स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) अ ३) ड ४) क ५) क ६) क ७) अ ८) अ ९) ड १०) ब
११) ड १२) क १३) ड १४) क १५) ब १६) अ १७) अ १८) क
१) नासाचे ‘एक्स-प्लेन’ मोहीम नावाचे आवाज न करणारे सुपरसॉनिक विमान कोणत्या खासगी कंपनीकडून तयार केले जात आहे?
अ) रोल्स रॉईस ब) लॉकहीड मार्टिन क) एअर बस ड) स्पेस एक्स
२) भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणारी पहिली कंटेनर ट्रेन कोणत्या भारतीय राज्यामधून सुरू करण्यात आली?
अ) प. बंगाल ब) मिझोराम क) त्रिपुरा ड) आसाम
३) अक्कुयूमध्ये टर्कीचे पहिले अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाकडून उभारले जात आहे?
अ) चीन ब) भारत क) अमेरिका ड) रशिया
४) मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सीबीएसई परीक्षा प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीचे प्रमुख कोण आहेत?
अ) पी के कौल ब) एस. राजगोपाल क) व्ही. एस.ओबेरॉय ड) टी. आर. प्रसाद
५) मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे?
अ) १ लाख रुपये ब) २ लाख रुपये क) २.५ लाख रुपये ड) ३ लाख रुपये
६) नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून शोधण्यात आलेल्या सर्वांत दूरवरच्या ताऱ्याचे नाव काय आहे?
अ) अल्फा सेंटॉरी ब) प्रॉक्सीमा सेंटॉरी क) इकरस ड) प्रोसिऑन
७) राष्ट्रकुल खेळ २०१८ येथे भारताच्या बाजूने कोण ध्वजधारक होता/ती?
अ) पी व्ही सिंधू ब) मेरी कोम क) सायना नेहवाल ड) मनू भाकर
८) ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०१८’ कोणत्या देशात पार पडली.
अ) ऑस्ट्रेलिया ब) न्यूझीलंड क) इंग्लंड ड) द. आफ्रिका
९) अगस्तीमाला बायोस्फीयर रिझर्व्हमध्ये ‘फिमब्रिस्टायलीस अगस्थ्यमॅलेन्सिस’ वनस्पतीची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली. हे अभयारण्य कोणत्या दोन भारतीय राज्यांमध्ये
वसलेले आहे?
अ) महाराष्ट्र आणि गोवा ब) गोवा आणि कर्नाटक
क) कर्नाटक आणि केरळ ड) केरळ आणि तामिळनाडू
१०) कोणत्या देशाने बेट शहरात झालेल्या मोठ्या तेल गळतीनंतर आणीबाणी घोषित केली?
अ) म्यानमार ब) इंडोनेशिया क) मलेशिया ड) फिलिपाईन्स
११) रिझर्व्ह बॅंकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या चांगल्या अंदाजासाठी ________ स्थापन करण्याची घोषणा केली.
अ) डेटा इंक्वायरी लॅब ब) डेटा सिक्युरिटी लॅबॉ
क) डेटा लोकेटर लॅब ड) डेटा सायन्स लॅब
१२) भारत, जपान आणि संयुक्त राज्य अमेरिका यांची ९ वी त्रिपक्षीय बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
अ) चेन्नई ब) बंगलोर क) नवी दिल्ली ड) नवी मुंबई
१३) राष्ट्रकुल खेळ २०१८ कोणत्या खेळाडूने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले?
अ) सायना नेहवाल ब) मनू भाकर क) पी व्ही सिंधू ड) मीराबाई चानू
१४) राष्ट्रकुल खेळ २०१८ मध्ये भारताने कोणत्या क्रीडा प्रकारात पहिल्या पदकाची कमाई केली?
अ) कुस्ती ब) बॅडमिंटन क) भारोत्तलन ड) नेमबाजी
१५) डिफेन्स एक्सपोचे १० वे संस्करण कोणत्या भारतीय राज्यात भरविले जाणार आहे?
अ) महाराष्ट्र ब) तामिळनाडू क) गोवा ड) केरळ
१६) अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘RH-३००’ ध्वनी क्षेपणास्त्राचा मुख्य हेतू काय आहे?
अ) वातावरणाचा अभ्यास करणे. ब) गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभ्यास करणे
क) चंद्राचा अभ्यास करणे ड) वैश्विक स्थिती दर्शक प्रणाली
१७) आंबेडकर जयंतीनिमित्त, भारत सरकारने _______ ची घोषणा केली आहे, जे १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत राबवले जाणार आहे.
अ) ग्राम स्वराज मोहीम ब) ग्राम संविधान मोहीम
क) ग्राम समाजवाद मोहीम ड) वरील पैकी नाही.
१८) आरबीआय वित्त वर्ष २०१९ साठी देशातील आर्थिक चळवळींची आर्थिक वृद्धी मोजण्यासाठी कोणती आर्थिक पद्धत वापरणार आहे?
अ) सकल मूल्य वर्धित ब) सकल राष्ट्रीय उत्पन्न
क) सकल स्थानिक उत्पन्न ड) सकल राष्ट्रीय आय