लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स

सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर
बुधवार, 21 मार्च 2018

अर्थविशेष

देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या बजेटमध्ये या वर्षी ‘लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स (एलटीसीजी)’ च्या आकारणीत जो बदल केला आहे. याचा काय परिणाम होणार याची नेमकी माहिती गुंतवणूकदारास असणे आवश्‍यक आहे.
शेअर्स व इक्विटी म्युचुअल फंडातून होणाऱ्या भांडवली लाभाचे अल्पकालीन(शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन(लाँग टर्म) असे दोन प्रकार आहेत. यातील अल्पकालीन लाभ म्हणजे गुंतवणूक केल्यापासून एक वर्षाच्या आत विकून झालेला लाभ, तर गुंतवणूक केल्यापासून एक वर्षानंतर विकून झालेला नफा म्हणजे दीर्घकालीन लाभ असतो. अल्पकालीन(शॉर्ट टर्म)लाभ झाल्यास त्यावर १५ टक्के इतका टॅक्‍स द्यावा लागतो याला शॉर्ट कॅपिटल गेन टॅक्‍स असे म्हणतात. तर दीर्घकालीन भांडवली लाभ (लाँग टर्म कॅपिटल गेन) आत्तापर्यंत मात्र कर मुक्त होता. यंदाच्या अर्थ संकल्पात दीर्घकालीन लाभावर दहा टक्के कर लागू होणार आहे. आता लाँग टर्म कॅपिटल गेन वर १० टक्के इतका कर आकारला जाणार आहे मात्र १० टक्के लाँग टर्म कॅपिटल गेन सरसकट लावला जाणार नसून आर्थिक वर्षात होणाऱ्या लाँग टर्म कॅपिटल गेनच्या एकूण रकमेच्या एक लाखावरील रकमेवर लागू असणार आहे. 
लाँग टर्म कॅपिटल गेन पुढील प्रमाणे काढला जाणार आहे.

  • यासाठी एक वर्ष किंवा त्या आधीची शेअर/युनिटची खरेदीची किंमत 
  • या शेअर/युनिटची दि. ३१/ ०१/२०१८ रोजीची बाजारातील किंमत ही आधारभूत किंमत धरली जाईल.  
  • दि. ३१/०३/२०१८ नंतरची (दि. ०१/०४/२०१८ रोजीची किंवा त्यानंतरची) विक्रीची किंमत या तीनही बाबींचा एकत्रित विचार करावा लागणार आहे. चार वेगवेगळ्या परिस्थितीत लाँग टर्म कॅपिटल गेन कसा काढला जाईल हे आता आपण पाहू.
  • उदा : दि. ३१/०१/२०१७  रोजी एखादा शेअर रु.३०० ला खरेदी केला आहे व त्याची दि. ३१/०१/२०१८ ची किंमत रु. ५०० इतकी आहे व हा शेअर ३१/०३/२०१८ आत कधीही विकला व विक्रीची किंमत रुपये ३००पेक्षा कितीही जास्त असली तरी प्रचलित नियमानुसार ३१/०३/२०१८ पर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स आकारला जाणार नाही.
  • मात्र जर हा शेअर ०५/०४/२०१८ ला रु. ६०० ला विकला तर १०० रुपये एवढा लाँग टर्म कॅपिटल गेन (६००-५०० = १००) प्रती शेअर धरला जाईल.
  • जर शेअर ०५/०४/२०१८ रोजी  रुपये ४४० ला विकला तर लाँग टर्म कॅपिटल गेन होणार नाही उलट लाँग टर्म कॅपिटल लॉस धरला जाईल (५००-४४० = -६०)
  • समजा या शेअरची ३१/०१/२०१८ रोजी किंमत रु. २५० इतकी असेल आणि दि. ०५/०४/२०१८ रोजी रुपये ४०० विकला तर वरील उदाहरणात होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन ४००-२५० = १५० न होता ४००- ३०० = १०० इतका असेल.

थोडक्‍यात दि. ३१/०१/२०१७ च्या एक वर्षापूर्वी खरेदी केलेल्या शेअर/युनिटसाठी  ३१/०१/२०१८ ची बाजारातील किंमत लाँग टर्म कॅपिटल गेन काढण्यासाठी आधारभूत किंमत धरली जाईल व खरेदीची किंमत व  ३१/०१/२०१८ ची किंमत यातील जास्तीची किंमत दि. ०१/०४/२०१८ पासून होणाऱ्या विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन काढण्यासाठी विचारात घेतली जाईल. तसेच एका वर्षापूर्वी खरेदी केलेल्या शेअर्स/युनिटच्या विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन हा दि. ३१/०३/२०१८ पर्यंत करमुक्त असेल.

पुढील आर्थिक वर्षापासून  जर आर्थिक वर्षात केलेल्या शेअर्स/युनिटच्या विक्रीतून होणारा लाँग टर्म कॅपिटल गेन रु. एक लाखापेक्षा कमी असेल तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स आकारला जाणार नाही मात्र जर रु.एक लाखापेक्षा जास्त असेल उदा: रु. २.५ लाख एवढा असेल तर २५००००-१००००० =१५०००० एवढ्या रकमेवर १० टक्के दराने रु. १५००० इतका लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स आकारला जाईल. कॅपिटल गेन टॅक्‍स आकारला जाईल कसा आकारला जाईल हे खालील टेबलवरून आपल्या ध्यानात येईल.

संबंधित बातम्या