चीनमध्ये हस्तिदंती वस्तंूवर बंदी

रोहित हरीप
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नोंदी
वन्यजीवांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या चीनने तिथल्या हस्तिदंती गोष्टींच्या व्यापारावर आता सरसकट बंदी आणली आहे. हस्तिदंताची खरेदी अथवा विक्री करणे चीनमध्ये कायद्याने गुन्हा ठरणार आहे.

जगात वन्य प्राण्यांचे अवयव आणि त्यांची तस्करी यांची सर्वांत मोठी अवैध बाजारपेठ चीनमध्ये आहे.

वन्यजीवांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या चीनने तिथल्या हस्तिदंती गोष्टींच्या व्यापारावर आता सरसकट बंदी आणली आहे. हस्तिदंताची खरेदी अथवा विक्री करणे चीनमध्ये कायद्याने गुन्हा ठरणार आहे. तशा प्रकारचा कायदा चीनमध्ये वन खात्याकडून तयार करण्यात आला आहे.

ही बंदी ऑनलाइन वेबसाइट्‌सवर चालणाऱ्या खरेदीलासुद्धा लागू होणार आहे. या कायद्याअंतर्गत हस्तिदंती वस्तूंची निर्मिती करणारे शेकडो कारखाने बंद करण्यात आले आहेत.

आफ्रिका खंडातून चीनमध्ये सगळ्यात जास्त हस्तिदंताची आयात केली जाते. चीनमध्ये या हस्तिदंताची वापर शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. तसेच हस्तिदंती गोष्टी घरात ठेवणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. एक किलो हस्तिदंताची किंमत काही हजार डॉलरच्या घरात जाते. 

या हस्तिदंताची मागणी पुरवण्यासाठी आफ्रिका खंडातील देशांमध्ये फार प्रचंड प्रमाणात हत्तीची शिकार केली जाते. गेल्या दहा वर्षात आफ्रिकेतील सुमारे एक लाख हत्ती या अवैध शिकारींना बळी पडले आहेत. आजमितीला आफ्रिका खंडात केवळ साडेचार लाख हत्ती उरले आहेत आणि अजूनही त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

युरोपीय देशात वन्यप्राणीविषयक नियम अत्यंत कडक असल्याने तिथे वन्य 
प्राण्यांच्या अवैध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे हा सगळा माल चीनच्या बाजारपेठेत येत असे. मात्र आता चीनच्या या सकारात्मक भूमिकेमुळे हत्तीच्या कत्तलीस नक्कीच आळा बसेल असा आशावाद जगभरातील वन्यजीव अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे.

संबंधित बातम्या