स्पर्धा परिक्षांचा गेटवे
गुरुवार, 7 जून 2018
करंट अफेअर्स
राष्ट्रीय
नागपूरच्या विकासासाठी युरोपीय संघ
- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महापालिका आणि युरोपीय संघ (EU) यांच्यात इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन (IUC) कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला आहे.
- नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या विकासातील सहकार्य क्षेत्र यांची ओळख आणि विस्तार यासाठी हा करार करण्यात आला आहे.
- नागपूर आणि कार्लस्रू हे शाश्वत नागरी विकासाची स्थानिक कृती योजना संयुक्तपणे तयार करणार आहेत.
देशभर ई-वे बिल प्रणाली अनिवार्य
- एक एप्रिलपासून केंद्र सरकारने देशात आंतरराज्य मालवाहतुकीसाठी लागू केलेली ई-वे बिल प्रणाली आता ३ जूनपासून सर्व राज्यांत अनिवार्य करण्यात येणार आहे.
- पन्नास हजार किंवा त्याहून अधिक किमतीच्या मालाची ने-आण दोन किंवा अधिक राज्यांमधून होणार असल्यास ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
- या प्रणालीनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना व्यावसायिकास इंटरनेट माध्यमातून वस्तू व सेवा कर भरावा लागणार असून त्याची पावती सादर केल्याशिवाय त्या राज्यात प्रवेश मिळणार नाही.
- कर संकलन सुलभरीत्या व्हावे तसेच करचुकवेगिरीस आळा बसावा यासाठीच या प्रणालीची निर्मिती करण्यात आली असून सध्या ती राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत लागू झाली आहे.
दिल्ली-मेरठ महामार्ग
- दिल्ली-मेरठ महामार्गाचे २७ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले असून १३५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग देशातील पहिला स्मार्ट आणि हरित महामार्ग ठरणार आहे.
- ‘ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे’ या अधिकृत नावाने ओळखला जाणारा हा मार्ग ११ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे.
- सद्यःस्थितीत उद्घाटन करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याची लांबी ९ किलोमीटर असून तो १४ पदरी रस्ता आहे.
- दिल्लीच्या निजामुद्दीन पुलापासून उत्तरप्रदेशच्या सीमेपर्यंतचा मार्ग तयार झाला असून उर्वरित ९६ किलोमीटरचा मार्ग २०१९-२० पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
भारतातील आरोग्यसेवा कमकुवत
- आरोग्यसेवेची उपलब्धता आणि आरोग्यसेवेचा दर्जा या निकषांवरून ‘लॅंसेट’ या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार १९५ देशांच्या यादीत भारताचा १४५ वा क्रमांक लागतो.
- या सर्वेक्षणात चीनसह (४८) बांगलादेश (१३३), भूतान (१३४), श्रीलंका (७१) यांसारख्या लहान शेजारी राष्ट्रांनीही भारतास मागे टाकले असून पाकिस्तान (१५४), नेपाळ (१४९) आणि अफगाणिस्तान (१९१) पिछाडीवर आहेत.
- यामध्ये आईसलॅंड, नॉर्वे, नेदरलॅंड्स आणि लक्झेम्बर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकावर असून ऑस्ट्रेलिया व फिनलंडला संयुक्तपणे पाचवे स्थान मिळाले आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान
सर्वांत लहान रोबोचा शोध
- भारतीय मूळ असलेल्या अमेरिकास्थित संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या समूहाने अतिशय लहान अशा उडणाऱ्या रोबोची निर्मिती केली आहे.
- अवघ्या १९० मिलिग्रॅम वजनाचा हा रोबो आकाराने एखाद्या किटकाएवढाच आहे.
- आयआयटी (मुंबई) येथे पदवी शिक्षण पूर्ण केलेले चुकेवाड हे पदव्युत्तर शिक्षणापासून अमेरिकेत स्थायिक असून वॉशिंग्टन विद्यापीठात पीएचडी करत आहेत.
चीनचा नवा उपग्रह
- विशेष संशोधन न झालेल्या चंद्राच्या दुसऱ्या बाजूच्या अभ्यासासाठी चीनने ‘क्वेकियाओ’ उपग्रहाचे २१ मे रोजी प्रक्षेपण केले आहे.
- चारशे किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहाचा कार्यकाळ ३ वर्षांचा असून या मोहिमेदरम्यान प्रथमच चंद्राच्या दुसऱ्या बाजूवर रोव्हर उतरविण्यात येणार आहे.
- उपग्रहावर ५ मीटर व्यास असणारा अँटेना बसविण्यात आला असून, आजवरच्या अवकाश मोहिमांमध्ये संदेशासाठी वापरण्यात येणारा सर्वांत मोठा अँटेना असल्याचा चीनचा दावा आहे.
आंतरराष्ट्रीय
पहिली पवन शिखर परिषद
- यावर्षी २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान पहिली पवन शिखर परिषद आयोजित केली जाणार असून त्याचे यजमानपद जर्मनी भूषविणार आहे.
- जर्मनीतील हॅमबर्ग येथे आयोजित असणारी ही परिषद जगातील पवन उद्योग जगतातील सर्वांत मोठी आणि महत्त्वाची परिषद ठरणार आहे.
- या परिषदेत भारत, चीन, स्पेन, डेन्मार्क आणि अमेरिकेसह राष्ट्रांचे प्रतिनिधी वक्ते उपस्थित राहणार आहेत.
- या शिखर परिषदेदरम्यान दोन मुख्य परिषदा घेतल्या जाणार आहेत ; पवनऊर्जा हॅमबर्ग आणि पवनयुरोप हॉलिन्स्की.
- या दोन्ही परिषदांमध्ये मिळून २५० वक्ते आणि सुमारे १४०० प्रदर्शनकर्ते सहभागी होतील.
- या परिषदांमध्ये या विषयावर मूल्यक्षमता, अद्ययावत ऊर्जा तंत्रज्ञान आणि गतिशील बाजारपेठ भर देण्यात येणार आहे.
महत्त्वाचे...
‘GSAT-९’ चे यशस्वी प्रक्षेपण
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ५ मे २०१७ रोजी दक्षिण आशियायी उपग्रहाचे (GSAT-९) अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले.
- दक्षिण आशियायी भागातील देशांना दूरसंचार व संकटकाळात मदत मिळावी तसेच परस्पर संपर्क उपलब्ध व्हावा असा या उपग्रहाचा उद्देश आहे.
- पाकिस्तानने या प्रकल्पात सहभागी होण्यास नकार दिल्याने सार्क ऐवजी ‘दक्षिण आशियायी उपग्रह’ असे नामकरण करण्यात आले.
- दक्षिण आशियातील ७ देश GSAT-९ उपक्रमात सहभागी आहेत : भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि अफगाणिस्तान.
टाटा संशोधन संस्थेच्या GRAPES-३ प्रयोगामध्ये सुधारणा
- GRAPES-3 - Gamma Ray Astronomy PeV EnerdieS Phase 3
- हा अवकाशीय लहरी किंवा सौरमालेच्या बाहेरून उद्भवलेली तीव्र उत्सार्जाने अभ्यासण्यासाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेने सुरू केलेला प्रयोग आहे
- सदर प्रयोग हा टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या उदकमंडलम येथील ‘कॉस्मिक रे’ प्रयोगशाळेत उभारण्यात आला आहे
- जून २०१५ मध्ये पृथ्वीवर आदळलेल्या सौर वादळांचा पृथ्वीवर झालेला परिणाम मागील वर्षी या प्रयोग शाळेद्वारे अभ्यासण्यात आला होता
- नवीन केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे वादळांच्या उत्पत्तीबद्दल नेमकी माहिती मिळवता येणार आहे.
- सुधारित संशोधक यंत्रणा (detector) ही अधिक आवाक्यातील अवकाश अभ्यासणारी आणि येणाऱ्या अवकाशीय लहरींची नेमकी दिशा ओळखणारी असेल
‘सरस्वती’ दीर्घिका समूहाचा शोध
- जुलै २०१७ मध्ये आयुकामधील (Inter-university centre for astronomy and astrophysics) शास्त्रज्ञ जयदीप बक्षी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील शास्त्रज्ञांच्या एका मोठ्या गटाने अवकाशातील एका दिर्घिकेचा शोध लावला.
- तब्बल २ कोटी अब्ज सुर्यांएवढे वस्तुमान असणाऱ्या या दीर्घिका समूहाचे ‘सरस्वती’ असे नामकरण करण्यात आले.
- आयुकाससह आयसर (Indian institute of Science and Educational Research, एनआयटी (National Institute of Technology) जमशेदपूर आणि केरळ मधील न्यूमन महाविद्यालय यांचाही या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे.
- पृथ्वीपासून ४०० कोटी प्रकाशवर्षे दूर असणारा व सुमारे ४३ दीर्घिका सामावून घेणारा हा ‘सरस्वती’ समूह मीन राशीत आहे.
हंगूल हरणांच्या संख्येत घट
- मुख्यतः काश्मीर राज्यातील दायचीगम या राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या हंगुल (Kashmir/Red Stag) हरणांची संख्या ५०० वरून १८६ वर आली आहे
- आंतरराष्ट्रीय पर्यावरण संरक्षण संघ (IUCN) लवकरच या हंगुल हरणांना ‘क्रिटिकली एन्डेंजर्ड’ गटामध्ये समाविष्ट केले आहे
- आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेले कारखाने आणि गोल्फ मैदान यांचा परिणाम या हरणांच्या निवासस्थानावर होत असल्याने त्यांच्या संख्येत घट झाली आहे