’ट्रॅव्हिस’चा अनुवादक

रोहित हरीप
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नोंदी

तंत्रज्ञानामुळे जवळ आलेले जग जोडण्यासाठी गरज असते ती समान भाषेची. जागतिकीकरणामुळे जगाच्या पाठीवरील विभिन्न प्रांतातून येणारे लोकांची या भाषेच्या अडचणीमुळे होत असलेली कुंचबणा आता दूर होणार आहेत.

तंत्रज्ञानामुळे जवळ आलेले जग जोडण्यासाठी गरज असते ती समान भाषेची. जागतिकीकरणामुळे जगाच्या पाठीवरील विभिन्न प्रांतातून येणारे लोकांची या भाषेच्या अडचणीमुळे होत असलेली कुंचबणा आता दूर होणार आहे ती ’ट्रॅव्हिस’ या छोट्या उपकरणामुळे. नेदरलॅंड देशातील ’ट्रॅव्हिस’ या छोट्या स्टार्ट अप कंपनीने या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणामुळे जगभरातील सुमारे ८० विविध भाषांचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद करणे शक्‍य होणार आहे. या उपकरणासाठी जगभरातील ज्या ऐंशी भाषांचे डिजीटलायझेशन करण्यात आले आहे

या उपकरणाची किंमत दोनशे डॉलर इतकी असून हे उपकरण बाजारात आल्यापासून सुमारे ८० हजार उपकरणांची नोंदणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे. सध्या जगभरात ज्या भाषा कमी बोलल्या जातात त्या भाषांचे ’डिजीटलाझेशन’न चे काम या ’ट्रॅव्हिस’ग्रुप कडून हाती घेण्यात आले आहे.  याआधी गुगल कंपनीकडून अशाच प्रकारच्या ’इअर बड’ चा प्रयोग करण्यात आला होता.  हे ’इअर बड’ कानात घातले की चाळीस विविध भाषांचा अनुवाद तुम्हाला समजणाऱ्या भाषेत करत असते.

संबंधित बातम्या