पावसा... कसं रे जमतं तुला
सोमवार, 22 जुलै 2019
चिंब पावसाळा : कविता
घन गर्द रूपात येतोस
कोसळून चिंब करतोस
डोंगर, दऱ्या, झाडं, फुलं, माणसं...
साऱ्यांच्या हाकेला साद देतोस,
रे पावसा...
कसं रे जमतं तुला?
असं निष्पक्ष वागणं,
ना भेदभाव
कुठला रंग ना गंध...
निर्मल मनानं बरसतोस
ना आकस ना अढी
रे पावसा...
कसं रे जमतं तुला?
कुणाला इजा होऊ नये
म्हणून कोसळण्या आधी गरजतोस
घात नाही करत कोणाचाच
माणसं मात्र निष्काळजी...
म्हणून तू रुसतोस?
ढगांच्या आड लपतोस?
रुसवा सोड,
भेटीला ये
रे पावसा...
कसं रे जमतं तुला?
शिकव ना माणसांना
स्वच्छ प्रेम करायला
निस्वार्थ जगायला
आणि
अमूल्य ठेव जपायला
शिकव ना तुझ्यासारखं निर्मळ व्हायला...
हे तुलाच जमेल...
रे पावसा!