स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

मुकुल रणभोर
बुधवार, 21 मार्च 2018

क्विझ

क्विझचे उत्तर ः १) अ   २) क   ३) ड   ४) ब   ५) ड   ६) क   ७) क   ८) ब   ९) अ   १०) अ   ११) ब  १२) ब   १३) ड   १४) ब

१)     ‘आंतरराष्ट्रीय कोलकता पुस्तक मेळावा (IKBF)‘ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ८५ भाषांमध्ये अनुवाद केलेल्या ९४८ कवितांच्या बहुभाषिक संग्रहाचे शीर्षक काय आहे?
    अ) अमरावतीपोयटीक प्रिझम,२०१७ ब) तेलंगणापोयटीक प्रिझम,२०१७ क) बांगलादेश पोयटीक प्रिझम,२०१७     ड) कोलकता पोयटीक प्रिझम,२०१७

२)     शास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एक धातूपदार्थ खाणारा ‘_______’ जिवाणू विषारी धातूपदार्थाच्या संयुगाचे सेवन करून पचनादरम्यान दुष्परिणाम म्हणून सोन्याचे कण मागे सोडतात.
    अ) एस. स्टॅफिलोकोक ब) सॅल्मोनेला क) सी मेटॅलिड्यूरन्स ड) एसिनेटोबॅक्‍टर

३)     कथकली नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध _________यांचे एका कार्यक्रमात कलाप्रदर्शनादरम्यान मंचावरच कोसळून निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
    अ) गोविंदन कुट्टी  ब) चेमनचरी कुणीरमान नायर क) ओयूर कोचुगोविंदा पिल्लई 
ड) माधव वासुदेवन नायर

४)     अमेरिकेच्या कोणत्या खासगी संस्थेने जगातील सर्वांत शक्तिशाली अग्निबाण प्रक्षेपित केला?
    अ) टेस्ला एरोस्पेस ब) स्पेसएक्‍स 
    क) ASCO एरोस्पेस USA ड) झूस्पेस गो

५)    भारताच्या ‘अग्नी-१‘ क्षेपणास्त्रासंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?
    I - हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
    II - हे १००० किलो वजनी युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहे.
    III - या क्षेपणास्त्राचा विकास प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL) ने केला.
    अ) फक्त I     ब) फक्त II              क) फक्त III
    ड) वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही

६)     देशात होणाऱ्या ‘अखिल भारतीय व्याघ्र मोजणी-२०१८’ यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे?
    अ) C-STrIPES ब) S-STrIPES 
    क) M-STrIPES ड) X-STrIPES

७)     रेल्वेच्या पाच क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाला. या पाचमध्ये कोणत्या शहराचा समावेश नाही?
    अ) नवी दिल्ली ब) अमरावती क) मुंबई ड) कोलकता

८)     कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना (MMABY)’ राबविण्याची योजना तयार केली जात आहे?
    अ) केरळ ब) कर्नाटक क) तमिळनाडू  ड) महाराष्ट्र

९)     भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत फेब्रुवारी २०१८ पर्यंत किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF) जाहीर करण्यात आले?
    अ) ११ ब) १२  क) १३ ड)१४ 

१०) कायदा अंमलबजावणी संदर्भात सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणासाठी भारत कोणत्या देशासोबत सहकार्य करार करणार आहे?
    अ) अमेरिका ब) संयुक्त अरब अमिराती क) जपान ड) चीन

११)     कोणत्या ठिकाणी ७ फेब्रुवारी २०१८ पासून ‘महामस्तक अभिषेक महोत्सव २०१८‘ याला सुरवात झाली?
    अ) अमरनाथ ब) श्रवणबेळगोळ 
क) विंध्यगिरी ड) कुंभकोनम 

१२) केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शांती आणि लवचिकतासंबंधी रोजगार व मर्यादित कार्य (शिफारस क्र._______)’ या संदर्भात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या शिफारसीकडून अंगीकारलेले नवे दस्तऐवज संसदेत मांडण्याकरिता मान्यता दिली आहे.
    अ) १०५ ब) २०५ क) ३०५ ड) ४०५ 

१३)     आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अखत्यारित असलेल्या कोणत्या स्वायत्त संस्थेला युक्तिसंगत बनविण्यासाठी मान्यता दिली गेली?
    अ) राष्ट्रीय आरोग्य निधी (RAN) ब) जनसंख्या स्थिरता कोष (JSK) क) राष्ट्रीय कुटुंब कल्याण कोष (NFAF)
    ड) अ आणि ब

१४)     वैद्यकीय क्षेत्रात युनानी चिकित्सा प्रणालीला ‘शैक्षणिक‘ स्वरूप देण्याकरिता CCRUM चा कोणत्या देशातल्या विद्यापीठासोबत करार झाला?
    अ) नेपाळ ब) बांगलादेश क) पाकिस्तान 
    ड) संयुक्त अरब अमिराती                      

संबंधित बातम्या