निळ्या रंगाची जादू

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 27 जुलै 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

मित्रांनो, तुम्हाला निळा रंग आवडतो? मार्क शगालच्या (Marc Chagall) या चित्राचे नाव आहे ‘द ब्लू सर्कस.’ या चित्रात वेगवेगळ्या वेशभूषा दिसतायत आणि कसरत करणारी कलाबाज दिसतेय. आणि काय काय दिसतेय? तुम्हाला जादुई आणि गंमतशीर पोशाख बनवायचा असेल तर तो कसा दिसेल?

हे रेखाटन कशाने केले असेल? तुमच्या पेन्सिल केस मध्ये ही गोष्ट असणारच! निळ्या शाईचे बॉल पेन! तुम्ही कधी बॉल पेनने स्केच केलेय? ग्रॅहम सदरलॅंड (Graham Sutherland) या चित्रकाराने व्हेनिसमध्ये हे रेखाटन केले आहे. हे स्केच त्याने एकदम पटकन काढलेय बर का!

कंबोडियातील अंकोर वाटचा हा फोटो हेल्मुट फेडरल  (Helmut Federle) याने काढला आहे. निसर्गाने या मंदिराचा ताबा घेतलाय असे वाटतेय ना? झाडांचे फोटो काढण्यासाठी फेडरल जगभर फिरला. निळे झाड पाहायला विचित्र वाटतेय का? हा फोटो दिवसा काढला असेल की रात्री? 

रॉजर हायरॉन्स (Roger Hiorns) कॉपर सल्फेटचा द्राव खोलीत असलेल्या गोष्टींवर पसरवतो आणि जेव्हा हा द्राव उडून जातो तेव्हा हे चकमकणारे निळे क्रिस्टल त्यावर उमटतात! या निळ्या स्फटिकाचा पृष्ठभाग कसा असेल? हा निळा रंग कसा बनत असेल? तुमच्या घरातील कोणती वस्तू चमकदार बघायला आवडेल?

डोंगर दिसती दुरून निळे 
अन दारिया दिसतो निळा 
आणि सावळ्या वनात नाचे 
थुई थुई मोर निळा 
- श्‍यामला वनारसे

फोटो फीचर

संबंधित बातम्या