स्पर्धा परिक्षा : क्विझ

मुकुल रणभोर
गुरुवार, 8 मार्च 2018

क्विझ

 1. जगातील सर्वांत वेगवान सुपरकॉप्युटर ’Tianhe-२’ हा कोणत्या देशाने बनवला आहे?
  अ) जपान     ब) अमेरिका     क) फ्रान्स     ड) चीन 
   
 2.  खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? 
  अ) संथाली    ब) मराठी    क) मारवाडी    ड) सिंधी
   
 3. एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
  अ) शंकरराव चव्हाण      ब) शरद पवार  
  क) यशवंतराव चव्हाण     ड) वसंतदादा पाटील 
 4.  ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
  अ) मंडाले     ब) डोंगरी      क) एडन     ड) अंदमान 
 5. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? 
  अ) नीळ      ब) गहू    क) भात      ड)  गहू आणि भात 
   
 6. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्या योजनेतंर्गत शहीदांच्या कुटुंबीयांना MSRTC मध्ये नोकरी प्रदान केली जाणार आहे?
  अ) पुरंदरे शहीद सन्मान  ब) बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान क) वीर शिवाजी शहीद सन्मान   ड) मुख्यमंत्री शहीद सन्मान
   
 7. राष्ट्रपतींच्या हस्ते आपापल्या कार्यक्षेत्रात असाधारण कार्य करणाऱ्या किती महिलांचा सन्मान केला गेला?
  अ) १००     ब) २००      क) ११२      ड) १२० 
   
 8. भारताच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये स्वच्छ भारत मोहिमेच्या परिणामस्वरूप स्वच्छतेचे प्रमाण ३९ टक्के वरून वाढत -----झाले आहे.
  अ) ४५ टक्के    ब) ५० टक्के    क) ७० टक्के    ड) ७६ टक्के
   
 9. कोणत्या देशाने दृष्टिहीनांचा ‘ICC विश्वचषक २०१८’ जिंकला?
  अ) पाकिस्तान   ब) भारत   क) श्रीलंका   ड) ऑस्ट्रेलिया
   
 10. कोणत्या शहरात चौथ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) आयोजन केले जाणार?
  अ) लखनौ     ब) आग्रा     क) पणजी     ड) नवी दिल्ली
   
 11. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) केंद्र शासनाची ५१.११ टक्के भागीदारी विक्री करण्यासंबंधी कोणत्या कंपनीसोबत करार झाला?
  अ) IOL     ब) ONGC     क) HP     ड) SHELL
   
 12. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून १९ व २० जानेवारी २०१८ रोजी कुठे ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ वर केंद्रित राष्ट्रीय सल्ला कार्यशाळेचे आयोजन केले गेले?
  अ) पुणे       ब) दिल्ली       क) गुरुग्राम       ड) नोएडा
   
 13. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) च्या नविनतम जागतिक शीर्ष ५० खेळाडूंच्या क्रमवारीनुसार, भारतीय खेळाडूंसंबंधी कोणती जोडी बरोबर ठरते?
  I.  ठक्कर - मुलांच्या १५ वर्षे वयोगटाखालील गटात क्रमांक २ वर
  II. दिया चितळे - मुलींच्या १८ वर्षे वयोगटाखालील गटात क्रमांक ५ वर.
  अ) फक्त I           ब) फक्त II         क) I आणि II दोन्ही
  ड) I आणि II पैकी एकही नाही.
   
 14. कोणत्या देशाने वा समूहाने पैशाच्या हेराफेरीविरुद्ध मालमत्तेच्या अंतिम मालकांचा तपशील नोंदविण्यासाठी जगातली पहिली सार्वजनिक नोंदणीवही जाहीर केली?
  अ) भारत      ब) ब्रिटन     क) युरोपियन संघ     ड) ब्रिक्‍स
   
 15. भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण (TRAI) कडून भारतीय हवाई क्षेत्रात विमानातून प्रवासादरम्यान मोबाईल संपर्क वापरण्यास आणि इंटरनेट सेवा वापरण्यास परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच भारतीय सीमा क्षेत्रात ---------- उंचीपर्यंतचा या सेवांचा लाभ देण्याची शिफारस करण्यात आली.
  अ) १००० मीटर     ब)  २००० मीटर 
  क)  ३००० मीटर     ड) ४००० मीटर
   
 16. १५ व्या ‘मुंबई मॅरेथॉन‘ स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये कोणती जोडी चुकीची आहे?
  अ) महिला गटात - अमाने गोबेना 
  ब) पुरुष गटात - जोशुआ किपकोरिर 
  क) भारतीय महिला गटात - सुधा सिंह 
  ड) भारतीय पुरुष गटात - गोपी थोनाकल

क्विझचे उत्तर ः १) ड     २) क     ३) क     ४) क     ५) ड     ६) ब     ७) क     ८) ड     ९) ब     १०) अ     ११) ब     १२) क     १३) क     १४) ब     १५) क     १६) ब

संबंधित बातम्या