स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 17 जून 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) क २) ड ३) ब ४) अ ५) ब ६) क ७) ड ८) ब ९) ड १०) अ ११) ड १२) क १३) ड १४) क १५) ब १६) ब १७ ) ब १८) ड
- भारतीय लष्कर कोणत्या संकल्पनेखाली २०१९ हे वर्ष साजरे करीत आहे?
अ. नेशन फर्स्ट ब. मार्टर्स ऑफ इंडिया
क. इयर ऑफ नेक्स्ट ऑफ किन ड. नो वन कॅन स्टॉप अस
- कोणत्या संघाने २०१९ च्या इंडियन प्रिमिअर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले?
अ. चेन्नई सुपरकिंग्ज ब. सनरायझर्स हैदराबाद
क. कोलकता नाईट रायडर्स ड. मुंबई इंडियन्स
- कोणत्या शहरात WTOच्या नेतृत्वातल्या विकसनशील देशांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन केले गेले?
अ. बीजिंग ब. दिल्ली क. जपान ड. अम्मान
- लष्करअळी ही एक धोकादायक कीड आहे, जी ..... प्रभावित करते.
अ. पिकांना ब. सागरी अन्नाला
क. मानवी आरोग्याला ड. गुराढोरांच्या आरोग्याला
- जयपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या महिलांच्या क्रिकेटसाठी समर्पित असलेल्या जगातल्या पहिल्या नियतकालिक पत्रिकेचे नाव काय आहे?
अ. क्रिकवॉम ब. क्रिकझोन
क. क्रिकेट विमेन ड. यापैकी नाही
- कोणाला २०१९ चा मॅककेन इन्स्टिट्यूट पुरस्कार दिला गेला?
अ. रोमिला थापर ब. दीपंकर गुप्ता
क. छाया शर्मा ड. भिकू पारेख
- कोणत्या भारतीय संस्थेकडून ’MANAV: ह्यूमन ॲटलास इनिशिएटिव्ह’ नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला?
अ. इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी
ब. नीती आयोग
क. कोलकता वैद्यकीय आणि शारीरिक संस्था
ड. जैवतंत्रज्ञान विभाग
- कोणत्या देशांनी वादात असलेल्या दक्षिण चीन समुद्रात चाललेल्या ‘ग्रुप सेल’ या नौदलांच्या सरावात भाग घेतला?
अ. अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया
ब. जपान, फिलिपिन्स, भारत
क. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया
ड. भारत, रशिया, जपान
- कोणत्या जागतिक संस्थेचा कन्व्हेंशन ऑन मायग्रेटरी स्पेसीज (CMS) हा एक भाग आहे?
अ. वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर
ब. ग्रीनपीस
क. ग्लोबल एन्व्हायर्न्मेंट फॅसिलिटी
ड. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम
- कोणत्या देशाकडून भारतीय हवाई दलाने ‘अपाचे’ कंपनीचे पहिले लढाऊ हेलिकॉप्टर घेतले?
अ. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ब. रशिया
क. ब्रिटन ड. इस्राईल
- कोणाला २०१९ मध्ये ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत लोक मानले गेले आहे?
अ. लक्ष्मी मित्तल
ब. महम्मद बिन इस्सा अल जबार ॲण्ड फॅमिली
क. जॉन फ्रेड्रिक्सन
ड. हिंदुजा बंधू
- कोणत्या तारखेला २०१९ चा ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ पाळण्यात आला?
अ. १२ मे ब. १० मे क. ११ मे ड. १३ मे
- शेंगदाणे हे कोणत्या आम्ल तत्त्वाचे स्रोत आहे?
अ. ओलेइक ॲसिड ब. लिनोलेइक ॲसिड
क. पाल्मेटिक ॲसिड ड. वरील सर्व
- भारतीय नौदल कोणत्या देशाबरोबर गुप्त रूपात केल्या जाणाऱ्या वार्तेसाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करणार?
अ. इस्राईल ब. सौदी अरेबिया
क. ऑस्ट्रेलिया ड. ब्रिटन
- नासाची २०२१ मध्ये पाठवली जाणारी DART ही अंतराळ मोहीम कोणत्या उद्देशाने वापरली जाईल?
अ. सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती समजून घेणे
ब. लघू-चंद्र नष्ट करणे
क. मंगळ ग्रहाचे वातावरण तपासणे
ड. यापैकी नाही
- थ्रिसूर पूरम हा भारताच्या कोणत्या राज्यातला सर्वांत मोठा सण आहे?
अ. महाराष्ट्र ब. केरळ क. तमिळनाडू ड. आंध्रप्रदेश
- कोणत्या आशियायी देशात २०१९ च्या मे महिन्यात ‘मॅंकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले?
अ. चीन ब. सिंगापूर क. भारत ड. जपान
- भारताच्या पहिल्या फिनटेक स्टार्टअप उद्योगाच्या मोबाईल ॲपने २०१९ सालाच्या मे महिन्यात नवीन ॲपसह व्यापारी सेवांमध्ये प्रवेश केला. त्या मोबाईल ॲपचे नाव ओळखा.
अ. भीम ब. इंड पे क. यूपीआय ड. भारत पे