मुलांसाठी पौष्टिक पदार्थ

मधुरा बोरगावकर, गुलबर्गा (कर्नाटक) 
गुरुवार, 28 जून 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.
 

घरगुती रसमलाई
साहित्य : दूध १ लिटर, वाटीभर मैदा, पाव वाटी मैदा, पाव वाटी रवा, ४-५ वेलदोडे, अर्धी वाटी तूप, १ वाटी साखर.
कृती : रवा, मैदा एकत्र करून २ कप दुधात १ चमचा गरम तुपाचे मोहन घालून जाडसर भिजवावे. २ तास तसेच ठेवावे. चांगले कुटून बोराएवढे गोळे करावे. ते तुपात मंद तळावेत. दूध आटवून त्यात केशर, साखर, वेलची पावडर टाकावी. नंतर तळलेले गोळे परत उकळावे. रसमलाई तयार. ५-७ जणांना पुरते.

बेरीच्या वड्या
साहित्य : दोन वाट्या बेरी, २ वाट्या (शेंगदाणा+खोबरे) समप्रमाण +१० बदाम +१० काजू + पाव वाटी बिट रुट, २ वाट्या जाड साखर, १० मिली पाणी, वेलदोडा पूड चवीनुसार
कृती : कढईत बेरी गरम करत ठेवावी. लगेचच शेंगदाणा, खोबरे, बदाम काजूची पूड घालावी. बिटरुट रस घालावा. मिश्रण खाली न लागू देता हलवावे. एकसारखे झाल्यावर साखर घालावी. नंतर १० मिली पाणी टाकावे. पाक होईपर्यंत मिश्रण लागू न देता हलवावे. गॅस बंद केल्यावर लगेचच ताटात थापावे. थोडेसे गार झाल्यावर आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात. बेरीचा सदुपयोग होतो. मुलांना डब्यात देता येतात.

घरगुती रसमलाई
साहित्य : दूध १ लिटर, वाटीभर मैदा, पाव वाटी मैदा, पाव वाटी रवा, ४-५ वेलदोडे, अर्धी वाटी तूप, १ वाटी साखर.
कृती : रवा, मैदा एकत्र करून २ कप दुधात १ चमचा गरम तुपाचे मोहन घालून जाडसर भिजवावे. २ तास तसेच ठेवावे. चांगले कुटून बोराएवढे गोळे करावे. ते तुपात मंद तळावेत. दूध आटवून त्यात केशर, साखर, वेलची पावडर टाकावी. नंतर तळलेले गोळे परत उकळावे. रसमलाई तयार. ५-७ जणांना पुरते.

नाचणीचे लाडू
साहित्य : दोन वाट्या नाचणीचे पीठ, एक वाटी सोयाबीन पीठ, १ वाटी डिंक तळून, दीड वाटी तूप (साजूक), वेलदोडा, काजू, बेदाणे, गूळ अडीच खसखस.
कृती : नाचणीचे पीठ प्रथम भाजून घ्यावे. एक वाटी तुपात नंतर सोयाबीन पीठ घालावे. परत तूप घालावे. गुलाबी रंग येऊ द्यावा. डिंक तळून घ्यावा. ड्राय फ्रूट कोरडे भाजावे. खसखस भाजावी. त्याची पूड करावी. नंतर गूळ किसून घालावा. वेलदोडा पूड घालावी. नीट मळून घ्यावे. वर बेदाणा लावावा.

खजुराची टॉफी
साहित्य : दीड कप घट्ट साय, दोन टेबल स्पून साखर, २ टेबल स्पून धुवून चिरलेला खजूर, थोडे डेसिकेटेड खोबरे. 
कृती : खजूर, साय, साखर, निर्लेप पॅनमध्ये शिजवावे. थोडे खोबरे त्यात घालावे. नंतर वडी पाडल्यावर वरून थोडे खोबरे घालावे. पाव इंच जाड लाटावे. गार झाल्यावर कापून तुकडे करावे. सकाळी दुधाबरोबर दोन वड्या मुलांना द्याव्यात.

सातूच्या पीठाचे लाडू 
साहित्य : दोन वाट्या गहू, पाव वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी सोयाबीन, पाव वाटी फुटाणे (इच्छा असेल तर) साजूक तूप, वेलदोडा पूड, जायफळ, ड्राय फ्रुटस, साखर किंवा गूळ (इच्छेनुसार) थंडीच्या दिवसात सुंठ पूड किंवा डिंक घालावा.
कृती : हे सर्व गहू, हरभरा डाळ, सोयाबीन गिरणीत दळून आणावे. तयार पिठात बाकीचे जिन्नस घालून लाडू वळावेत. डिंकाच्या चुऱ्यात गरम तूप ओतून फुलवावे. मग मिसळावे. म्हणजे जास्त पौष्टिक पदार्थ मुलांना मिळेल.

बटर क्रंच
साहित्य : अडीच कप साखर, १ कप पाणी, पाऊण कप ग्लुकोज, अर्धा कप लोणी, ३-६ व्हॅनिला थेंब.
कृती : साखर पाण्यात मंद आचेवर विरघळावी. त्यात ग्लुकोज घालून उकळी आणावी. हे मिश्रण एकसारखे ढवळावे. त्यात लोणी घालून चांगले ढवळावे. नंतर व्हॅनिला इसेन्स घालून घट्ट होत आले, की वड्या पाडाव्यात. बटर पेपरमध्ये गुंडाळाव्यात. मिश्रणात बदाम, अक्रोडचे तुकडे घालून क्रंच बनवता येते.

अंकुरित कडधान्याचे कलाकंद
साहित्य : मूग, सोयाबीन १ कप, १ कप नारळाचा चव, १ कप सायीसकट दूध, १ कप साखर, १० वेलदोडा, २ टीस्पून खरवस पावडर, काजू, चेरी किंवा बेदाणे, बटर पेपर्सचे द्रोण खसखस दुधात भिजवून वाटावी. 
कृती : अंकुरीत (मोड आलेले) मूग आणि सोयाबीन, नारळ, साखर, थोडे दूध घालून मिक्‍सरमध्ये जाडसर मिश्रण करावे. नंतर सर्व मिश्रण जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात ढवळत राहावे. थोडे बेदाणे, काजू तुकडा, वेलची पूड घालून ढवळावे. नंतर मिश्रण खाली उतरवून छोटे छोटे गोळे करावे. बटर पेपरच्या द्रोणात ठेवावे. सजावटीसाठी चेरीचा वर्ख लावावा. घरगुती पौष्टिक मिठाई तयार.

मॅंगो बासुंदी 
साहित्य : एक लिटर दूध, एक वाटी साखर, अर्धा कप रस, बदाम, पिस्ते तुकडे.
कृती : दुधात साखर घालून दूध आटवावे. घट्ट झाल्यावर (गुलाबी रंग) आल्यावर गॅसवरून उतरून थंड झाल्यावर रस, वेलची पावडर, बदाम पिस्ते घालावे. मुलांना नक्की आवडेल.

हेल्दी सुपारी
साहित्य :  पाव किलो बडीशेप, धनाडाळ, तीळ ५० ग्रॅम, ओवा, ५ लवंग, ५ वेलदोडा, १ टेबल स्पून ज्येष्ठ मध, १ टेबलस्पून काळे मीठ, ५ बदाम.
कृती : कढईत बडीशेप भाजावी. ३ ते ४ मिनिटांनंतर त्यात धनाडाळ, ओवा, लवंगा, वेलदोडा, बदाम घालावे. व हे मिश्रण ३ ते ४ मिनीटे भाजावे. गार झाल्यावर मिक्‍सरमध्ये काढावे. नंतर ज्येष्ठ मध व काळे मीठ पूड मिसळावी. ही सुपारी लहान मुलांना व वृद्धांनाही चालते. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या