रे सख्या... पावसा...

वैशाली मोहिते
सोमवार, 22 जुलै 2019

चिंब पावसाळा : कविता
 

खिडकीतूनच तुला येताना पाहिलं
मग काय?
अरे, कित्ती धांदल माझी;
हातातली काम सोडून,
धावत येते अंगणात...
अस्सा अगदी सक्काळीच...
तर नकोच येत जाऊस रे; 
अस्सा दाटून आलास की,
भलती गडबड उडते...
आणि... आणि
साऱ्या नजरा चुकवून..
तुला भेटणं 
जरा अवघडच होतं बघ...

कळत रे तुझंही म्हणणं...
पण वळत नाही बघ;
तू ही येतोसच रे...
डोंगर, दऱ्या ओलांडून,
पण मी माझ्यातच गुंतलेली...
तुला कोसळायचं असतं
पण... मग,
नुसताच रिमझिमून जातोस
जरा दुपारचा ये ना 
कोसळ ना भरभरून
सारी तगमग 
पिऊन घे...माझी...
माती इतकीच;
मीही आसुसलेली असते,
तुझ्या भेटीला...

रे सख्या... पावसा...

संबंधित बातम्या