स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 29 एप्रिल 2019
क्विझ
क्विझचे उत्तर
१) ब २) क ३) ड ४) क ५) ड ६) क ७) ब ८) ब ९) अ १०) ड ११) क १२) ब १३) अ १४) अ १५) अ १६) ब १७) ड १८) क १९) क २०) ब
- कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?
अ) गृह मंत्रालय
ब) युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय
क) संरक्षण मंत्रालय
ड) मनुष्यबळ विकास मंत्रालय
- कोणत्या मंत्रालयाने SHREYAS (श्रेयस) योजनेचा शुभारंभ केला?
अ) वित्त मंत्रालय ब) संरक्षण मंत्रालय
क) मनुष्यबळ विकास मंत्रालय ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
- राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार किती विभागांमध्ये दिले जातात?
अ) ४ ब) ७ क) ५ ड) ६
- कोणत्या क्षेत्रासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिले जातात?
अ) कला ब) साहित्य
क) विज्ञान व तंत्रज्ञान ड) पत्रकारिता
- उड्डयन परिषद २०१९’ या कार्यक्रमाचा विषय काय होता?
अ) उडे देश का हर नागरिक
ब) फ्लाइंग ऑल डे ऑल नाइट
क) वुई फ्लाय
ड) फ्लाइंग फॉर ऑल
- भारतीय उड्डयन उद्योग जगातला कितव्या क्रमांकाचा उद्योग आहे?
अ) पहिल्या ब) दुसऱ्या क) तिसऱ्या ड) सातव्या
- कोणत्या शहरात चौथी ‘जागतिक डिजिटल आरोग्य भागीदारी शिखर परिषद’ भरविण्यात आली?
अ) मुंबई ब) दिल्ली क) चेन्नई ड) हैदराबाद
- कोणत्या राज्यात ईशान्य भारतातल्या पहिल्या राष्ट्रीय संरचना (Design) संस्थेचे उद्घाटन केले गेले?
अ) मणिपूर ब) आसाम
क) नागालॅंड ड) सिक्कीम - ............ यांना २०१८ या वर्षासाठी ‘गांधी शांतता’ पुरस्कार देण्यात आला.
अ) योहेई ससाकावा
ब) विवेकानंद केंद्र
क) अक्षय पात्र फौंडेशन
ड) सुलभ इंटरनॅशनल
- ओडिशाच्या किनारपट्टीवर अलीकडेच यशस्वीपणे चाचणी घेतलेले QRSAM हे भारतीय क्षेपणास्त्र ........ या प्रकारचे आहे.
अ) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
ब) हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
क) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र
ड) जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
- ‘संप्रिती २०१९’ हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा वार्षिक संयुक्त लष्करी युद्धसराव आहे?
अ) नेपाळ ब) भूतान क) बांगलादेश ड) जपान
- कोणत्या सरकारी विभागाद्वारे ‘अटल जय अनुसंधान जैवतंत्र मोहीम’ सुरू करण्यात आली?
अ) कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग
ब) जैवतंत्रज्ञान विभाग
क) पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग
ड) कृषी संशोधन व शिक्षण विभाग
- नायजेरियाच्या राष्ट्रपतिपदी पुन्हा एकदा कोण निवडून आले आहेत?
अ) मुहम्मदू बुहारी ब) अटीकू अबुबकर
क) आतिफ बुहारी ड) सलमान अल कशीश
- आफ्रिका खंडाचा कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे?
अ) नायजेरिया ब) दक्षिण आफ्रिका
क) सोमालिया ड) काँगो
- कोणत्या भारतीय बुद्धिबळ खेळाडूने ‘कान्स इंटरनॅशनल ओपन चषक २०१९’ ही स्पर्धा जिंकली?
अ) अभिजित गुप्ता ब) विश्वनाथन आनंद
क) रवी कुमार ड) पंकज त्रिपाठी
- संयुक्त राष्ट्रसंघासाठी नवीन अमेरिकेच्या राजदूत या पदासाठी कोणाला नेमण्यात आले?
अ) निकी हेली ब) केली नाईट क्राफ्ट
क) इव्हान्का ट्रम्प ड) शर्मिली रॉजर
- स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या शहराला सर्वाधिक स्वच्छ राजधानी शहराचा पुरस्कार देण्यात आला?
अ) मुंबई ब) भुवनेश्वर क) जयपूर ड) भोपाळ
- स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणते शहर भारतातले सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले?
अ) इंफाळ ब) भुवनेश्वर क) इंदूर ड) लखनौ
- प्रधानमंत्री विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता सल्लागार परिषदेकडून नऊ राष्ट्रीय मोहिमांचा शुभारंभ करण्यात आला. खालील कोणती मोहीम त्या नऊ मोहिमांपैकी एक नाही?
अ) आर्टिफिशियल इंटेलिजंट ब) क्वांटम फ्रंटियर
क) इलेक्ट्रॉनिक वेस्ट मॅनेजमेंट ड) इलेक्ट्रिक व्हेइकल्स
- कोणता दिवस ‘जनऔषधी दिन’ म्हणून साजरा केला जातो?
अ) १२ मार्च ब) ७ मार्च क) २१ मार्च ड) २१ डिसेंबर