दूधसागरची आडवाट...

श्रीनिवास निमकर
गुरुवार, 19 जुलै 2018

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.

`नक्की कसा फोटो आहे हा, जरा सांग बरं’ फोटो पाहताना मित्रानं विचारलं. मी म्हणालो, ‘‘जरा शब्दांचा खेळ करायचा तर ‘धिस इज द टॉप द फॉल’. दूधसागर जिथून खाली झेपावतो तिथे उभं राहून काढला हा फोटो.’

दूधसागर म्हणजे मांडवी नदीवरचा गोव्यातला प्रसिद्ध प्रचंड धबधबा हे बहुतेकांना माहीतच असेल. ‘चेन्नई एक्‍स्प्रेस’ या सिनेमातल्या एका शॉटमुळे तो अधिक प्रकाशझोतात आला. या भागातल्या ‘भगवान महावीर’ अभयारण्यात भटकायचं बरेच दिवस मनात होतं. दरम्यान युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया ऊर्फ  YHAI चा सदस्य झालो. ही केंद्र सरकारच्या विभागात येणारी संस्था आहे. हिची ‘इंटरनॅशनल लाइफ मेंबरशीप’ स्वस्त आहे. या संस्थेने आयोजित केलेल्या ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व क्षेत्रातल्या सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना विशेष रजेचीही तरतूद असते. (www.yhai.com) साधारणतः १७ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान हा ट्रेक चालवला जातो. पणजीमधील ‘कंपाल स्पोर्टस