स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
क्विझचे उत्तर ः १) अ २) क ३) अ ४) ड ५) ड ६) अ ७) ड ८) क ९) अ १०) ब
११) क १२) ड १३) क १४) ड १५) क १६) अ १७) ड १८) क १९) क २०) ड
१) कोणत्या मंत्रालयाने ‘मिशन रक्षा ज्ञान शक्ती’ नावाचा कार्यक्रम सुरू केला?
अ) संरक्षण मंत्रालय ब) महिला व बालविकास मंत्रालय
क) वाणिज्य व उद्योग मंत्रालय ड) गृहमंत्रालय
२) ‘मेकिंग ऑफ न्यू इंडिया: ट्रान्सफॉर्मेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अ) निर्मला सीतारामन ब) ऊर्जित पटेल
क) बिबेक देबरॉय ड) सुषमा स्वराज
३) सत्तावीस नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कशासंबंधी फसवणुकीसाठी बंदीचा कालावधी दुप्पट केला?
अ) वय ब) सट्टा क) फिक्सिंग ड) चेंडूशी छेडछाड
४) ‘वर्ष २०१८ चा शब्द’ म्हणून डिक्शनरी डॉट कॉमने कोणत्या शब्दाची निवड केली?
अ) डिसइन्फॉर्मेशन ब) टेररिझम क) फेक ड) मिसइन्फॉर्मेशन
५) नासाचे कोणते अंतराळयान २६ नोव्हेंबरला मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले?
अ) जुनो ब) स्पिरीट क) ओरीअन ड) इनसाइट
६) कोणती बॅंक ‘PAiSA’ (पोर्टल फॉर अफोर्डेबल क्रेडिट अँड इंटरेस्ट सबव्हेंशन ॲक्सेस) याची केंद्र संस्था आहे?
अ) अलाहाबाद बॅंक ब) आयसीआयसीआय बॅंक
क) भारतीय स्टेट बॅंक ड) पंजाब नॅशनल बॅंक
७) नवा प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कृती दलाचे संयोजक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
अ) बी. चंद्रकला ब) अरुणा सुंदराजनॉ
क) के. जी. तिवारी, ड) अखिलेश रंजन
८) कोणता देशासोबत भारताने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी कर चुकवेगिरीला प्रतिबंध करण्यासंदर्भात द्विपक्षीय कर संधीमध्ये दुरुस्ती केली?
अ) इंडोनेशिया ब) सिंगापूर क) चीन ड) ब्राझील
९) मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
अ) ६ वर्षे ब) ५ वर्षे क) ४ वर्षे ड) ३ वर्षे
१०) नोव्हेंबर २०१८ मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
अ) ओ. पी. रावत ब) सुनील अरोरा
क) अंशुल मिश्रा ड) बी. चंद्रकला
११) ‘हौसला २०१८‘ हा बाल संगोपन संस्थांच्या मुलांसाठी आयोजित राष्ट्रीय महोत्सव कोणत्या मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे?
अ) गृह मंत्रालय ब) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
क) महिला व बाल विकास मंत्रालय ड) ब आणि क
१२) ‘ज्येष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद’ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय कोण आहे?
अ) सुनीती चौहान ब) आशा ढोलकिया
क) राधा एस. चंद ड) भवानी देवी
१३) कोणत्या देशाने ‘टी-२० महिला विश्वचषक २०१८’ या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
अ) इंग्लंड ब) पाकिस्तान क) ऑस्ट्रेलिया ड) वेस्ट इंडिज
१४) कोणत्या शहराची संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘वैश्विक शाश्वत शहरे २०२५’ पुढाकारासाठी निवड करण्यात आली आहे?
अ) नोएडा ब) ग्रेटर नोएडा क) अमृतसर ड) अ आणि ब
१५) कोणत्या महिला क्रिकेटपटूची ‘आयसीसी महिला विश्वचषक टी-२० XI’ संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे?
अ) मेग लॅनिंग ब) एलिस पेरी क) हरमनप्रीत कौर ड) मिताली राज
१६) भारतातली सर्वांत मोठी तेल कंपनी कोणती आहे?
अ) इंडियन ऑइल ब) भारत पेट्रोलियम
क) ओएनजीसी ड) रिलायन्स पेट्रोलियम
१७) रेल्वेमंत्रीपद (सन १९९१-९५) भूषविलेल्या कोणत्या राजकारणी व्यक्तीचे निधन झाले?
अ) सी. पी. जोशी ब) मुकुल रॉय
क) दिनेश त्रिवेदी ड) सी. के. जाफर शरीफ
१८) भारतातल्या एकमेव राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या बॅंकेला माहितीचा अधिकार (RTI) कायदा याच्या अंतर्गत आणले गेले आहे. या बॅंकेचे नाव ओळखा.
अ) पंजाब व सिंध बॅंक ब) बिकानेर बॅंक
क) जम्मू व काश्मीर बॅंक ड) झाशी बॅंक
१९) भारताच्या कोणत्या राज्यात मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय आहेत?
अ) महाराष्ट्र ब) मिझोराम क) ओडिशा ड) मणिपूर
२०) ओडिशा राज्य सरकारने किती आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले आहेत?
अ) १२ ब) १३ क) १७ ड) २१