नोंद ठेवावी असे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021
करिअर
आरोग्य
उष्णकटिबंधातील आजारांचे उच्चाटन
- दरवर्षी किमान एक अब्ज लोकांना बाधित करणाऱ्या २० उष्णकटिबंधीय दुर्लक्षित आजारांची यादी जागतिक आरोग्य संघटनेने तयार करून त्यांच्या उच्चाटनासाठीचा आराखडा २८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केला आहे.
- आरोग्याच्या चांगल्या सुविधा, स्वच्छ पाणी आणि सामाजिक स्वच्छता यांचा अभाव असणाऱ्या भागात फोफावणाऱ्या या आजारांचा नायनाट करण्यासाठी पुढील १० वर्षांचा आराखडा करण्यात आला आहे.
- यासाठीच्या आराखड्यामध्ये: १) या आजारांच्या रुग्णांची संख्या ९० टक्क्यांनी कमी करणे, २) किमान १०० देशांमधून कमीत कमी एका रोगाचे समूळ उच्चाटन, ३) ड्रॅक्युनक्युलॅसिस आणि यॉज या दोन्ही रोगांचे सर्व देशांतून उच्चाटन, ४) अपंगत्वाने उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण ७५ टक्क्यांवर आणणे हे सर्व समाविष्ट आहे
आंतरराष्ट्रीय.
म्यानमारमध्ये लष्करशाही
- एक फेब्रुवारी रोजी म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता उलथून लावत राष्ट्रीय सल्लागार आंग सांग स्यू की यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करून वर्षभरासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
- मागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय निवडणुका व त्यातील गैरव्यवहार यावरून सध्याचे नागरी सरकार आणि त्यापूर्वी सुमारे ५० वर्षे राज्य केलेले लष्कर यांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
- जानेवारी महिन्याच्या अखेरीस इशारा दिल्यानंतर म्यानमार लष्कराने आंग सांग स्यू की आणि राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांना सोमवारी पहाटे राजधानी नायपायतॉ येथे अटक केली आणि थोड्याच वेळानंतर लष्कराने तेथील दूरदर्शन वाहिनीवरून आणीबाणीचे वृत्त प्रसारित केले.
- या अटकसत्रानंतरच्या काही वेळातच देशातील मोबाईल फोन्सची नेटवर्क्स आणि इंटरनेट या सुविधाही टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या.
- यानंतर सुमारे पाच दिवसांनी ६ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने यांगॉनच्या रस्त्यावर उतरून आंदोलने केली. २००७ सालापासूनचे हे पहिलेच मोठे आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे.
- म्यानमारमधील लष्कराच्या या कारवाईचा जगातील सर्व बड्या राष्ट्रांनी तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने निषेध केला आहे.
पर्यावरण
खारफुटी जमिनींच्या संवर्धनाचे केंद्र
- दोन फेब्रुवारी रोजी जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधत भारतातील पहिल्या ‘खारफुटी जमीन संवर्धन व व्यवस्थापन केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले.
- हे केंद्र ‘राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्रा’चा एक भाग म्हणून उभारण्यात आले आहे.
- यानिमित्ताने खारफुटी जमिनी व त्यांचे पुनरुज्जीवन याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहिमे’अंतर्गत गंगेच्या काठी असणाऱ्या ५० जिल्ह्यांमध्ये प्रति जिल्हा १० याप्रमाणे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
- नदीपात्र व्यवस्थापनाच्या मोहिमेस खारफुटी संवर्धनाची मोहीम जोडण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न आहे.
- भारतामध्ये सुमारे ११.८ लाख हेक्टर क्षेत्रावर एकूण ४२ खारफुटी जमिनी आहेत.
- याच वर्षी इराणमधील रामसर येथे झालेल्या खारफुटी जमिनीच्या आंतरराष्ट्रीय
- संवर्धन करारास ५० वर्षे पूर्ण होत आहेत.