रेनी शॉपिंग

समृद्धी धायगुडे
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा
पावसाळ्याच्या दिवसांत मनात शॉपिंग करायचे नसले तरी करावेच लागते. कारण इतर सीझनला वापरल्या जाणाऱ्या गोष्टी पावसात सहज वापरता येत नाहीत. यासाठीच आपण पावसाळ्यात ‘सदा सुखी’ राहण्यासाठी काही मस्ट ॲक्‍सेसरीज नक्कीच खरेदी करतो. पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मॉन्सून शॉपिंग लिस्टमध्ये छत्री, रेनकोट आणि फुटवेअर्स यांसारख्या वस्तूंचा प्रामुख्याने समावेश असतो. तुम्हीही या वस्तू अजून खरेदी केल्या नसतील आणि शॉपिंगला जाणार असाल तर पुढील काही ट्रेंडिंग टिप्स लक्षात ठेवा. 

 कलरफुल छत्र्या : पावसात हमखास वापरली जाणारी वस्तू म्हणजे छत्री. तीसुद्धा आता साधीसुधी राहिली नसून एकदम कलरफुल, डिझायनर आणि स्टायलिश झाली आहे. यामध्ये ग्राफिक्‍स छत्र्यांबरोबरच बॉटल्स असणाऱ्या छत्र्या ट्रेडिंगमध्ये आहेत. तसेच फुले असलेल्या ब्राइट कलर्स मधील आणि कॅलिग्राफी केलेल्या छत्र्याही सुरेख दिसतात. आश्‍चर्य म्हणजे तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांसाठीदेखील बाजारात छत्र्या आल्या आहेत. 

 झिपर-नॉनझिपर रेनकोट : ऑफिसमध्ये जाताना किंवा दुचाकीवरून जाताना पाऊस असेल, तर रेनकोट मस्ट आहे. अशातच तुम्ही तुमच्या आवडीचा झिपर असलेला किंवा नॉनझिपर, प्रिंटेड किंवा प्लेन कलर रेनकोट खरेदी करू शकता. बाजारामध्ये सध्या अशा आणि वेगवेगळ्या स्टाइल्सचे रेनकोट उपलब्ध आहेत.

 रेनी स्पेशल फूटवेअर : पावसाळ्यामध्ये फूटवेअर सिलेक्‍शनबाबत जास्त काळजी घेतली जाते. पावसाळ्यात फूटवेअर्स खराब दिसू नयेत आणि ते ट्रेंडीही असावेत. अशा वेळी तुम्ही तुमच्या ड्रेसबरोबर मॅच होणाऱ्या फ्लिप-फ्लॉप, गमबूट्‌स, वेजेस आणि क्रॉक्‍स खरेदी करू शकता. त्या पादत्राणांमध्ये पावसाचे पाणीपण राहात नाही, तसेच दिसायलाही ट्रेंडी दिसतील.

 वॉटरप्रूफ घड्याळे : तुम्हाला मनगटी घड्याळाची सवय असल्यास आणि पावसाळ्यातही घड्याळ घालायचे असल्यास वॉटरप्रूफ घड्याळे वापरू शकता. बाजारात वेगवेगळ्या नामांकित ब्रॅंड्‌सची घड्याळे उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एखादे घड्याळ सिलेक्‍ट करू शकता.

संबंधित बातम्या