शब्‍दकोडे 23

किशोर देवधर
गुरुवार, 25 मार्च 2021

शब्दकोडे

उभे शब्द 

१. राहुट्या, तंबू वगैरे ठेवण्याची जागा, 
२. शुभ्र चंद्रप्रकाश, 
३. कार्तिकस्वामी, 
४. ओंकार, 
५. रक्त शोषणारा कीटक, 
१०. नाश, उतरती कळा, 
११. झाडाचे खोड, 
१२. सारासार विचार, 
१४. घराच्या पायात भरण्याचे दगड, 
१६. खट्याळ, खेळकर किंवा आतल्या गाठीचा, 
१८. अव्यवस्थित, वेष असा असला तरी अंतरी नाना कळा असाव्यात, 
२१. वर्षाव, सढळहस्ते दिलेल्या देणग्या, 
२२.भाजीपाल्याचे शेत, वावर, 
२३. अहंकारी, स्वत्त्व जपणारा, 
२४. पाठवणूक, रवानगी, 
२६. बाष्प, हे तोंडाचे दवडू नये, 
२७. जाड, कडक आवरण, 
२९. मुरगळ, चमक, 
३०. केळीचे संपूर्ण पान, 
३२. वितुष्ट, वाकडे, 
३३. आलाप, लकेर, 
३४. अंकुर, कोंब

आडवे शब्द 

१. ग्रहांच्या परिस्थितीचा मनुष्याच्या स्थितीवर काय परिणाम होईल हे सांगणारा सिद्धांत ज्यात असतो ते शास्त्र, 
४. सोसाट्याचा वारा, 
६. दाक्षायणी किंवा दक्षिणेकडचा वारा, 
७. वरच्या मजल्यावरची पडवी, बाल्कनी, 
८. या घरात एकावेळी एकच तलवार राहाते, 
९. गुऱ्हाळातील उसाचा रस निववण्यासाठी ज्यात ओततात ती खाच, 
१३. अडचण किंवा गरज, 
१५. यज्ञाच्या होमात जाळण्याची लाकडे, 
१७. विड्याच्या पानाची लता, 
१९. अपुरा किंवा न वाजणारा, 
२०. वक्रता किंवा शाळेतील, बागेतील आसन, 
२१. या झाडापासून विड्याच्या पानात घालण्याचा कात तयार करतात, 
२२. पडक्या घराचे सामान, 
२४. पुसण्याचे फडके, 
२५. शेंडीभोवतालचे केसांचे वर्तुळ, 
२६. खस किंवा लहान मुलांच्या पायातील अलंकार, 
२८. व्यसनाची हुक्की, 
३१. नववधूने वटपौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणास दिलेले दान, 
३३. तोलण्याचे साधन, तराजू, 
३५. उत्तरोत्तर भरभराटीचे दिवस

संबंधित बातम्या