स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ड २) अ ३) अ ४) ब ५) क ६) क ७) ड ८) अ ९) अ १०) ड ११) क १२) ब १३) क १४) ड १५) ब १६) ब
- कोणता देश उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) यामध्ये सामील होणारा ३०वा देश असणार आहे?
अ) मेक्सिको ब) मोरोक्को क) मोनॅको ड) उत्तर मॅकेडोनिया
- केंद्रीय मंत्रिमंडळाने ६ जानेवारी रोजी प्राप्तिकर लोकाआयुक्त आणि अप्रत्यक्ष कर लोकाआयुक्त ही संरचना समाप्त करण्याचा निर्णय घेतला. यामागील कारण काय आहे?
अ) करदात्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारत सरकार नवीन संस्था तयार करण्याचा विचार करीत आहे.
ब) लोक सरकारी संस्थांवर विश्वास ठेवत नाहीत.
क) लोक ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा पसंत करत आहेत.
ड) भारतीय कर बेसमध्ये कमी होत आहे
- कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘शहरी समृद्ध उत्सव’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे?
अ) केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालय
ब) सांस्कृतिक मंत्रालय क) भू-शास्त्र मंत्रालय ड) परराष्ट्र कल्याण मंत्रालय
- कोणत्या राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी ‘DD अरुणप्रभा’ नावाने नवीन वाहिनी सुरू करण्यात येणार आहे?
अ) आसाम ब) अरुणाचल प्रदेश
क) हिमाचल प्रदेश ड) मेघालय
- गायी आणि गोवंश याच्या संवर्धन, संरक्षण आणि विकासासाठी भारत सरकारने कोणत्या आयोगाची स्थापना करण्यास मान्यता दिली?
अ) राष्ट्रीय गोवंश आयोग
ब) राष्ट्रीय गोधन आयोग
क) राष्ट्रीय कामधेनू आयोग
ड) राष्ट्रीय गोसेवा आयोग
- पश्चिम बंगालच्या कोणत्या जिल्ह्यात कलकत्ता उच्च न्यायालयाचे परिपथ पीठ (Circuit Bench) स्थापन केले जाणार आहे?
अ) दार्जिलिंग
ब) चोविस परगणा
क) जयपालगुडी
ड) कूच बिहार
- भारतीय चित्रपट उद्योगाला नकारात्मकरित्या प्रभावित करणारा कोणता मुद्दा हाताळण्यासाठी नवीन ‘सिनेमॅटोग्राफ (दुरूस्ती) विधेयक-२०१९’ तयार करण्यात आले आहे?
अ) चित्रपटासंबंधी चोरी
ब) प्रौढांसाठीचे चित्रपट
क) कॉपीराइटचे उल्लंघन
ड) अ आणि क
- सहा फेब्रुवारीला कोणाच्या हस्ते विजेत्यांना २०१७ वर्षासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
अ) राष्ट्रपती रामनाथ कोविंद
ब) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
क) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
ड) गृहमंत्री राजनाथ सिंग
- राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) ....... या वर्षात देशभरामधील सर्व शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहे.
अ) २०१९ ब) २०२० क) २०२१ ड) २०२२
- भारताच्या ‘जीसॅट-३१’ या नव्या दळणवळण उपग्रहाचे ....... येथून प्रक्षेपण करण्यात आले.
अ) रोरी, जपान
ब) ओखोतस्क, रशिया
क) अब्दुल कलाम बेट, भारत
ड) फ्रेंच गयाना
- कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे?
अ) इंफाळ ब) गुवाहाटी क) दिल्ली ड) शीमला
- ‘राष्ट्रीय गंगा नदी (पुनरुज्जीवन, संरक्षण व व्यवस्थापन) विधेयक-२०१८’ यामध्ये केंद्र सरकारचे सशस्त्र दल म्हणून ......... याची रचना करण्याची तरतूद आहे.
अ) गंगा मॅनेजमेंट कॉर्प्स
ब) गंगा प्रोटेक्शन कॉर्प्स
क) गंगा कंजर्व्हेशन कॉर्प्स
ड) अ आणि क दोन्ही.
- भारताचा कोणता शेजारी देश दरवर्षी ४ फेब्रुवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करतो?
अ) म्यानमार ब) बांग्लादेश क) श्रीलंका ड) पाकिस्तान
- कोणत्या व्यक्तीला संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारकडून प्रथम ‘ह्युमन फ्रॅटरनिटी अवॉर्ड’ हा पुरस्कार दिला गेला?
अ) पोप फ्रान्सिस
ब) ग्रॅंड इमाम अहमद अल तैयब
क) दलाई लामा
ड) अ आणि ब
- कोणत्या आखाती देशामध्ये ‘चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस’ आणि ‘ग्रॅंड इमाम अहमद अल-तैयब मशिद’ यांच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली?
अ) सौदी अरेबिया ब) संयुक्त अरब अमिरात
क) बहरीन ड) कुवेत
- मुंबईत ४ फेब्रुवारी २०१९ रोजी कोणत्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन झाले?
अ) विजय चव्हाण
ब) रमेश भाटकर
क) किशोर प्रधान
ड) हेमू अधिकारी