गुंतवणुकीसाठी योग्य वेळ

डॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अर्थनीती ः शेअर बाजार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी-जिनपिंग, मध्यवर्ती चीनमधल्या बूहान शहरास एप्रिल  २७ व २८ ला एकत्र भेटणार आहेत. अमेरिकेबरोबर सौहार्दाचे वातावरण कायम ठेवत. मोदी हे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळवण्यासाठी चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारख्या राष्ट्रांशीही संबंध वाढवीत आहेत. गेल्याच आठवड्यांत त्यांनी लंडनमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेस मे व राणी एलिझाबेथ यांचीही भेट घेतली होती. नवी दिल्लीत सुषमा स्वराज व बेजिंग ‘वॅंग यी यांनी ही घोषणा एकाच वेळी केली. अशा या उच्चस्तरावरील बैठक ३० वर्षांपूर्वी १९८८ मध्ये राजीव गांधी व चीनचे डेंग यांच्यात झाली होती. ईशान्येतील डोकलाम इथे भारतीय व चीनी सैन्य एकमेकांसमोर ठाकल्यानंतर गंभीर वातावरण निर्माण झाले होते. पण दोन्ही राष्ट्रांच्या सेनानींनी संयम पाळून, वातावरणात बिघाड होऊ दिला नव्हता.

 देशातील अंतर्गत बाबीत, सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याबाबत सुमारे ६० सांसदांनी, चौकशीच्या मागणीचा धोशा लावला आहे. ती प्रक्रिया पुरी होण्याआधीच, ऑक्‍टोबरअखेर मुख्य न्यायमूर्ती मुदत संपल्यामुळे पदभार सोडणार असल्याने, हे प्रकरण पेल्यातले वादळ ठरावे. राज्यसभेत ही चर्चा कपिल सिब्बल यांनी सुरू केली आहे. २००९ मध्ये न्यायमूर्ती दिनकरन यांच्याबाबत असेच वादळ उठले होते. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत साशंकता निर्माण झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालय हे सोशल मीडीयाचे लक्ष्य ठरले आहे.

 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ’’भारताचा हत्ती आता जोरात धावायला बघत आहे’’ अशा शब्दांत, भारताच्या सध्याच्या आर्थिक सुधारणांबाबत म्हटले आहे. आपल्याकडील अनेक धृतराष्ट्रांचा मात्र यावर विश्‍वास नाही. गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधल्याने इतरांचा धृतराष्ट्र झाला आहे. महामार्ग, सागरीमार्ग, दूरवहन, रेल्वे, खाणी अशा अनेक बाबतीत भारताची घोडदौड चालू आहे. आता रोज ३५ किलोमीटर्स रस्ते बांधण्याचे लक्ष्य नितीन गडकरी यांनी ठेवले आहे. तसे झाले तर व सागरमाला प्रकल्प पुरा होऊन किनारी मार्ग सुरू झाले तर अर्थव्यवस्था जास्त जोराने वाढेल.
 सध्या पेट्रोलचे भाव लिटरला ८२ रुपयांच्या आसपास आहेत व रालोआ सरकारने हे वाढवले आहेत, असे लोकांना वाटते. कारण २ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पेट्रोल ६३.९० रुपयांपर्यंत शासनाने खाली आणले होते. पेट्रोलचे भाव वाढत गेले कारण पूर्वीच्या राजवटीने इराणमध्ये ४३ हजार कोटी रुपये थकवले होते. मोदींनी इराणला भेट दिल्यानंतर हे कर्ज फेडले, पण त्यासाठी जनतेला आधीची दहा वर्षे वेठीला धरले गेले होते. गेल्या आठवड्यात भारत सरकारने नुकतीच प्राथमिक भागविक्री केलेल्या मिश्र धातू मेगमची (मिधानि)  बाजारावर नोंदणी झाली. प्राथमिक भागविक्री ९० रुपये दराने झाली, पण त्यावेळी भारतीय आयुर्विमा महामंडळ व सर्वसाधारण विमा व्यवसायाच्या चारही कंपन्या यांना मिधानिचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर द्यायला लागले होत. नोंदणीच्या दिवशी लगेच भाव ११० रुपयांवर गेला व तिथून रोज वाढत तो आता १७२ रुपयांपर्यंत पोचला आहे. तो १५० रुपयाला मिळेल तेव्हा मोठ्या प्रमाणात खरेदी करावी. या तिमाहीचे तिचे आकडे चांगले येणार नाहीत. पण २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी कंपनीचे शेअरगणिक उपार्जन चांगले राहील. त्यामुळे ही खरेदी दोन वर्षांसाठी असावी.

 केंद्र सरकार विमानतळांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. नीती आयोग व आर्थिक व्यवहार खात्याला (Deparetment of Economic Affairs) या बाबतचा पथदर्शी प्रकल्प करायला सांगितले आहे. मनमोहन सिंग सरकारने नवी दिल्ली, मुंबई, बंगलोर तसेच हैद्राबाद या चार विमानतळांचे खासगीकरण केले होते. एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, लखनौ, जयपूर इथल्या विमानतळाचे खासगीकरण करण्याचे ठरवले आहे. सरकारने उद्योगक्षेत्रातून बाहेर पडावे या विचारसरणीशी ही कृती सुसंगत ठरेल. त्यामुळे सरकारला मोठा महसूलही मिळेल. व्यवस्थापन व मालकी या दोन्ही बाजूंचा विचार करून ही खासगीकरणाची पावले उचलली जातील. विमानतळांची जी अतिरिक्त जमीन आहे, तिच्या विक्रीतूनही सरकारला रक्कम मिळेल. मात्र ज्या विमान तळांचे खासगीकरण होणार आहे, ती आकाराने लहान असल्याने, जागतिक विमान कंपन्यांना त्यात रस असणार नाही.

   टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मार्च २०१८ चे वार्षिक व त्रैमासिक आकडे चांगले आल्याने मॉर्गज स्टॅनली या अमेरिकन कंपनीने वर्षात तिचा सध्याचा २८०० रुपये भावांत ३६०० रुपयांपर्यंत वाढ होईल असे भाकीत केले आहे. पाकिस्तानमधील शेअरबाजारावर नोंद असलेल्या कंपन्यांच्या एकत्र बाजारमूल्यापेक्षा टाटा कन्सल्टन्सीचे बाजारमूल्य जास्त आहे. एल अँड टी इन्फोटेक आपला व्यवहार विविध अंगांनी विस्तारत आहे. डिजिटल, ॲनालिटिक्‍स, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) क्‍लाऊड या सर्व सेवा ती आता देऊ करणार आहे. भारतातील कंपन्यांची तांत्रिक बाजूही आता बळकट होत आहे. ग्लोबल ५०० मोठ्या फोर्बेस यादीतल्या कंपन्यांपैकी ५२ कंपन्या तिच्या ग्राहकांत आहेत. भारतीय कंपन्यांच्या भरारीच्या अनेक बातम्या यापुढे येत राहतील. मर्सिडीज आपल्या महागड्या गाड्या आता भारतात करणार आहे. तिची इंजिने चेन्नईला फोर्स मोटर्स ही कंपनी करेल.

 इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सचे मार्च २०१८ वर्षांचे व तिमाहीचे आकडे अपेक्षेप्रमाणे उत्कृष्ट आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत (कोटी रुपयांत)

सध्या भाव १३८५ रुपये आहे व या भावाला किं/अु. गुणोत्तर १५.५१ पट दिसते. गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे १४४० रुपये व ९९० रुपये होत. रोख २० ते २५ लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. मार्च २०१९ व २०२० वर्षांसाठीचे संभाव्य उपार्जन ११२ रुपये व १२७ रुपये अनुक्रमे व्हावे, त्यामुळे दिवाण हाउसिंग फायनान्स, रोको होम फायनान्स प्रमाणे हाही शेअर भागभांडारात हवा.

 गेल्या आठवड्यात अनेक मोठ्या कंपन्यांचे मार्च २०१८ तिमाही व वर्षाचे आकडे जाहीर झाले. एचडीएफसी  बॅंक, इंडुसिंड बॅंक, टाटा कन्सल्टन्सी, ए.सी.सी. यांची विक्री उत्तम होती व नक्त नफाही वाढला होता. एचडीएफसी बॅंकेची प्रगती खालील आकड्यांवरून कळेल.

सध्या या शेअरचा भाव १९५५ आहे. वर्षभरात २२०० रुपये होऊ शकेल. सध्याच्या भावाला किं/अु. गुणोत्तर ३० पट आहे. किंचिंत कमी गुणवत्तेच्या येस बॅंकेचा भाव ३१२ रुपये आहे. त्यात ३३% वाढ होऊन तो ४१० रुपयांवर जाऊ शकतो. त्यामुळे उत्तम शेअर म्हणून एचडीएफसी व  येस बॅंक हे दोन्ही गुंतवणुकीसाठी योग्य ठरतील. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडला भेट दिल्यानंतर आयात - निर्यातीच्या व्यवहारात बऱ्यापैकी वाढ व्हावी. इंडुसिंड बॅंकेचे एकूण उत्पन्न ५८५८.६२ कोटी रुपये होते. नक्त नफा १४३३.८४ कोटी रुपये आहे. तिचं भागभांडवल ६०.०२ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १५.८८ रुपये दिसते. पूर्ण वर्षाचे बॅंकेचे उत्पन्न २२०३०.८५ कोटी रुपये होते. करोत्तर नफा ५४८०.६८ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन १२.५७ रुपये होते. दरवर्षी उपार्जन २५ टक्‍क्‍याने वाढते. पुनः शेअर जेव्हा १४०० रुपयांच्या आसपास येईल, तेव्हा तो खरेदी करावा.

 ए.सी.सी. या सिमेंट क्षेत्रातल्या मोठ्या कंपनीची मार्च २०१८ ची विक्री ३६२४.५९ कोटी रुपये झाली. अन्य उत्पन्न ४७.३६ कोटी रुपयांचे होते. करोत्तर नफा २५०.३९ कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन १३.३३ रुपये झाले.

एस्सार स्टीलच्या दिवाळखोरीचे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल पुढे गाजत आहे. ही फक्त सुरवात आहे. आता अशी नादारीची प्रकरणे पुढे येत राहतील. पण शेअरबाजारावर त्याचा परिणाम होणार नाही.

 आय.डी.एफ.सी. (इन्फ्रास्ट्रक्‍चर फायनान्स लि.)चे २०१७-१८ वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीचे एकूण उत्पन्न १८७.०२ कोटी रुपये होते व नक्त नफा ४३.७५ कोटी रुपये होता. शेअरवर उपार्जन ८१ पैसे (०.८१ रु.) होते. २०१७-१८ या पूर्ण वर्षाचे उत्पन्न ३३६.५१ कोटी रुपये व नक्त नफा ८५.४९ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन १.६० रुपये होते. गेल्या वर्षाचे शेअरगणिक उपार्जन १.३१ रुपये होते.

 केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न  २०२२ पर्यंत सध्याच्या दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषिधोरण आखले आहे. लार्सन टूब्रो इन्फोटेक या कंपनीने स्वतःचे भांडवल मोठ्या प्रमाणावर वाढवल्यामुळे तिला बाहेरून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्याची जरुरी नाही. २०१९ व २०२० मार्च वर्षासाठी तिचे किं./अु. गुणोत्तर १८.६ पट व १४.७ पट अनुक्रमे असेल. श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, बजाज फायनान्स,. रेप्को होम्स फायनान्स प्रमाणेच हाही शेअर आपल्या भागभांडारात हवा.

संबंधित बातम्या