स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
१) संरक्षण, माहिती व संपर्क तंत्रज्ञान (ICT) च्या विविध क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकासासाठी जबाबदार DRDO अंतर्गत बंगलोरमधील प्रमुख विभागाचे नाव काय आहे?
अ) कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स केंद्र ब) प्रगत प्रणाली प्रयोगशाळा क) संरक्षण प्रयोगशाळा ड) संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स अनुप्रयोग प्रयोगशाळा
२) भारत कोणत्या देशाकडून होणाऱ्या बदाम, सफरचंदसारख्या वीस उत्पादनांच्या आयातीवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढविणार आहे ?
अ) चीन ब) ब्राझील क) बांगलादेश ड) अमेरिका
१) संरक्षण, माहिती व संपर्क तंत्रज्ञान (ICT) च्या विविध क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकासासाठी जबाबदार DRDO अंतर्गत बंगलोरमधील प्रमुख विभागाचे नाव काय आहे?
अ) कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स केंद्र ब) प्रगत प्रणाली प्रयोगशाळा क) संरक्षण प्रयोगशाळा ड) संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स अनुप्रयोग प्रयोगशाळा
२) भारत कोणत्या देशाकडून होणाऱ्या बदाम, सफरचंदसारख्या वीस उत्पादनांच्या आयातीवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढविणार आहे ?
अ) चीन ब) ब्राझील क) बांगलादेश ड) अमेरिका
३) कोणत्या विद्यापीठाने अल्बाट्रॉस पक्ष्याप्रमाणे उडू शकणारे रोबोटिक ग्लायडर तयार केले आहे?
अ) एमआयटी, अमेरिका ब) स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका क) आयआयएससी, बंगलोर ड) आयआयटी, चेन्नई
४) चीनने अलीकडेच क्युक्यीयो रिले उपग्रह प्रक्षेपित केला आहे. हा कशाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणार आहे?
अ) चंद्र ब) मंगळ क) गुरू ड) सूर्य
५) कोणत्या वर्षी भारतीय मंत्रिमंडळाकडून राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार धोरणाला मान्यता मिळाली?
अ) २०१२ ब) २०१५ क) २०१६ ड) २०१८
६) सर्वोच्च न्यायालयाच्या मते, पोलिस महानिर्देशक (DGP) पदाचा किमान कार्यकाळ किती वर्षांचा असावा?
अ) ५ वर्षे ब) २ वर्षे क) ७ वर्षे ड) ३ वर्षे
७) खालीलपैकी कोणता देश आशिया-प्रशांत व्यापार कराराचा (APTA) भाग नाही?
अ) मंगोलिया ब) रिपब्लिक कोरिया क) पाकिस्तान ड) श्रीलंका
८) आशिया-प्रशांत व्यापार करार (APTA) हा _______ म्हणून ओळखला जातो.
अ) बॅंकाँक करार ब) दिल्ली करार
क) बॉम्बे करार ड) कोलंबो करार
९) कोणत्या ठिकाणी राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद-२०१८ आयोजित केली गेली?
अ) मकाऊ ब) दिल्ली क) मॉस्को ड) बीजिंग
१०) इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर संस्थेकडून त्यांच्या रेड डेटा बुकमध्ये ‘कोआला भालूला’ कोणत्या श्रेणीत वर्गीकृत केले आहे?
अ) नामशेष ब) कमीतकमी चिंतनशील
क) अत्यंत संकटग्रस्त ड) पुरेशी
११) इंजिनिअरिंग आणि फिजिकल सायन्सेस रिसर्च कौन्सिल (EPSRC) ही कोणत्या देशाची संशोधन परिषद आहे?
अ) अमेरिका ब) भारत क) ब्रिटन ड) फ्रान्स
१२) भारतीय पोलिस सेवांसाठी कर्मचारी महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
अ) लखनौ ब) बंगळूर क) हैदराबाद ड) दिल्ली
१३) जागतिक वारसा समितीची २०१८ या वर्षाची ४२ वी बैठक कुठे आयोजित केली गेली?
अ) दोहा ब) मनामा क) अबुधाबी ड) दुबई
१४) कोणत्या राज्य सरकारने ‘अन्नपूर्णा दुग्ध योजना’ सुरू केली आहे?
अ) गुजरात ब) राजस्थान क) मध्यप्रदेश ड) हरियाना
१५) पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक NPA समाविष्ट असलेल्या प्रकरणांना हाताळण्यासाठी संपदा व्यवस्थापन कंपनी / पर्यायी गुंतवणूक कोष (AIF) च्या ठरावाची शिफारस कोणी केली?
अ) एस. मुंद्रा समिती ब) सुनील मेहता समिती
क) आर. के. साहनी समिती ड) स्वामिनाथन समिती
१६) कोणत्या वर्षाच्या जनगणनेदरम्यान माहिती इलेक्ट्रॉनिकरित्या संग्रहित केली जाणार आहे?
अ) २०११ ब) २०२१ क) २०३१ ड) २०३५
१७) कोणत्या ठिकाणी १७ वी ‘जागतिक पोलिस व अग्निशामक खेळ’ ही स्पर्धा खेळली गेली?
अ) सिंगापूर ब) कॅलिफोर्निया क) दिल्ली ड) केपटाऊन
१८) बॅंक बोर्ड ब्युरो (BBB) भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. कोणत्या समितीने याची शिफारस केली होती?
अ) पी. जे. नायक समिती ब) भगवती समिती
क) ए. सी. शाह समिती ड) सुनील मेहता समिती
१९) भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) कोणत्या संस्थेला आयडीबीआय बॅंकेत हिस्सेदारी वाढविण्यासाठी मंजुरी दिली?
अ) लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
ब) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
क) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
ड) रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
क्विझचे उत्तर ः १) अ २) ड ३) अ ४) अ ५) क ६) ब ७) क ८) अ ९) ब १०) अ ११) क १२) क १३) ब १४) ब १५) ब १६) ब १७) ब १८) अ १९) अ