’इक्वेडोर हॅट’चा वारसा 

राेहित हरीप
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पर्यटनासाठी घराबाहेर पडल्यानंतर विविध ठिकाणांच्या स्थानिक बाजारातील गोष्टींची खरेदी ही एक न टाळता येण्याजोगी गोष्ट असते. जगभरातील स्थानिक बाजारांचा फेरफटका मारताना वेगवेगळ्या संस्कृती व परंपरांची ओळख आपल्याला या माध्यमातून होत असते. युनेस्कोच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेत या हस्तकलांचा वारसा लयास जाऊ नये म्हणून पुढाकार घेतला आहे.

दक्षिण अमेरिका खंडातील इक्वेडोर या देशात विशिष्ट पध्दतीने विणली जाणारी हॅट ’पनामा हॅट’ या नावाने जगात प्रसिध्द आहे. ही हॅट पुर्णतः हाताने विणली जाते. ही हॅट विणताना कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा किंवा हातमागाचा वापर केला जात नाही. दक्षिण अमेरिका खंडातील ’टक्वेला’ या वनस्पतीचा भुस्सा व धाग्यांच्या साह्याने ही हॅट विणली जाते. ही वनस्पती केवळ याच खंडात आढळते.

इक्वेडोर देशातील ’ला पिंटाडा’ या गावात या वैशिष्ट्यपुर्ण हॅट्‌सची निर्मीती केली जाते. संपुर्ण देशात केवळ याच गावात या हॅटची निर्मीती केली जाते. इक्वेडोर देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणसमारंभात या हॅटला मानाचे स्थान असते. आजमितीली या हॅटची किंमत काही हजार डॉलरच्या घरात जाते. थोडक्‍यात इक्वेडोरच्या संस्कृतीची ओळख असलेली ही हॅट इतके दिवस पनामा देशाच्या नावाने ओळखली जात होती. याचे कारणही मोठे रंजक आहे.

’ला पिंटाडा’ हे शहर पनामा या शहरापासून केवल १७० किलोमीटर अंतरावर आहे. अठराव्या शतकात जेव्हा दक्षिण अमेरिका खंडातून स्थलांतरितांचे लोंढे अमेरिकेत जात होते तेव्हापासून पनामा या शहराला महत्त्व प्राप्त झाले आणि येथे मोठी बाजारपेठ उभा राहिली. इक्वेडोरचे विणकर त्यांच्या मालाची याच ठिकाणी विक्री करत असल्याने ही हॅट ’पनामा हॅट’ याच नावाने जगात प्रसिध्द झाली. मात्र आता युनेस्कोने इक्वेडोरच्या विणकरांच्या कलेची नोंद घेत त्यांचे नाव आणि श्रेय त्यांना पुन्हा मिळवुन दिले आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या