स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
मंगळवार, 11 जून 2019
क्विझ
उत्तरे : १) ड २) क ३) ब ४) क ५) अ ६) ड ७) अ ८) क ९) अ १०) क ११) ब १२) अ १३) ब १४) अ १५) अ १६) क १७) ड १८) अ १९) क
- नायट्रोजन सामग्री वाढवण्यासाठी दूध उत्पादनांमध्ये पुढीलपैकी कोणता रासायनिक पदार्थ मिसळला जातो?
अ) हायड्रोजन पेरोक्साइड
ब) बेन्झोईक ॲसिड
क) सेलिसिलिक ॲसिड
ड) मेलामाइन
- खालीलपैकी कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?
अ) अमेरिका ब) जपान क) चीन ड) पाकिस्तान
- कोणत्या दक्षिण आशियायी देशाने चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घातली?
अ) भारत ब) श्रीलंका क) बाली ड) सुमात्रा
- कोणत्या राज्य सरकारने (राज्य वेतन दुरुस्ती समिती २०१७ च्या शिफारशीनुसार) ८० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनात वाढ करण्याची घोषणा केली?
अ) हरियाना ब) मध्यप्रदेश क) महाराष्ट्र ड) कर्नाटक
- कोणत्या देशाने भारताला बौद्धिक संपदा (IP) संदर्भातल्या ‘प्रायॉरिटी वॉच लिस्ट’ला सूचित ठेवले आहे?
अ) अमेरिका ब) रशिया क) जपान ड) पाकिस्तान
- भारताच्या किनारपट्टीवरील कोणते राज्य फणी चक्रीवादळामुळे सर्वाधिक गंभीर प्रभावित झाले?
अ) गोवा ब) महाराष्ट्र क) केरळ ड) तमिळनाडू
- ISIS शी संबंधित कोणत्या संस्थेवर श्रीलंकेच्या सरकारने बंदी घातली आहे?
अ) नॅशनल थौहीद जमात ब) नॅशनल मुस्लिम लीग
क) जमाते इस्लामी ड) जमात-उल-दवा
- कोणत्या भारतीय संशोधन संस्थेने भारतातून २०३०पर्यंत मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ‘मलेरिया निर्मूलन संशोधन संघ (MERA) भारत’ तयार केला?
अ) अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था
ब) राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था
क) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
ड) भारतीय वैद्यकीय परिषद
- कोणत्या देशाद्वारे त्याची काफला प्रणाली समाप्त केली जाणार आहे?
अ) कतार ब) इंडोनेशिया क) इजिप्त ड) जपान
- कोणत्या आर्थिक संघटनेने दहशतवाद विरोधी प्रयत्नांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर (UN) शिष्टाचारासंबंधी दस्तऐवजावर स्वाक्षरी केली?
अ) गल्फ कोऑपरेशन कौंसिल
ब) साउथ आफ्रिकन डेव्हलपमेंट कम्युनिटी
क) युरोपीय संघ
ड) ब्रिटन
- जगातला सर्वांत लठ्ठ आणि वजनदार पोपट कोणता आहे?
अ) कॉकटेल ब) काकापो क) पिग्मी ड) आशियायी सीटासिन
- UN-हॅबिटॅट या संघटनेचा सुरक्षित शहरे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
अ) वर्ष १९९६ ब) वर्ष १९९९ क) वर्ष २००६ ड) वर्ष २००९
- कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली?
अ) दीपक भंडारीलाल ब) अभय श्रीनिवास ओका
क) पी. एस. ठाकूर ड) दिनेश माहेश्वरी
- कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर एवढ्या निधीचे ‘बेल आउट’ पॅकेज देण्यास सहमती दर्शविली?
अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
ब) जागतिक बॅंक
क) आशियायी विकास बॅंक
ड) आशियायी पायाभूत व गुंतवणूक बॅंक
- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
अ) ११ मे ब) १२ मे क) १३ मे ड) १४ मे
- कोणत्या देशाने ‘टाइप ०52D’ या गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर युद्धनौकेचे जलावतरण केले?
अ) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
ब) भारत
क) चीन
ड) रशिया
- कोणत्या शहरात संयुक्त राष्ट्रसंघाची ‘महासागर परिषद २०२०’ आयोजित केली जाणार आहे?
अ) दिल्ली ब) वॉशिंग्टन क) पॅरिस ड) लिस्बन
- कोणत्या पुरुष टेनिसपटूने ‘माद्रिद ओपन २०१९’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावले?
अ) नोव्हाक जोकोविच ब) राफेल नदाल
क) रॉजर फेडरर ड) स्टेफनोस त्सिटसीपास
- अलीकडेच निधन झालेल्या ‘बिरहा सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लोकगायकाचे नाव काय आहे?
अ) अर्पन दास मित्रा ब) अजय कुमार
क) हिरालाल यादव ड) शकुंतल सिन्हा