स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर ः १) ड २) ब ३) अ ४) अ ५) ब ६) क ७) ब ८) ब ९) ड १०) ड ११) क १२) क १३) अ १४) ड १५) अ १६) क १७) ब १८) क १९) अ २०) अ
१) बीएसएनएलचे ग्राहक देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कंपनीच्या मोबाईल ॲपचा उपयोग करून कॉल करू शकतील. त्या ॲपचे नाव काय आहे?
अ) बर्डन ब) फायर क) विंड ड) विंग्ज
२) टारगेट ऑलिंपिक पोडियम (TOPS) योजनेच्या अंतर्गत पुरुष हॉकी संघाच्या सर्व १८ सदस्यांसाठी प्रत्येकी मासिक भत्ता किती आहे?
अ) एक लाख रुपये ब) पन्नास हजार रुपये क) दोन लाख रुपये ड) सत्तर हजार रुपये
३) कोणत्या राज्य शासनाने ’सीमा दर्शन’ या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे?
अ) गुजरात ब) जम्मू आणि काश्मीर क) राजस्थान ड) मध्यप्रदेश
४) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाप्रमाणे वर्ष २०१८ जगाचा सरासरी वृद्धीदर किती अपेक्षित आहे?
अ) ३.९ टक्के ब) ५ टक्के क) २ टक्के ड) ९ टक्के
५) ‘जागतिक बॅंक रॅंकिंग-२०१७’ मध्ये भारत कितवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली?
अ) पाचवी ब) सहावी क) तिसरी ड) दहावी
६) ‘स्टार्टअप इंडिया यात्रा’ उपक्रमाचा तंत्रज्ञान भागीदार कोण आहे?
अ) शॉर्टफाइल ब) श्रोते क) श्रोफाइल ड) श्रोतेहो
७) आयडिया आणि कोणत्या कंपनीचे संयुक्त कामकाज १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे भांडवल असणारी देशातली सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी तयार करेल?
अ) एअरटेल ब) व्होडाफोन क) जिओ ड) बीएसएनएल
८) O-SMART योजना प्रामुख्याने _______ या विषयावर लक्ष केंद्रित करणार.
अ) स्मार्ट शेतीला प्रोत्साहन ब) महासागराच्या विकासाचे उपक्रम क) सेंद्रिय शेती ड) मोफत ई-अभ्यासक्रम
९) कोणत्या भारतीयास संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले आहे?
अ) शशी थरूर ब) प्रज्ञा झा क) ए. मोहंती ड) सत्य एस. त्रिपाठी
१०) आंतरराष्ट्रीय अणु-चाचणी विरोधी दिन केव्हा पाळला जातो?
अ) १ ऑगस्ट ब) ९ ऑगस्ट क) २८ ऑगस्ट ड) २९ ऑगस्ट
११) खालीलपैकी कोणता अन्न-घटक अन्नधान्यांच्या गटात मोडत नाही?
अ) गहू ब) ज्वारी क) ऊस ड) कडधान्ये
१२) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकारी संघ (SAARC) कृषी सहकार व्यवसाय संघाची प्रथम बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?
अ) भारत ब) भूतान क) नेपाळ ड) चीन
१३) राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा पाळला जातो?
अ) २९ ऑगस्ट ब) ३० ऑगस्ट क) ३१ ऑगस्ट ड) १ सप्टेंबर
१४) ऑगस्ट -२०१८ मध्ये भारत सरकार आणि जागतिक बॅंक यांच्यात ३०० दशलक्ष डॉलरचा कर्ज करार झाला. हा निधी कोणत्या कारणासाठी वापरला जाणार आहे?
अ) जैवइंधनाचे उत्पादन
ब) पवन ऊर्जेची निर्मिती क) सौर पटलाचे उत्पादन
ड) निवासी आणि सार्वजनिक क्षेत्रात वीज बचतीसाठी उपाययोजना
१५) कोणत्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने ‘गगनयान’ अंतराळात पाठवली जाणार?
अ) GSLV Mk-३ ब) GSLV Mk-२ क) PSLV Mk-२ ड) PSLV Mk-१
१६) मू. हिरो, मू. ____’ कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
अ) गुजरात ब) राजस्थान क) ओडिशा ड) मध्यप्रदेश
१७) ‘ड्रोन’च्या व्यावसायिक वापरासाठी केंद्र सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ड्रोन उडवण्याची कमाल उंची किती असणार?
अ) २०० फूट ब) ४०० फूट क) ५०० फूट ड) ६०० फूट
१८) कोणत्या देशाने महिलांचा पाचवा कॅरम विश्वचषक जिंकला?
अ) रशिया ब) श्रीलंका क) भारत ड) अमेरिका
१९) कोणत्या भारतीय बॅंकेच्या सर्वाधिक शाखा परदेशात आहे?
अ) भारतीय स्टेट बॅंक ब) बॅंक ऑफ इंडिया क) बॅंक ऑफ बडोदा ड) पंजाब नॅशनल बॅंक
२०) झिंबाब्वेचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत?
अ) एमर्सन मनांगग्वा ब) नेल्सन चमिसा क) रॉबर्ट मुगाबे ड) नेल्सन एडहूर