स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

मुकुल रणभोर
मंगळवार, 20 मार्च 2018

क्विझ

क्विझचे उत्तर ः १) ड   २) क   ३) ड   ४) अ   ५) क   ६) ब   ७) क   ८) क   ९) ड   १०) अ   ११) ड 
१२) ड   १३) अ   १४) ड   १५) ब

 1. अगदी कमी खर्चाच्या १० मीटर उंच आणि ५० सेंटीमीटर व्यास असलेल्या २.६ टन वजनी अग्निबाणाच्या साहाय्याने कोणत्या देशाने ३ फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या कक्षेत सूक्ष्म-उपग्रह प्रस्थापित केला?
  अ) जपान ब) चीन क) जर्मनी ड) युरोपीय संघ
   
 2. भारतीय लष्कराच्या कोणत्या पलटणाची ४ फेब्रुवारी २०१८ रोजी २५० वर्षे पूर्ण झाली ?
  अ) गढवाल रायफल्स ब) जम्मू आणि काश्‍मीर लाइट इंफंट्री 
  क) मराठा लाइट इन्फंट्री ड) कुमाऊ रेजिमेंट
   
 3. वैश्विक तापमानवाढ या विषयावर जागृती निर्माण करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने कोणते अभियान सुरू करण्यात आले?
  अ) हेल्दी ग्रीन फ्युचर       ब) सेव्ह एनव्हायर्नमेंट, सेव्ह फ्युचर
  क) गुड डीड्‌स, बिग गो, सिक्‍युअर फ्युचर    ड) ग्रीन गुड डीड्‌स
   
 4. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(MIFF-२०१८)मध्ये कोणाला व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला?
  अ) श्‍याम बेनेगल   ब) विशाल भारद्वाज   क) मीरा नायर   ड) मणी रत्नम
   
 5. ईशान्येकडील राज्यांची नैसर्गिक वायूची मागणी पूर्ण करण्याकरिता नुमालीगडमधून गुवाहाटी ते तिनसुखिया या पट्ट्यात किती लांबीची गॅस पाइपलाइन उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
  अ) १२००      ब) १३००     क) १५००     ड) २०००
   
 6. ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ : मायरोलर-कोस्टर राइड टु सक्‍सेस‘ या आत्मकथेचे लेखक कोण आहे?
  अ) राहुल द्रविड   ब) सौरव गांगुली  क) महम्मद अझरुद्दीन    ड) अजय जडेजा
   
 7. दक्षिण अमेरिकेमधील इक्वेडोर देशामध्ये घेतल्या गेलेल्या एका जनमतानुसार आता देशाच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ _____ वर्षाहून अधिक कालावधीचा नसणार, असे निश्‍चित झाले आहे.
  अ) चार     ब) सहा     क) दोन     ड) पाच   
   
 8. नव्या ११ सदस्यांच्या ‘ICC अंडर-१९ वर्ल्ड XI’ संघाचा कर्णधार कोण आहे?
  अ)पृथ्वी शॉ    ब) वॅन्डीले माक्वेतू    क) रेनॉर्ड वान टोंडर    ड) गेरॉल्ड कोएत्झी
   
 9. पाच भारतीय क्रिकेटपटूंनी ११ सदस्यांच्या ‘ICC अंडर-१९ वर्ल्ड XI’ संघात जागा मिळवलेली आहे. या पाचमध्ये कोणाचा समावेश नाही?
  अ) शुभनम गिल    ब) मनजित कार्ला    क) पृथ्वी शॉ     ड) शुभंकर पाटील
   
 10. दिल्लीच्या परिसरात डिझेल इंजिनला कधीपासून परवानगी दिली जाणार नाही?
  अ) मार्च २०१९     ब) मार्च २०२०     क) जुलै २०२०     ड) मार्च २०२१
   
 11. देशात स्टार्टअपच्या मानांकनासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तीन नवीन साधनांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या तीनमध्ये कशाचा समावेश नाही?
  अ) राज्य व केंद्रशासित प्रदेश स्टार्टअप मानांकन
  ब) भारतामधील स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा संग्रह
  क) स्टार्टअप इंडिया किट                 ड) मोबाईल स्टार्टअप सुविधा
   
 12. भारतीय बाल चित्रपट सोसायटी (CFSI) च्या अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या व्यक्तीचे नाव ओळखा.
  अ)सई परांजपे    ब) केदार शर्मा     क) नंदिता दास     ड) मुकेश खन्ना
   
 13. हैदराबादमधील कोणत्या तलावात देशातील सर्वांत मोठे फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलॅंड (FTW) तयार करण्यात आले आहे?
  अ) नेकमानपूर     ब) हुसेन सागर     क) शिवसागर     ड) हिमायत सागर
 14. कोणत्या राज्याने किन्नरांच्या कल्याणासाठी देशात प्रथमच एक विशेष मंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला?
  अ) केरळ      ब) कर्नाटक     क) पश्‍चिम बंगाल     ड) महाराष्ट्र
   
 15. कोणाला ’टाइम्स पॉवर विमेन ऑफ द इयर २०१७’ ने सन्मानित करण्यात आले?अ) मल्लिका श्रीनिवासन   ब) शबनम अस्थाना   क) चंदा कोचर   ड) विनिता बाली

संबंधित बातम्या