्षा श्रेष्ठ, वरचढ असलेला मुलगा, 
१५.     सजावटीचे चंदेरी तंतू, 
१६.     दौतीत बुडवून लिहिण्याची लेखणी, 
१७.     बांगड्यांचा दुकानदार,
१८.     स्त्री, बाई, 
२०.     वशिला, संधान, 
२१.     अन्नात आलेले मातीचे, रेतीचे सूक्ष्म कण, 
२२.     बग्गी, घोडागाडी, 
२३.     संगीताची मैफल, 
२६.     एक सुवासिक वनस्पती, 
२८.     स्त्रियांचा दंडात घालण्याचा अलंकार, 
३०.     वेळेचा भाग किंवा साक्षात मृत्यू, 
३२.     गाई म्हशीचे आंचळ, 
३४.     पहिलवान, कुस्तीगीर 
 

संबंधित बातम्या