स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे
गुरुवार, 15 मार्च 2018

करंट अफेअर्स

राष्ट्रीय
आयएनएस गरुड

 • भारतीय नौदलाच्या एकात्मिक स्वयंचलित हवाई वातावरण प्रणाली (IAAMS)चे केरळ राज्यातील कोची येथील नौदलाच्या विमानतळावर उद्घाटन
 • या स्वयंचलित प्रणालीने सुसज्ज होणारे नौदलाचे कोची येथील ‘आयएनएस गरुड’ हे चौथे विमानतळ आहे.
 • देशभरातील नौदलाची सर्व ९ विमानतळे हवामानाचा अंदाज देण्याच्या दृष्टीने अधिक कार्यक्षम व्हावीत यासाठी नौदलाने हाती घेतलेला हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
 • सदर प्रणाली हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी सातत्याने आणि स्वयंचलित तंत्राने वातावरणाचे निरीक्षण करत असते.
 • विमानांच्या उड्डाणाच्या दृष्टीने हवामान प्रतिकूल असल्यास ही यंत्रणा कामावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देते.
 • कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ही प्रणाली जागतिक हवामान संस्थेच्या (WMO) नुसार हवामान वर्तविण्याचे काम करते.

आंतरराष्ट्रीय
भारत-पॅलेस्टाइन करार

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅलेस्टाईन दौऱ्यामध्ये भारत आणि पॅलेस्टाईनमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले.
 • पॅलेस्टाईनची राजधानी रामल्लाह या ठिकाणी पंतप्रधान 
 • नरेंद्र मोदी आणि पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी दोन्ही देशातील महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून या करारांमुळे दोन्ही देशातील संबंधांना बळकटी येणार आहे.
 • पॅलेस्टाईनमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालयांची निर्मिती करणे,महिला सबलीकरण केंद्रांची निर्मिती करणे,नवीन राष्ट्रीय छापखाना निर्माण करणे, नवीन शाळांची निर्मिती करणे  या विषयांमध्ये भारत पुढाकार घेत असून या बाबींच्या निर्मितीसाठी चालना देण्यासाठी भारत व पॅलेस्टाईनमध्ये हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
 • पॅलेस्टाईनला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असून त्यांनी पॅलेस्टाईनच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक द्विपक्षीय करांरानाही यावेळी मान्यता दिली आहे.

मालदीवमध्ये आणीबाणी 

 • देशातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात १५ दिवसांची आणीबाणी घोषित केली असून नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले आहेत.
 • गेल्या महिन्यात मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मार्गाने निवडून आलेले राष्ट्राचे पहिले राष्ट्राध्यक्ष महम्मद नाशीद यांच्यासह सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.
 • आणीबाणी घोषित झाल्यानंतर तेथील लष्करास अमर्याद अधिकार प्राप्त झाले असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आली हमीद व न्यायविभागाचे प्रशासक यांनाही अटक करण्यात आली आहे.
 • मालदीवमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत नागरिकांनी त्या देशात जाऊ नये असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
 • यामीन यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी २०१५ मध्ये आपल्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या आरोपाखाली त्यांनी आणीबाणी लागू केली होती.

चीनचे `J-20' लढाऊ विमान

 • चीनने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे चौथ्या श्रेणीतील सुदक्ष (stealth) `J-२०' लढाऊ विमान आपल्या हवाई दलाच्या सेवेत आणले आहे.
 • अशा प्रकारचे स्वदेशी बनावटीचे सुदक्ष विमान वापरणारा चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा देश ठरणार आहे.
 • सर्व हवामानात अनुकूल असणारे चीनचे हे एक आसनी लढाऊ विमान मध्यम आणि लांबच्या पल्ल्यासाठी वापरात येणार आहे.
 • हे विमान चीनमधील चेंगडू एअरोस्पेस कॉर्पोरेशनने विकसित केले असून २०११ मध्ये त्याची पहिली तांत्रिक उड्डाण चाचणी घेण्यात आली होती.
 • सध्या या विमानास रशियन बनावटीचे ‘Saturn AL-31’ हे इंजिन लावण्यात आले असून लवकरच त्याजागी स्वदेशी बनावटीचे चीनी तैहांग इंजिन जोडण्यात येणार आहे.
 • लांबवरच्या मोहिमा पार पडण्याच्या दृष्टिकोनातून विमानाच्या इंधनासाठी मोठी टाकी ठेवण्यात आली आहे.
 • विमानात हवेतून हवेत लांब पल्ल्याचा हल्ला करण्यासाठी दोन मोठी आणि हवेतून हवेत कमी पल्ल्याचा हल्ला करण्यासाठी दोन्ही बाजूंनां `अस्त्रद्वारं' उपलब्ध आहेत.

अर्थसंकल्प  (भाग  २)
    यावर्षीच्या अर्थसंकल्पात सक्षमीकरणाच्या दृष्टीने विशेष भर देण्यात आलेली क्षेत्रे : १. कृषी, २. शिक्षण, ३. आरोग्यसुविधा ४. पायाभूत सुविधा

शिक्षण

 • एकलव्य शाळा : पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक अधिसूचित जमातीची लोकसंख्या आणि किमान २० हजार आदिवासी लोक राहत असणाऱ्या प्रत्येक भागात केंद्रीय बोर्डाची एक सरकारी शाळा
 • दीक्षा : ‘black बोर्ड टू डिजिटल बोर्ड‘ असे उद्दिष्ट घेऊन तयार केलेले डिजिटल पोर्ट
 • शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एकात्मिक बी. एड. कार्यक्रम
 • वडोदरा येथे रेल्वे विद्यापीठ आणि देशात  स्थापत्यश्‍स्त्राच्या शिक्षणसंस्था
 • प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती योजना (PMRF) : देशातून  गुणवंत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना IIT आणि IISC येथे संशोधन (Ph.D.) करण्याची संधी.

आरोग्यसुविधा

 • आयुष्यमान भारत : उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपायांसाठी जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना आहे 
 • अत्यावश्‍यक औषधे व चिकित्सासुविधा पुरविणारी १.५ लाख ‘आरोग्यकेंद्रे’ 
 • १० कोटी गरीब कुटुंबांसाठी आरोग्यविमा  देणारी ‘राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना‘
 • जगातील सर्वाधिक क्षयरोगग्रस्त ही ओळख पुसून टाकण्यासाठी क्षयरोगींच्या निरोगी पोषणासाठी  कोटींच्या निधीची तरतूद.
 • जिल्हास्तरीय रुग्णालयांच्या विकासानातून त्यांना जोडून  नवी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये.
 • गोबर्धन (Gobar-Dhan): शेण व इतर मलापासून सेंद्रिय खते, बायोगॅस, बायोसीएनजी यांच्या निर्मितीसाठी सरकारी निधी.

पायाभूत सुविधा

 • आदर्श जिल्हा: देशातील निवडक जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांची चोख अंमलबजावणी.
 • ईशान्य भारतातील अरुणाचलप्रदेशचा कामेंग व तवांग जिल्हा यांना जोडणाऱ्या ‘सेला’ खिंडीत दळणवळणासाठी बोगदा.
 • मुंबई आणि बंगळूरू येथे शहरी रेल्वे विकासाला प्राधान्य.
 • सुरक्षेला प्राधान्य देत धुक्‍याची सूचना देणारी यंत्रणा तसेच स्थानकांवर वायफाय आणि स्वयंचलित सोपान रेल्वेसाठी.
 • उडान अंतर्गत ५४ विमानतळे जोडली जाणार व हवाई वाहतूक ५ पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी तब्बल ९०० विमानांची खरेदी.
 • भूकंप आणि पुरापासून सुरक्षित विमानतळासाठी विशेष निधी.
 • हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारप्रणीत कंपनीस ONGC विकत घेणार.
 • सरकारप्रणीत  विमासंस्थांचे (NIC, UIA, OII) एकमेकांत विलीनीकरण करून एकच संस्था.
 • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी तिप्पट वेतनवाढ.
 • ‘आरोग्य आणि शिक्षण उपकार’ असे नवे नाव देऊन शिक्षण उपकरात वाढ (३ टक्‍क्‍यांवरून ४ टक्के)
 • कॉर्पोरेट करात घट (३० टक्केवरून २५ 
 • टक्के ) (२५० कोटीपर्यंतची उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठी लागू) 

फोटो फीचर

संबंधित बातम्या