स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर ः १. अ २. ब ३. ब ४. ड ५. ड ६. ब ७. क ८. अ ९. अ १०. अ ११. क १२. ब १३. अ १४. ब १५. अ १६. ब १७. ड १८. क १९. ड २०. ड
१) ललित कला अकादमीच्या अस्थायी अध्यक्ष पदी कोणाची नेमणूक करण्यात आली?
अ) एम. एल. श्रीवास्तव ब) सी. एस. कृष्णा शेट्टी
क) डॉ. कल्याण कुमार चक्रवर्ती ड) रामकृष्ण वेडला
२) अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम सारखे तंत्रज्ञान असणारी बिदौ प्रणाली कोणत्या देशाने अलीकडेच विकसित केली आहे?
अ) रशिया ब) चीन क) भारत ड) जपान
३) नीती आयोगाच्या अभ्यासानुसार भारताचा सर्वांत मागासलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणाचा क्रम लागला?
अ) विजयनगर ब) मेवात क) उस्मानाबाद ड) कडप्पा
४) केरळचा जे. सी. डॅनिअल पुरस्कार २०१७ कोणाला जाहीर झाला आहे?
अ) जे. शशिकुमार ब) एम. टी. वासुदेवन नायर
क) आय. व्ही. ससी ड) श्रीकुमारन थंपी
५) नैटवार जलविद्युत प्रकल्प टोन्स नदीवर उभारला जाणार आहे. टोन्स नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
अ) गंगा ब) महानदी क) नर्मदा ड) यमुना
६) अलीकडेच निधन झालेल्या मणिपूरच्या माजी मुख्यमंत्रीचे नाव काय आहे?
अ) इबोबी सिंग ब) आर. के. दोरेंद्र सिंग
क) एन. बीरेन सिंग ड) एल. जयंता कुमार
७) भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरचे नाव काय आहे?
अ) मुथूलक्ष्मी रेड्डी ब) नीलम कलेर
क) आनंदीबाई जोशी ड) टी. एस. सौंद्रम
८) नासा ------- ग्रहाच्या आंतरिक बाजूचा अभ्यास चालविण्यासाठी एक स्थिर लेंडर पाठविण्याची योजना तयार करीत आहे. या स्थिर लेंडरचे नाव काय आहे?
अ) इनसाइट ब) स्पार्टा क) ज्यूनो ड) स्कॉर्पिअन
९) एका अभ्यासानुसार, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रतिजैविकांचा वापर वाढला आहे. सन२०००-१५या काळात कोणत्या देशात प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर दिसून आला आहे?
अ) भारत ब) चीन क) मलेशिया ड) इंडोनेशिया
१०) अलीकडेच ‘स्पेस एक्स‘ ने पुनर्वापरायोग्य अग्निबाणाने दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठविले. हे उपग्रह कोणत्या अग्निबाणाच्या मदतीने प्रक्षेपित केले गेलेत?
अ) फाल्कन ब) स्पार्टा क) थॉर ड) स्टिकर
११) नामची मंत्रिस्तरीय शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
अ) कझाकस्तान ब) अफगाणिस्तान क) अझरबैजान ड) किरगिझस्तान
१२) अलीकडेच निधन झालेल्या विन्नी मडीकिझेला-मंडेला या ____ याचे जाहीर प्रचारक म्हणून प्रसिद्ध होत्या?
अ) महिला हक्क ब) वर्णद्वेष-विरोधी क) वैश्विक तापमान वाढ ड) एड्स
१३) हाफीज सईदच्या राजकीय पक्षाचे नाव काय ?
अ) मिल्ली मुस्लिम लीग ब) तेहरिक-ए-आझादी-ए कश्मीर
क) लष्कर-ए-तोयबा ड) हरकत उल-मुजाहिदीन
१४) कोणत्या आशियायी देशाने आयात होणाऱ्या डुक्कराचे मांस व फळे यासारख्या वस्तूंवरील शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवला?
अ) जपान ब) चीन क) म्यानमार ड) मलेशिया
१५) कोणत्या देशाने ‘डेफर्डॲक्शनफॉर चाइल्डहुड अरायवल्स (DACA)’ कार्यक्रम रद्द केला?
अ) अमेरिका ब) मेक्सिको क) जपान ड) इंग्लंड
१६) खालीलपैकी कोणते क्षेत्र भारताच्या आठ मुख्य औद्योगिक क्षेत्रात समाविष्ट नाही?
अ) कोळसा ब) अन्न प्रक्रिया क) कच्चे तेल ड) खते
१७) बाल्ली येथील ‘बहुपद्धती लॉजिस्टीक पार्क’ कोणत्या भारतीय राज्यात आहे?
अ) केरळ ब) महाराष्ट्र क) गुजरात ड) गोवा
१८) गूगल डुडलने कमलादेवी चट्टोपाध्याययांची ११५ वी जयंती साजरी केली. त्यांचा जन्म कोणत्या भारतीय शहरात झाला होता?
अ) कोलकता ब) कोट्टायम क) मंगलोर ड) बंगलोर
१९) SIDBI ने ज्या आभासी मदतनीसाची नियुक्ती केली आहे त्या आभासी मदतनीसाचे नाव काय ठेवण्यात आले?
अ) संवाद ब) बॅंक मित्र क) सजग ड) समृद्धी
२०) नासकोमचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
अ) आर. चंद्रशेखर ब) अमित जैन क) अंकित माथूर ड) देबजानी घोष