स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
शुक्रवार, 18 मे 2018

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी या संस्थेस माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा सल्ला विधी आयोगाने दिला आहे.
 • बीसीसीआय ही संस्था खासगी प्रकारात मोडत असल्याने आजवर या संस्थेस माहिती अधिकार कायद्यातून  वगळण्यात आले होते.
 • परंतु सद्यःस्थितीत बीसीसीआय ही क्रिकेट जगतातील सर्वाधिक श्रीमंत संस्था ठरली असल्याने आगामी काळातील भ्रष्टाचार रोखून पारदर्शकता वाढीस लागावी यासाठी हा बदल सुचविण्यात आला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने संबंधित अहवाल व शिफारस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे पाठवली आहे.
 • बीसीसीआयला एका राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा दर्जा देण्यात यावा, तसेच संघटना अधिक लोकाभिमुख व्हावी/ असेही आयोगाने या अहवालात सुचवले आहे.

रीथु बंधू योजना

 • शेतकऱ्यांच्या रोजगारासाठी तेलंगणा सरकारने ‘रीथु बंधू’ (शेतकारीमित्र) गुंतवणूक साहाय्य योजना सुरू केली असून अशा प्रकारची योजना भारतात प्रथमच सुरू होत आहे.
 • या योजनेअंतर्गत आपल्या शेतीतील उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास वर्षातून दोन वेळा राज्य सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळणार आहे.
 • योजनेप्रमाणे शेतकऱ्यास दरवर्षी दर एकरी रु. ८ हजार (४ हजार खरिपात आणि ४ हजार रब्बीमध्ये)प्रमाणे गुंतवणूक साहाय्य मिळणार आहे. 
 • सुमारे १.४२ कोटी एकर जमीन नांगरणाऱ्या तेलंगणा राज्यातील ५८ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
 • या योजनेसाठी राज्याच्या २०१८-१९च्या अर्थसंकल्पात १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

विज्ञान-तंत्रज्ञान
नासाची मंगळमोहीम

 • भविष्यात मंगळावर माणूस पाठविता यावा यासाठी तेथील वातावरणाचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने नासाने ५ मे रोजी ‘इनसाइट’ नावाचे यान सोडले आहे.
 • कॅलिफोर्नियातील व्हेन्डेनबर्ग हवाईदल तळावरून ‘ॲटलास- ५’ या अग्निबाणाच्या साहाय्याने इनसाईटचे प्रक्षेपण करण्यात आले.
 • हे यान २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरणे अपेक्षित असून त्यानंतर भूकंपमापीने मंगळावरील भूकंपाचा अभ्यास सुरू होईल.
 • स्वयंचलित उपकरणांद्वारे १० ते १६ फूट खोल खणून आतील भूभागाचे परीक्षण केले जाणार आहे.
 • या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने तब्बल  डॉलर्सचा खर्च केला आहे.
 • यापूर्वी २०१२ मध्ये ‘क्‍युरिओसिटी रोव्हर’ हे नासाने मंगळावर पाठवलेले पहिले यान होते.

बंगबंधू - बांगलादेशी उपग्रह

 • अकरा मे रोजी बांगलादेशाचा पहिला संदेशवहन उपग्रह ‘बंगबंधू-१’ स्पेस एक्‍सच्या फॉल्कन -९  या प्रक्षेपकाद्वारे केनेडी अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला.
 • या उपग्रहाची बांधणी ‘थेल्स आलेनिया 
 • स्पेस’ या फ्रेंच-इटालियन कंपनीने केली असून उपग्रहाचे नामकरण बांगलादेशाचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबर रेहमान यांच्यावरून ठेवण्यात आले आहे.
 • हा उपग्रह बांगलादेशास इंटरनेट, दूरध्वनी, रेडिओ आणि तत्सम संदेशवहन सेवा आगामी 
 • १५  वर्षांसाठी पुरवणार असून उपग्रहांमुळे दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रात बांगलादेश स्वायत्त होणार आहे.

चिकनगुनियावरील औषधाचा मार्ग मोकळा

 • सध्या कोणतेही औषध अथवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसलेल्या चिकनगुनियावर उपचारासाठी आयआयटी रुरकी येथील संशोधकांनी ‘Pep-१’ आणि ‘Pep-२’ या दोन रेणूंचे संशोधन केले आहे.
 • या दोन रेणूंची विषाणूप्रतिकारक क्षमता अत्याधिक असल्याने ते अतिशय लहान प्रमाणातही ९९ टक्के परिणाम करू शकतात.
 • संशोधनादरम्यान थेट विषाणूंचे कृत्रिम रसायन वापरण्यात आले होते. तरीही या रेणूंचा परिणाम अधिक दिसून आल्याने भविष्यात यांचा उपचारात्मक अथवा प्रतिबंधात्मक वापर केला जाऊ शकतो.
 • चिकनगुनियाचा विषाणू हा एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्‍टस या डासांच्या माध्यमातून प्रसारित होतो.

आंतरराष्ट्रीय
‘फ्लिपकार्ट’मध्ये वॉलमार्ट

 • भारताच्या इ.-व्यापार क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लिपकार्टमधील ७७ टक्के समभाग वॉलमार्ट या अमेरिकी कंपनीने १६ अब्ज (सुमारे १ लाख कोटी रुपये) डॉलर्सना विकत घेतला आहे.
 • वॉलमार्ट ही जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओळखली जात असून या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डग मकमिलन स्वतः भारतात आले होते.
 • याखेरीज वॉलमार्ट आणखी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये करणार आहे. 
 • काही वर्षांपूर्वी अमेझॉनमध्ये काम करणाऱ्या सचिन आणि बिन्नी बन्सल यांच्या कल्पनेतून फ्लिपकार्ट कंपनी उभी राहिली होती.
 • फ्लिपकार्टमध्ये समभाग घेण्यासाठी वॉलमार्टच्या स्पर्धेत अमेझॉन कंपनीही उतरली होती.

पर्यावरण
नासाचा कार्बन प्रकल्प बंद

 • ट्रंप प्रशासनाने अमेरिकेच्या अंतराळ संशोधन कंपनी नासाचा ‘कार्बन देखरेख प्रणाली’ (CMS) कार्यक्रम बंद केला असून त्यासाठी निधी कमी पडत असल्याचे कारण दिले आहेत.
 • अर्थसंकल्पावर येणाऱ्या ताणाबरोबरच या पर्यावरणीय प्रकल्पापेक्षा विज्ञान प्रकल्पाला (मंगळयान इनसाइट) प्राधान्य देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
 • दरवर्षी १० अब्ज डॉलर्स निधीची गरज असणारी ही प्रणाली जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असणाऱ्या कार्बन आणि मिथेन या मुख्य हरितगृह वायूंच्या वातावरणातील प्रमाणावर सतत लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आली होती.
 • कार्बनचे उगम स्रोत आणि विसर्जन स्थाने शोधून काढून संपूर्ण पृथ्वीच्या कार्बन प्रवाहाची प्रतिकृती करण्याचे कामही या प्रणालीद्वारे केले जात होते.
 • अंतराळातील आणि पृथ्वीतलावरील माहिती गोळा करून कार्बनच्या वैश्विक आणि उत्तम दर्जाच्या स्थानिक पातळीची माहिती या प्रणालीतून मिळत होती.

पूर्वपरीक्षेच्या निमित्ताने...
भारतीय वाद्यांना जीएसटीतून मुक्तता

 • एकविसाव्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत भारतीय पारंपरिक सांगीतिक वाद्यांना अप्रत्यक्ष करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • या संगीत उपकरणांचा अभ्यास जोपासण्यासाठी त्यांना या करातून सूट देण्यात आली आहे.
 • हार्मोनिअम, सतार, सरोद, तानपुरा, तबला, पुंगी अशा हातांनी बनवल्या जाणाऱ्या १३४ भारतीय पारंपरिक वाद्यांचा यात समावेश आहे.

उडान (UDAN) योजनेचा प्रारंभ

 • UDAN -  ‘उडे देश का आम नागरिक’ 
 • सामान्य नागरिकाच्या आवाक्‍यातील विमानप्रवास आणि विमानतळांची सुधारणा ही योजनेची उद्दिष्टे
 • पाचशे किलोमीटर अंतरातील १ तासाच्या प्रवासासाठी रु. २५०० भाडे
 • योजनेच्या प्राथमिक टप्प्यात ४३ शहरांची आणि ५ विमान 
 • कंपन्यांची निवड

म्यानमारला ‘सासेक’चे सभासदत्व

 • SASEC : South Asia Sub regional Economic Cooperation दक्षिण आशियायी देशांनी परस्पर व्यापारी संबंध घट्ट करून प्रादेशिक आर्थिक समृद्धी साधण्याच्या दृष्टिकोनातून २००१ मध्ये उभारण्यात आलेला  प्रकल्प.
 • दक्षिण आशिया उप-प्रदेश आर्थिक सहकार्यातील म्यानमार हे सातवे सभासद राष्ट्र ठरले.
 • इतर ६ राष्ट्रे - भारत, भूतान, मालदीव, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश

भारतातील पहिले खासगी रेल्वे स्थानक

 • मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथील हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी तेथील बन्सल समूहासोबत ८ वर्षांचा करार करण्यात आला आहे. 
 • या स्थानकाचा विकास पीपीपी (Public Private Partnership) तत्वावर करण्यात येणार असून विश्रांतिगृह, वाहनतळ, उपाहारगृह, दुकाने यांची जबाबदारी बन्सल समूहाकडे तर रेल्वे, पार्सलसेवा, प्रवासी तिकीट हे रेल्वे खात्याकडेच राहील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या