शब्दकोडे ३०

किशाेर देवधर
सोमवार, 17 मे 2021

शब्दकोडे ३०

आडवे शब्द : 
१.     जाणण्यास सोपे, सुलभ, 
३.     कैरीचे सरबत, 
६.     चघळणे, सावकाश चावून खाणे, 
७.     रामेश्वराच्या दक्षिणेला असलेले तीर्थस्थान जेथे समुद्रस्नान करणे पुण्यकारक मानतात, 
८.     माळेतील मधला लोंबता मणी, 
९.     सुळका, डोंगराचे टोक, 
११.     काळोख, अंधार, 
१३.     काही वेळानंतर, 
१६.     पाऊल किंवा अधिकाराची जागा, 
१८.     गुलामगिरी, 
१९.     शाई, व्यंकटेश स्तोत्रातील शब्द, 
२०.     झाडाची अंतर्साल, वनवासात जाताना रामाने याची वस्त्रे परिधान केली होती, 
२१.     स्त्रियांचा गळ्यातील एक अलंकार, 
२३.     आधार देणारा महत्त्वाचा भाग, 
२४.     घोडे जुंपलेले वाहन चालवण्याचे काम, कृष्णाने महाभारतात केले तसे, 
२८.     भूलोक आणि यमलोक या दरम्यानची आग ओकणारी नदी, 
२९.     कायद्यातील उपभाग, 
३२.     निष्ठावंत उपासक, 
३३.     तेल काढण्याचे यंत्र, 
३४.     पोते, मोठी पिशवी
उभे शब्द : 
१.     स्वास्थ्य, समाधान याला आसुसलेला, 
२.     हिरव्या रंगाचे रत्न, पाचू, 
३.     तुकडी, विभाग, 
४.    एका विशिष्ट जिवाणूमुळे होणारा एक विकार ज्यामुळे शरीर वाकडे होते, 
५.     रंगीबेरंगी चकचकीत कागदाचा एक प्रकार, 
१०.     जबरी चोरी, दरोडा, 
१२.     मादक तरुणी, 
१४.    कलंक, डाग, 
१५.     ललना, सुंदर स्त्री, 
१७.     एक सुगंधी वनस्पती, 
२१.     सत्यांश, खरेपणा, 
२२.     एकाहत्तर चतुर्युगाचा काळ, जो ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या चौदाव्या भागाएवढा असतो किंवा दुर्भिक्ष, 
२३.     ताकाला बेसन लावून केलेले कालवण, 
२५.     पूर्वीचे साधारणपणे अर्ध्या शेराइतके एक वजन, 
२६.     आपात्कालीन स्थिती, अनुशासन पर्व, 
२७.     विहिरीतून पाणी काढण्याचे बैल जुंपलेले साधन, 
२९.     परिपक्व, प्रौढ, 
३०.    एक वाद्य किंवा आवाज मोठा येण्यासाठी हा पूर्वीच्या ग्रामोफोनला लावायचे, 
३१.     केतू स्वामी असलेले दहावे नक्षत्र

संबंधित बातम्या