चटकदार पदार्थ

सुरेखा भिडे, पनवेल
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

समोसा चाट
साहित्य : एक वाटी उकडलेले छोले, छोले मसाला १ टेबल स्पून, २ टोमॅटोची प्युरी, ५-६ लसूण पाकळ्या कुटलेल्या, कांदा १ बारीक चिरलेला, १ टोमॅटो बारीक चिरलेला, चाट मसाला, बारीक शेव, कोथिंबीर बारीक चिरलेली, तेल - हळद, दही, चिंचेची चटणी, तिखट
कृती : कढईत तेल घालावे, मग टोमॅटो प्युरी व लसूण घालून परतावे. त्यात उकडलेले छोले, हळद, तिखट, छोले मसाला, मीठ घालून उसळ करावे. थोडी उसळ रसदार हवी. प्लेटमध्ये देताना पहिले समोसाचा जरा चुरा करावा. त्यावर उसळ घालावी. नंतर दही, चिंचेची चटणी, थोडं तिखट, चाट मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेव घालून सर्व्ह करावे.

टिक्की आलू चाट
साहित्य : पाच-सहा उकडलेले बटाटे , चाट मसाला, गरम मसाला, तिखट, टोमॅटो बारीक चिरलेला, दही, चिंचेची चटणी, कोथिंबीर, मीठ, तेल, हिरवी चटणी (कोथिंबीर, मिरची, लसूण, लिंबू रस, मीठ, साखर घालून ग्राइंड करावे हिरवी चटणी तयार) तेल - थोडं, सजावटीसाठी शेव
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करावे. त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला व थोडी कोथिंबीर घालून मिक्‍स करावे.  टिक्की बनवावी. टिक्की तव्यावर लालसर दोन्ही बाजूनी झाली की गॅस बंद करावा. प्लेटमध्ये पाच-सहा टिक्की, त्यावर दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, चाट मसाला, थोडं तिखट, कोथिंबीर, शेव घालून सर्व्ह करावे.
टीप : पाणीपुरीच्या पुऱ्या पण चुरा करून चाटमध्ये घालू शकता. छान लागते.

मॅगी पकोडा
साहित्य : मॅगी पाकीट १ (मॅगी बनवून घ्यावी) बेसन, मीठ, तेल, तिखट थोडं, कोथिंबीर
कृती : भजीला पीठ भिजवतो तसं भिजवावे. बेसनामध्ये मीठ, तिखट व कोथिंबीर घालून थोडं सरसरीत पीठ करावे. मॅगी बनवून ठेवली आहे ती थोडी थोडी पिठात घालून भजी तयार करावी व तेलात तळावी. ही भजी शेजवान सॉसबरोबर खायला घ्यावी.

चपाती सॅंडविच
साहित्य : चपाती ३-४, अर्धी वाटी कोबी (पत्ता कोबी), अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी सिमला मिरची बारीक चिरलेली, अर्धी वाटी पनीर किसलेले, मीठ, तेल, चीज, क्‍युब, टोमॅटो सॉस, चिली सॉस (रेड चिली सॉस), मिरी पावडर
कृती : तेलावर कोबी, गाजर, सिमला परतावे. मग पनीर घालावे. मीठ, चिली सॉस व काळी मिरी घालावी. भाजी तयार. चपातीला टोमॅटो सॉस, चिली सॉस लावावा. एका बाजूला भाजी घालावी. चीज किसून घालावे. चपातीची दुसरी बाजू बंद करावी. मग तेलावर वरून खालून लाल होऊ द्यावी. सॉससोबत खायला घ्यावी.

आलू पुरी
साहित्य : उकडलेले २ बटाटे, कणीक किंवा मैदा, हिरवी मिरची, ओवा, जिरे, थोडं तिखट, हिंग, हळद, पुदिना व कोथिंबीर, मीठ चवीनुसार, बटर किंवा तेल थोडं गरम करून मोहनसाठी घालावे.
कृती : बटाटे स्मॅश करावे. त्यात मैदा किंवा कणीक घालावी. बाकी सर्व साहित्य, मिरचीचे तुकडे, जिरे, ओवा, पुदिना, कोथिंबीर, मीठ, तिखट, बटर किंवा तेल थोडं मोहनसाठी घालावे. सर्व मिक्‍स करून घट्ट गोळा करावा. मग तेलात छोट्या-छोट्या पुऱ्या तळून घ्याव्यात. पुरीसोबत खाताना दह्याचे रायता द्यावे. रायता दही एक वाटी थोडी साखर, मीठ, तिखट, पुदिना व कोथिंबीर बारीक चिरलेली. हे रायता पुरीसोबत खूपच छान लागते.

इडली चाट
साहित्य व कृती : पाच-सहा इडल्या बनवून घ्याव्यात. तूप, दही, गोड चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर, चाट मसाला इडलीचे तुकडे करून तूप/ तेलात तळून घ्यावे. मग त्यात तुकडे वर दही गोड चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमॅटो शेव घालून सर्व्ह करावे. वरून थोडी कोथिंबीर घालावी. मुलं आवडीने खातील.

पाणीपुरी
साहित्य : एक पॅकेट पुरी (बाजारात तयार पुरी मिळते), एक छोटं पॅकेट जलजीरा, पाच-सहा उकडलेले बटाटे, अर्धी वाटी उकडलेले चणे, मिरची पावडर, कोथिंबीर, पुदिना, धने पावडर, काळं मीठ, चिंचेची गोड चटणी, चिंचेचे पाणी (चिंच भिजत घालून, कोळून पाणी तयार करणे)
पाणीपुरीचं पाणी : चिंचेचे पाणी त्यात एक पॅकेट (छोटं) जलजीरा मिक्‍स करणे. थोडी चवीला साखर, धने पावडर, काळं मीठ, कोथिंबीर व पुदिना ग्राइंड करून त्याचे पाणी, चाट मसाला घालून पाणी तयार करणे, बटाटा उकडून स्मॅश करणे, त्यात उकडलेले चणे, तिखट, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ घालून एकजीव करणे मग २-३ चमचे पाणीपुरीचं पाणी घालून परत एकजीव करणे, पुरी वरून फोडून त्यात बटाटेचं मिश्रण गोड चटणी व पाणीपुरीचं पाणी घालून सर्व्ह करावे. वरून बारीक कांदा व शेव घातला, की पाणीपुरी खूपच सुंदर लागते.

लाल भोपळ्याची पुरी
साहित्य : लाल भोपळा २-३ वाटी बारीक तुकडे, कणीक, २-३ चमचे बेसन, आलं पेस्ट, हिरवी मिरची, ओवा एक टीस्पून, मोहनसाठी तेल, मीठ, पुरी तळायला तेल, कोथिंबीर बारीक चिरलेली, तिखट
कृती : लाल भोपळा उकडून कुस्करून करावा. त्यात कणीक, बेसन, आलं पेस्ट, हिरवी मिरची, तिखट, मीठ, तेलाचे मोहन, कोथिंबीर घालून कणी भिजवावी, नंतर १० मिनिटांनी तेलात पुरी तळावी. सोबत लोणचं व गोड दही घ्यावे. छान लागते पुरी.

चायनीज पोहे
साहित्य व कृती : दोन तूप/ वाटी, बारीक चिरलेली भाजी (पत्ता कोबी, सिमला मिरची, गाजर, कांदापात) लिंबू रस, पोहे भिजवलेले मीठ, साखर, हिरवी मिरची, आल्याचे तुकडे बारीक, कढईत तेल घालावे. मग हिरवी मिरची, आलं व सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात. मग सगळं परतावे. पोहे घालावे. मीठ घालावे. साखर, लिंबाचा रस घालावा. कांदापात व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. जरा वेगळे पोहे खायला छान लागतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या