स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
गुरुवार, 17 जानेवारी 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) ड ३) ब ४) ड ५) अ ६) क ७) क ८) अ ९) ब १०) ब
११) अ १२) अ १३) अ १४) अ १५) ब १६) ड १७) ड १८) क
- ‘जीसॅट-७ए’ उपग्रह हा मुख्यतः ... आहे ?
अ) सुदूर संवेदी उपग्रह ब) दळणवळण उपग्रह क) ग्राउंड उपग्रह ड) ड्रोन उपग्रह
- कोणत्या देशाकडून २०१९ हे सहिष्णुतेचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे?अ) भारत ब) अमेरिका क) इस्राईल ड) संयुक्त अरब अमिरात
- इस्रोने नुकत्याच प्रक्षेपित केलेला ‘जीसॅट-७ए’ उपग्रह हा ........ यासाठी समर्पित आहे?
अ) भारतीय नौदल ब) भारतीय हवाई दल क) कृषी क्षेत्र ड) भारतीय तटरक्षक दल
- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ‘ELISA’तपासणी किट सादर करण्यात आले. ‘ELISA’ किट कोणता पशुरोग टाळण्यासाठी वापरले जाणार आहे?
अ) ग्लॅंडर्स ब) इक्वाइन इन्फेक्षीयस ॲनिमिया
क) क्यू ताप ड) अ आणि ब दोन्ही
- आरबीआयने ८ जानेवारीला डेबिट आणि क्रेडिट कार्डसह विविध कार्डच्या व्यवहारांसाठी टोकनायझेशन संदर्भात मार्गदर्शके जाहीर केली. टोकनायझेशन म्हणजे काय?
अ) सुरक्षित देयके प्रणाली ब) कार्डच्या देयकांवर कोणताही अतिरिक्त खर्च नाही क) कार्डद्वारे कर्ज ड) यापैकी नाही
- ‘रायसिना संवाद’हे भारतात आयोजित केले जाणारे वार्षिक ....... आहे?
अ) वैश्विक सुरक्षा मंच ब) जागतिक उपासमार निर्मूलन परिषद
क) भू-राजकीय आणि भू-धोरणात्मक परिषद ड) समुद्री जीवन बचाव परिषद
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या .......पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत?
अ) कौशिक बसू ब) व्ही. के. आर. व्ही. राव क) गीता गोपीनाथ ड) राम गोपाल
- कोणत्या शहरात ‘खेलो इंडिया युथ गेम्सचे’ आयोजन केले गेले?
अ) पुणे ब) हैद्राबाद क) दिल्ली ड) लखनऊ
- लोकसभेने अलीकडेच ‘१२४ वी घटनादुरुस्ती विधेयक-२०१९‘ संमत केले. १२४वी दुरुस्ती कशा संदर्भात आहे?
अ) नागरिकत्व ब) आरक्षण
क) आरबीआयच्या गव्हर्नरचे अधिकार ड) भारताच्या भू सीमा
- भारतीय नागरिकत्वाशी संबंधित अनुच्छेद घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे?अ) भाग पहिला ब) भाग दुसरा क) भाग तिसरा ड) भाग चौथा
- ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-२०१९’नुसार, भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी कोणत्या तारखेआधी व्यक्ती भारतात आलेली असावी?
अ) ३१ डिसेंबर २०१४ ब) १ जानेवारी २०१६
क) ३१ मार्च १९७१ ड) १२ नोव्हेंबर १९८५
- ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-२०१९’ तीन मुस्लिमबहुल राष्ट्रांकडून भारतात आलेल्या अल्पसंख्यकांना भारतीय राष्ट्रीयत्व देईल. कोणता शेजारी देश यात नाही?
अ) श्रीलंका ब) पाकिस्तान क) बांगलादेश ड) अफगाणिस्तान
- कोणत्या शहरात ‘वैश्विक एव्हिएशन शिखर परिषद २०१९ आयोजित केली जाणार आहे?
अ) मुंबई ब) बीजिंग क) न्यूयॉर्क ड) दिल्ली
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) १६ विमानतळांना कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून मुक्त म्हणून घोषित केले आहे?
अ) एकदाच वापरात येणारे प्लास्टिक ब) पुनप्रक्रियायोग्य प्लास्टिक
क) पॉलिथिन ड) यापैकी नाही.
- जगातले कोणते बंदर हे आपल्या क्षेत्राच्या बाहेर भारताद्वारे चालविले जाणारे एकमेव बंदर ठरले आहे?
अ) ग्वादर, पाकिस्तान ब) चाबहार, इराण
क) अँटवर्प, बेल्जियम ड) हो ची मिन्ह सिटी, व्हिएतनाम
- भारतातले कोणते एकमेव राज्य आहे, ज्यांनी मागास जातींसाठी ५०% पेक्षा अधिक आरक्षण प्रदान करण्याची कायदेशीररीत्या तरतूद केलेली आहे?
अ) बिहार ब) उत्तरप्रदेश क) कर्नाटक ड) तामिळनाडू
- भारत सरकारने (केंद्रीय मंत्रिमंडळ) कोणत्या श्रेणीच्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी १०% आरक्षणास मंजुरी दिली आहे?
अ) इतर मागासवर्ग ब) सामाजिक व आर्थिक मागासवर्ग
क) भटक्या जमाती ड) सामान्य
- केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार; भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर किती असण्याची अपेक्षा आहे?
अ) ७.१% ब) ८.१% क) ७.२% ड) ८.२%