शब्दकोडे ४७

किशोर देवधर
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

शब्दकोडे ४७
 

आडवे शब्द : 

१.     हे फूल कितीही लपवले तरी त्याचा सुगंध लपत नाही, 
५.     या घरात एकावेळी एकच तलवार राहाते, 
७.     येरझाऱ्‍या, त्रास, 
१०.     कपाळभर लावलेले मोठे कुंकू, 
११.     प्रशंसा, कौतुक, 
१३.     गरज, आवश्यकता, 
१५.     पलिता, काठीला चिंधी गुंडाळून केलेली मोठी दिवटी, 
१६.     पारितोषिक, बक्षीस, 
१८.     यशस्विता, भाग्य, 
१९. सजावटीचा तक्ता, 
२१.     मोठा जरीचा पदर, 
२२.     डोळ्यांची उघडझाप न करता पाहण्याचा प्रकार किंवा रायगड किल्ल्यावरील एक टोक, 
२३.     ही नव्याची नऊ दिवस टिकते, 
२५.     वाळलेल्या जखमेवरील पापुद्रा, 
२६.     भव्य, प्रचंड, 
२७.     हा कलश पापाचा असेल तर कधी ना कधी भरतोच, 
२८.     गाठोडे, 
२९.     अनेक बिऱ्‍हाडे असलेली खुराड्यासारखी इमारत किंवा पैंजण
उभे शब्द : 
१.     युक्ती, चातुर्य, 
२.     शेतात प्रथमच आलेल्या पिकाचा दिलेला थोडा नमुना, 
३.     अत्तराचा बोळा, 
४.     सुंदर घरटे विणणारा एक पक्षी, 
६.     या प्रारंभाला घडाभर तेल लागते, 
८.     पत्र पूर्ण झाल्यानंतर शेवटी लिहिलेला महत्त्वाचा मजकूर, 
९.     पिकदाणी, थुंकण्याचे पात्र, 
१२.     खोटी प्रौढी, बढाई, 
१३.     यामिनी, रात्र, 
१४.     तुफान वेगाचे एक विशेषण, 
१५.     जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्‍या वाऱ्‍याचा प्रकार, 
१६.     कर्नाटकातील एका गावात तयार होणाऱ्‍या लुगड्याचा एक लोकप्रिय प्रकार, 
१७.     दुसऱ्‍याच्या मनातील अचूक ओळखणारा, 
२०.     प्रयत्न, धडपड, 
२३.     या मगरीचे अश्रू म्हणजे खोटे दुःख, 
२४.     प्रलोभन, आमिष, 
२५.     मोरी साफ करण्याचा काटक्यांचा झाडू, 
२७.     डोंगरातील खोलगट जागा
                        ००००००

संबंधित बातम्या