स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझचे उत्तर ः १) ड  २) ब  ३) क  ४) अ  ५) ड  ६) ब  ७) अ  ८) ड  ९) क १०) क  ११) ड  १२) क  
१३) ड  १४) अ  १५) अ  १६) क  १७) अ. १८) क  १९) ड

१.  आयसीआयसीआय बॅंकेचे गैर कार्यकारी कार्यकारणी अर्धवेळ अध्यक्ष आणि तीन वर्षांसाठी मंडळाचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाला नियुक्त केले गेले?
    अ) एस. के. पांडे   ब) एम. के. शर्मा   क) आर. के. द्विवेदी    ड) जी. सी. चर्तुवेदी

२.  जगातला दुसरा सर्वांत उंच पुतळा कोणता असेल ?
    अ) ग्रेट बुद्ध, थायलंड ब) रामनुजाचार्य, चीन  क) स्प्रिंग टेंपल बुद्ध, चीन ड) कन्फ्यूशियस

३.  सलग सातव्या वर्षी कोणते महाविद्यालय ‘भारतातले सर्वोत्तम डेन्टल महाविद्यालय‘ ठरले आहे?
    अ) मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्स, मंगलोर
    ब) गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, मुंबई
    क) मौलाना आझाद इन्स्टिट्यूट  ऑफ डेंटल सायन्सेस, नवी दिल्ली 
    ड) यापैकी नाही.

४.  राज्य व जिल्ह्यांमधील आर्थिक माहितीची गणना करण्यासाठी मापदंड अद्ययावत करण्यासाठी सरकारने १३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? 
    अ) रवींद्र एच. ढोलकिया      ब) आर. प्रसाद   क) एम. के. सिंग ड    ) राजेश ठाकूर

५.  चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा कोणी जिंकली?
    अ) भारत ब) पाकिस्तान क) न्यूझीलंड ड) ऑस्ट्रेलिया

६.  गोल्डन ग्लोब रेसमध्ये सहभाग घेणारा एकमेव आशियायी कोण आहे?
    अ) कमांडर विक्रम सिंह ब) कमांडर अभिलाष तोमी 
    क) कमांडर आकाश रॉय ड) कमांडर अविनाश गायकवाड

७.  दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय डॉक्‍टर दिन पाळला जातो?
    अ) जुलैचा पहिला दिवस ब) जुलैचा पहिला रविवार 
    क) जुलैचा दुसरा रविवार ड) जूनचा पहिला रविवार

८.  प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दरात कमतरता आणण्यासाठी कोणत्या राज्याला पुरस्कार दिला गेला?
    अ) महाराष्ट्र ब) सिक्कीम क) हरियाना ड) मध्यप्रदेश

९.   ‘कबड्डी मास्टर्स दुबई २०१८’ स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने कोणत्या देशाचा पराभव केला?
    अ) इराक ब) पाकिस्तान क) इराण ड) सौदी अरेबिया

१०.  कोणत्या उत्तर अमेरिकन देशाने अमेरिकेपासून होणाऱ्या आयातीवर शुल्क वाढवले आहे?
    अ) मेक्‍सिको ब) ब्राझील क) कॅनडा ड) पेरू

११.   आधार क्रमांकाशी पॅन जोडण्यासाठी नवी अंतिम मुदत काय आहे?
    अ) ३१ डिसेंबर २०१८ ब) ३१ जुलै २०१८   क) १ जानेवारी २०१९  ड) ३१ मार्च २०१९

१२.   कोणता दिवस ‘जीएसटी दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे?
    अ) १ ऑगस्ट ब) १ जून क) १ जुलै ड) १ डिसेंबर

१३.   अलीकडेच संरक्षण मंत्रालयाकडे आपला अहवाल सादर करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात कार्य दलाचे अध्यक्ष कोण होते?
    अ) रतन टाटा    ब) लक्ष्मी मित्तल   क) सुनील मित्तल    ड) एन. चंद्रशेखरन

१४.     युनेस्कोचे जागतिक वारसा ठिकाण म्हणून नुकतीच जाहीर करण्यात आलेली व्हिक्‍टोरिया गॉथिक अँण्ड आर्ट डेको इमारत कोणत्या शहरात आहे?
    अ) मुंबई    ब) पणजी     क) कोलकता     ड) बंगलोर

१५.     मलेशियन ओपन २०१८ स्पर्धेचे पुरुष एकेरीचे जेतेपद कोणी पटकावले?
    अ) व्हिक्‍टर अक्‍सेलसन ब) व्यन हो सन   क) लो चॅंग वेई ड) सीमंत्रा डेलकू

१६.    सामंजस्य करार करणारे पहिले राज्यसभेचे सभापती कोण आहेत?
    अ) डॉ. झाकिर हुसेन ब) हमीद अन्सारी  क) व्यंकय्या नायडू ड) कृष्ण कांत

१७.     प्रतिष्ठित साहित्याच्या पुरस्काराच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या पुस्तकाने गोल्डन मॅन बुकर पारितोषिक जिंकले?
    अ) द इंग्लिश पेशंट ब) मिडनाइट्‌स चिल्ड्रन   क) द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ड) यांपैकी नाही.

१८.     जुलै २०१८ मध्ये आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली?
    अ) नऊ ब) पाच क) चार ड) सात

१९.    इंडोनेशियात सबंग बंदरात प्रवेश करणारी कोणती पहिली-वाहिली भारतीय युद्धनौका आहे?
    अ) आयएनएस कलवरी ब) आयएनएस अरिहंत  क) आयएनएस विक्रांत ड) आयएनएस सुमित्रा

संबंधित बातम्या