स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर ः १) क २) क ३) ब ४) अ ५) ड ६) क ७) अ ८) ब ९) क १०) ड ११) क
१२) अ १३) क १४) ड १५) अ १६) ड १७) क १८) ब १९) क २०) अ २१) अ
१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी रिपॉझिटरी भागीदार म्हणून पुढे आल्या आहेत?
I. ॲक्सिस बॅंक II. HDFC बॅंक III. ICICI बॅंक IV. पंजाब नॅशनल बॅंक
अ) फक्त I ब) I आणि II क) II आणि III ड) वरील सर्व
२) कोणता देशाने शून्य कार्बन-अर्थव्यवस्थेत परिवर्तित होण्यासाठी सागरी क्षेत्रात तेलाच्या नवीन शोधकार्यांवर संपूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतला?
अ) सौदी अरेबिया ब) रशिया क) न्यूझीलंड ड) श्रीलंका
३) कोणत्या शहरात भारत द्वितीय ‘भारत मोबाईल कॉंग्रेस २०१८’ याचे आयोजन करणार आहे?
अ) मुंबई ब) नवी दिल्ली क) चेन्नई ड) अमृतसर
४) कोणत्या राज्यात पंतप्रधानांनी ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत देशातल्या पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले?
अ) छत्तीसगड ब) महाराष्ट्र क) आसाम ड) उत्तरप्रदेश
५) राष्ट्रकुल खेळ २०१८ मध्ये कोणत्या भारतीय महिला मुष्टियुद्धपटूने सुवर्णपदक जिंकले?
अ) कविता चहल ब) लशराम सरिता देवी क) सरजुबाला देवी ड) मेरी कोम
६) दादासाहेब फाळके पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित केल्या जाणाऱ्या अभिनेत्याचे नाव ओळखा.
अ) राजेश खन्ना ब) श्रीदेवी क) विनोद खन्ना ड) शम्मी कपूर
७) खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे?
अ) धर्मेंद्र ब) ऋषी कपूर क) जितेंद्र ड) शत्रुघ्न सिन्हा
८) ASSOCHEM ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली राजधानी क्षेत्रातील अंदाजे ८८ टक्के लोकांमध्ये ___ ची कमतरता आहे.
अ) कॅल्शिअम ब) जीवनसत्त्व क) जीवनसत्त्व ड) प्रथिने
९) कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच ग्रामीण पातळीवर बालसुरक्षा समित्या तयार करण्याची घोषणा केली?
अ) तमिळनाडू ब) आंध्रप्रदेश क) पश्चिम बंगाल ड) उत्तर प्रदेश
१०) ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तकाचे लेखक आहेत?
अ) दीपंकर गुप्ता ब) भगतसिंग क) राममोहन रॉय ड) डॉ. आंबेडकर
११) कोणत्या भारतीय शहरात सातवे ‘होम एक्सपो इंडिया’चे आयोजन करण्यात आले?
अ) चेन्नई ब) मुंबई क) ग्रेटर नोएडा ड) लखनऊ
१२) भारताच्या कोणत्या शेजारी देशाने शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला?
अ) बांगलादेश ब) नेपाळ क) म्यानमार ड) भूतान
१३) खालीलपैकी कोणत्या पत्रकाराने २०१७ या वर्षासाठी प्रतिष्ठित शॉरेंस्टाइन पत्रकारिता पुरस्कार जिंकला?
अ) बरखा दत्त ब) रविश कुमार क) सिद्धार्थ वरदराजन ड) करण थापर
१४) अलीकडेच शास्त्रज्ञांनी स्मृतीभ्रंश आजाराचा धोका वाढविणारा जनुक शोधून काढला आहे. त्या जनूकाचे नाव काय आहे?
अ) एपो ई.3 ब) एपो ई.6 क) एपो ई.2 ड) एपो ई.4
१५) विश्व हिंदू परिषदेचे नवे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे?
अ) व्ही. एस. कोकजे ब) आलोक कुमार क) प्रवीण तोगडिया ड) मोहन सिंग
१६) भारताचे पहिले बहू-उद्देशीय ‘वन धन विकास केंद्र’ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
अ) आसाम ब) महाराष्ट्र क) मध्यप्रदेश ड) छत्तीसगड
१७) उत्तराखंडचे दुसरे मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे?
अ) अलमोरा ब) बागेश्वर क) उधमसिंग नगर ड) चमोली
१८) कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेने महाराष्ट्रातील छोट्या व सीमांत शेतकऱ्यांसाठी ४२० दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले आहे?
अ) आयएमएफ ब) जागतिक बॅंक क) सॉफ्टबॅंक ड) ब्रिक्सबॅंक
१९) कोणाकडून ‘गगनशक्ती-२०१८’ युद्धसराव आयोजित करण्यात येणार आहे?
अ) भारतीय नौदल ब) भारतीय लष्कर क) भारतीय हवाई दल ड) केंद्रीय राखीव दल
२०) कोणत्या देशाने बेकायदेशीर स्थलांतरितांशी संबंधित ’कॅच अँड रिलीज’ धोरण समाप्त करण्याचा आदेश दिला?
अ) अमेरिका ब) कॅनडा क) मेक्सिको ड) ब्रिटन
२१) राष्ट्रकुल खेळ २०१८ क्रीडा स्पर्धेत भारतीय टेबल टेनिस महिला संघाने कोणते पदक मिळवले?
अ) सुवर्ण ब) रजत क) कांस्य ड) रजत आणि कांस्य