स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स
शुक्रवार, 4 जानेवारी 2019
करंट अफेअर्स
राष्ट्रीय
अटल आयुष्यमान उत्तराखंड योजना
- उत्तराखंड सरकारने केंद्रीय योजना ‘आयुष्यमान भारत’च्या धर्तीवर राज्यातील २३ लाख कुटुंबांना लाभदायी ठरणारी ‘अटल आयुष्यमान उत्तराखंड’ योजना सुरू केली आहे.
- मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या हस्ते सुरू करण्यात
- आलेल्या या योजनेचा राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण पुरविणे हा मुख्य उद्देश आहे.या अंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबास दरवर्षी सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे.
- सुमारे १३५० विविध गंभीर आजार या योजनेत येतात. ९९ सरकारी तर ६६ खासगी रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.
- या योजनेमुळे नागरिकांना विनामूल्य आरोग्यसेवा
- सुरक्षा पुरविणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
चाबहारवर भारत कार्यरत
- मे २०१६ मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यात करार झालेल्या ‘चाबहार’ या बंदराचा पहिला टप्पा असणाऱ्या शाहीद बेहेश्ती बंदराचे संचालन भारताने आपल्या हाती घेतले असून तेथे आपल्या औपचारिक कार्यालयाची स्थापनादेखील केली आहे.
- शाहीद बेहेश्तीच्या संचालनाबाबत फेब्रुवारी २०१८ मध्येच भारत आणि इराण दरम्यान करार करण्यात आला होता व त्याचवेळी या प्रकल्पाबाबत पहिली त्रिसदस्यीय बैठक इराणची राजधानी तेहरान येथे पार पडली होती.
- या बैठकीत भारत, इराण व अफगाणिस्तान या देशांतील व्यापार करण्यासाठी ठरविलेल्या मार्गांना आणि वाहतुकीच्या मार्गिकांना सहमती देण्यात आली.
- भारताने मागील वर्षी जाहीर केलेल्या ५०० दशलक्ष
- डॉलर्सच्या मदतीतून चाबाहर बंदराचा आगामी विकास केला जाणार आहे.
आसाममध्ये ‘बोगीबिल’चे लोकार्पण
- २५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील बोगीबिल या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.
- रेल्वे आणि रस्ता अशी दुहेरी वाहतूक व्यवस्था असणारा ४.४९ किलोमीटर लांबीचा हा पूल लांबीच्या दृष्टीने देशात पहिल्या तर आशियात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- देशातील एकमेव संपूर्ण वेल्डेड पूल असणाऱ्या बोगीबिल
- पुलाच्या बांधकामासाठी युरोपियन संकेत आणि वेल्डिंग
- मानकांचे पालन करण्यात आले असून त्याचे वय किमान १२० वर्षे आहे.
- हा पूल दुमजली असून खालच्या मजल्यावर २ समांतर रेल्वे मार्ग, तर वरील मजल्यावर ३ पदरी रस्ता निर्माण करण्यात आला आहे.
- आसाममधील दिब्रूगड जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीचा दक्षिण तट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील धेमजी जिल्ह्यातील सीलापाथर यांना जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्ही राज्यातील अंतर १७० किलोमीटरने कमी झाले आहे.
- या पुलामुळे दिल्ली ते दिब्रूगड रेल्वे प्रवासही ३ तासांनी कमी होणार आहे.
- रणगाड्यांची वाहतूक आणि हवाई दलाच्या विमानांना उतरवण्यासाठी हा पूल सक्षम आहे.
- ब्रह्मपुत्रेच्या परिसराची भूकंप प्रवणता लक्षात घेऊन या पुलाची मजबुती ही ७ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करण्याएवढी आहे.
- ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची महत्त्वाची भर घालणाऱ्या या पुलास ‘आसामची जीवनरेखा’ म्हणून संबोधण्यात आले आहे.
तमिळनाडूमध्ये संगीत संग्रहालय
- तमिळनाडू राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून थिरूवैयारू येथे देशातील पहिले संगीत संग्रहालय उभे राहणार आहे.
- कर्नाटकी संगीतक्षेत्रातील त्रिमुर्तिंमधील संत त्यागराज यांचे थिरूवैयारू हे जन्मस्थान असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.
ओडिशामध्ये कालिया योजना
- ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कालिया योजना मंजूर केली आहे. [KALIYA : Krushak Assistance for Livelihood & Income Arguments]
- तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुद या योजनेसाठी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ओडिशा राज्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना होणार आहे.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबास खरीप पिकांसाठी ५ हजार रुपये आणि रब्बी पिकांसाठी १० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य पुरविले जाणार आहे.
पर्यावरण
‘गज’ चक्रीवादळ
- तमिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर ताशी १८४ किलोमीटरच्या वेगाने आलेल्या ‘गज’ या चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर गाळाचे निक्षेपण होऊन वेदारण्यम शहरातील मीठ उत्पादन व्यवसायास तडाखा बसला आहे.
- मीठोत्पादन व पक्षी अभयारण्य यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण तमिळनाडूतील वेदारण्यम या शहराच्या पूर्वेस बंगालचा उपसागर तर दक्षिणेस पाल्कची.....समुद्रधुनी असल्याने चक्रीवादळाचा दुहेरी फटका बसला.
- वादळी वारे वारंवार आल्याने समुद्राचे गाळयुक्त पाणी मीठोत्पादन क्षेत्रात ८ किलोमीटर आतपर्यंत शिरले. पाणी ओसरल्यावरही गाळ तसाच राहिल्याने सुमारे ३५०० एकर मीठोत्पादन क्षेत्र गाळाच्या थराखाली गाडले गेले.
- गाळ काढल्याशिवाय मीठोत्पादन पुन्हा सुरू करता येणार नाही. गाळ उपसण्यासाठी सुमारे १ लाख रुपये प्रति हेक्टर इतका खर्च येणार आहे.
- मीठोत्पादन हा विषय केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट
- असल्याने हे कार्य केंद्र सरकारकडून केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या एका पथकाने नुकतीच या क्षेत्राची पाहणी केली आहे.
आर्थिक
जीएसटी मध्ये कपात
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर परिषदेची ३१ वी बैठक पार पडली. या बैठकीत ३३
- सेवा व वस्तूंवरील करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- एकूण ३३ पैकी २६ वस्तूंवरील कर हा १२, ५ व ० टक्के आणि उरलेल्या ७ वस्तूंवरील कर २८ टक्यांवरून १८ टक्के करण्यात आला असून २८ टक्के करकक्षेत केवळ २८ वस्तू उरल्या आहेत.
- हे नवे करदर १ जानेवारी २०१९ पासून लागू झाले आहेत. आगामी काळात २८ टक्के करकक्षा ही टप्प्याटप्प्याने अस्तंगत होत जाणार असल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी पत्रकारांना सांगितले.
- सदर बैठकीत महसूल प्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी वस्तू व सेवा कर परिषदेने ७ सदस्यीय समितीची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. ही समिती काही ठराविक राज्यांमध्ये महसूल केंद्रित संकलनास कारणीभूत घटकांचे विश्लेषण करणार आहे.
- या कपातीनंतर करमुक्त झालेल्या वस्तू/सेवा पुढील प्रमाणे गोठविलेल्या भाज्या, संगीतावरील पुस्तके, जन-धन ठेवींवर बॅंकेतून दिल्या जाणाऱ्या सेवा.
आंतरराष्ट्रीय
इंडोनेशियामध्ये सुनामी
- इंडोनेशियात अनाक क्राकाताऊ (Anak krakatau) या बेटावरील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आलेल्या सुनामीत तीनशेहून अधिक लोकांचा बळी गेला. दीड हजार लोक जखमी झाले आहेत.
- या उद्रेकातून बाहेर आलेला लाखो टन कचरा समुद्राच्या पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे विस्थापन झाले आणि परिणामतः त्सुनामीच्या मोठ्या लाटा निर्माण झाल्या.
- अनाक क्राकाताऊ हा इंडोनेशियातील १२९ सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे.