स्पर्धा परिक्षांचा गेटवे

विष्णू फुलेवार
शनिवार, 8 डिसेंबर 2018

क्विझ
क्विझचे उत्तर :  १) क   २) ब  ३) अ   ४) ब  ५) क  ६) क  ७) ड  ८) अ  ९) ब  १०) क  ११) अ  
१२) क  १३) ड  १४) ब  १५) अ  १६) अ  १७) ड  १८) ब  १९) ब   २०) क  २१) ड

१)     कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय प्रतिस्पर्धा आयोग कार्य करते?
    अ) वाणिज्य व उद्योग मंत्रालय ब) वित्त मंत्रालय
    क) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ड) गृहमंत्रालय

२)     कोणाची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे (CCI) नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
    अ) सुधीर मित्तल ब) अशोक कुमार गुप्ता 
    क) एस. के. भूषण ड) दिनेश पचौडी

३)     कोणत्या दिवशी दरवर्षी सार्वजनिक सेवा प्रसारण दिन पाळला जातो?
    अ) १२ नोव्हेंबर ब) ११ डिसेंबर क) १३ मार्च ड) २१ एप्रिल

४)     प्रथम महायुद्ध समाप्त करण्यासाठी १९१८ मध्ये झालेल्या शांती कराराच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी कोणत्या युरोपीय शहरात एक समारंभ आयोजित करण्यात आला?
    अ) लंडन ब) पॅरिस क) हेग ड) ब्रुसेल्स

५)     कोणत्या देशात ३३व्या आशियान शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले?
    अ) मलेशिया ब) इंडोनेशिया क) सिंगापूर ड) ब्रुनेई

६)     कोणाच्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो?
    अ) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम ब) के सी पंत
    क) मौलाना अबुल कलाम आझाद ड) जे आर डी टाटा

७)     कोणत्या राज्यात ‘पंचायत राज’ व्यवस्थेची पहिल्यांदा अंमलबजावणी झाली?
    अ) बिहार ब) आसाम क) महाराष्ट्र ड) राजस्थान

८)    कोणत्या दक्षिण आशियायी देशाची संसद ९ नोव्हेंबर रोजी बरखास्त करण्यात आली?
    अ) श्रीलंका ब) नेपाळ क) बांगलादेश ड) म्यानमार

९)      कोणत्या देशात ११ वी ‘आशियायी एअरगन अजिंक्‍यपद’ ही क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आली?
    अ) सुदान ब) कुवेत क) इराण ड) पाकिस्तान

१०)     नोव्हेंबर २०१८ मध्ये भारतीय लष्करात कोणती हॉवित्झर तोफ समाविष्ट करण्यात आली?
    अ) FH७०० हॉवित्झर ब) FH७० हॉवित्झर 
    क) M७७७ हॉवित्झर ड) M७०० हॉवित्झर
११)     कोणत्या देशात ‘वैश्विक शीतकरण अभिनवता शिखर परिषद २०१८’ आयोजित करण्यात आली?
    अ) भारत ब) चीन   क) जपान   ड) रशिया

१२)     तालिबानशी समेट घडवून आणण्यासाठी कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय शांती चर्चा आयोजित केली गेली?
    अ) इराण ब) इराक क) रशिया ड) पाकिस्तान

१३)     कोणत्या ग्रहाच्या ‘ट्रोजन’ या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा २०२१ मध्ये ‘लुसी मिशन’ पाठवणार आहे?
    अ) मंगळ ब) शनी क) शुक्र ड) गुरू

१४)     कोणती सरकारी संस्था ‘पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री’ची स्थापना करीत आहे?
    अ) सेबी ब) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया 
    क) वित्त मंत्रालय ड) यापैकी नाही

१५)     कोणत्या देशाने जगातले पहिले सार्वभौम ‘ब्ल्यू बॉण्ड’ सादर केले?
    अ) सेशेल्स ब) म्यानमार क) सिंगापूर ड) पनामा

१६)    कोणत्या राज्य सरकारने ‘सौर जलनिधी योजना’ सुरू केली आहे?
    अ) ओडिशा ब) बिहार क) उत्तर प्रदेश ड) राजस्थान

१७)    ‘वैश्विक उपासमार निर्देशांक २०१८’ यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?
    अ) १०० ब) ११९ क) ७६ ड) १०३ 

१८)     एकोणपन्नासावा ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता?
    अ) महाराष्ट्र ब) गोवा क) कर्नाटक ड) मध्यप्रदेश

१९)    भारतात कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय विधी दिन’ साजरा केला जातो?
    अ) २५ नोव्हेंबर ब) २६ नोव्हेंबर क) २६ जानेवारी ड) २२ जानेवारी

२०)     अणुऊर्जा नियामक मंडळाचे (AERB) अध्यक्ष म्हणून कोणत्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाला नियुक्त करण्यात आले आहे?
    अ) डी. के. शुक्‍ला ब) जी. के. नाथ 
    क) एन. आर. गुंटूर  ड) डी. व्ही. खाखर

२१)     नोव्हेंबर २०१८ मध्ये कोणता केंद्रीय सार्वजनिक उपक्रम ‘मिनीरत्न’ बनवला गेला आहे?
    अ) भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड ब) इंजिनिअर्स लिमिटेड इंडिया क) ऑइल इंडिया लिमिटेड ड) राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ
 

संबंधित बातम्या