स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 24 जून 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) ड ३) क ४) ड ५) अ ६) ड ७) क ८) ड ९) अ १०) ब ११) क
१२) ड १३) ब १४) अ १५) अ १६) अ १७) क १८) ब
- कोणाला भारतीय नौदलाचे २४ वे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले?
अ. सुनील लांबा ब. करमबीर सिंग
क. गुरू शुक्ला ड. महिंद्र सिंग शेखावत
- भारतीय मूळ असलेल्या कोणत्या व्यक्तीला ‘UN महिला’ या जागतिक संघटनेच्या उप-कार्यकारी संचालकपदी नेमण्यात आले आहे?
अ. रघुराम राजन ब. पद्मश्री वॉरियर
क. गार्गी घोष ड. अनिता भाटिया
- संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने कोणत्या देशावर शस्त्रबंदी आणि प्रतिबंध लादण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली?
अ. दक्षिण आफ्रिका ब. नायजेरिया
क. दक्षिण सुदान ड. म्यानमार
- ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९’ साठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख कोण होते?
अ. सुनील आचार्य ब. निर्मला सीतारमन
क. प्रकाश जावडेकर ड. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन
- कोणत्या देशाने व्हिसासाठी अर्ज करताना सोशल मीडियाच्या व्यासपीठांवरील खात्याची माहिती पुरविण्याची अट अनिवार्य केली?
अ. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ब. जर्मनी
क. भारत ड. चीन
- सन २०१९ मध्ये नवीन सरकारच्या अंतर्गत नवीन मंत्रिमंडळासंबंधी कोणती जोडी चुकीची आहे?
अ. गृहमंत्री - अमित शहा
ब. संरक्षण मंत्री - राजनाथ सिंग
क. कार्मिक, लोक तक्रार व निवृत्तिवेतन मंत्री - नरेंद्र मोदी
ड. अर्थमंत्री - पियुष गोयल
- बॅंकॉकमध्ये ३१ मे रोजी हिंद-प्रशांत क्षेत्रासंदर्भात नियमितपणे सल्लामसलत करण्याची चार देशांनी वचनबद्धता दर्शवली. ते चार देश कोणते आहेत?
अ. चीन, जपान, ब्रिटन आणि भारत
ब. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ आणि भारत
क. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत
ड. ब्रिटन, चीन, जपान आणि भारत
- आयएएफच्या ‘गोल्डन ॲरोज -१७ स्क्वाड्रन’ या तुकडीत पहिले राफेल लढाऊ विमान सामील केले जाणार आहे. राफेलसाठी भारताने कोणत्या देशाच्या सरकारसोबत करार केला आहे?
अ. अमेरिका ब. ब्रिटन क. रशिया ड. फ्रान्स
- कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने ‘तंदुरुस्त मिशन’ अंतर्गत अन्नपदार्थांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे?
अ. पंजाब ब. दिल्ली क. महाराष्ट्र ड. गुजरात
- सन २०१९ च्या जागतिक तंबाखू बंदी दिनाची संकल्पना काय होती?
अ. टोबॅको - ए थ्रेट टू डेव्हलपमेंट ब. टोबॅको अँड लंग हेल्थ
क. टोबॅको ब्रेक्स हार्ट्स ड. टोबॅको किल्स, डोन्ट बी डूप्ड
- कोणती भारतीय वास्तुकला ‘२०१९ वर्ल्ड आर्किटेक्चर न्यूज’च्या यादीत नोंदवली गेली आहे?
अ. लोटस टेम्पल
ब. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
क. स्टॅच्यू ऑफ युनिटी
ड. जवाहर कला केंद्र
- श्रीलंकेने कोणत्या देशाबरोबर कोलंबो बंदरावर ईस्ट कंटेनर टर्मिनल (ECT) संयुक्तपणे विकसित करण्यासाठी करार केला?
अ. भारत ब. जपान क. चीन ड. (अ) आणि (ब)
- आकाश क्षेपणास्त्र हे ...... आहे?
अ. रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र
ब. पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
क. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र
ड. हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र
- नासाचा ‘आर्टेमिस’ कार्यक्रम ही पुढची .... मोहीम आहे.
अ. चंद्र ब. मंगळ क. अल्टिमा थुले ड. बुध
- अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ कोणी घेतली?
अ. पेमा खांडू ब. निनाँग एरिंग
क. किरेन रिजिजू ड. ओम शंकर
- पुढीलपैकी कोणता दिवस वर्ल्ड हंगर डे २०१९ म्हणून साजरा केला गेला?
अ. २८ मे ब. ३० मे क. ३१ मे ड. १ जून
- विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही एक ..... आहे.
अ. नियामक मंडळ ब. घटनात्मक मंडळ
क. वैधानिक मंडळ ड. अर्ध-न्यायिक मंडळ
- आरोग्यविषयक समस्यांमुळे कोणत्या माजी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही पद घेण्यास नाकारले आहे?
अ. पियुष गोयल ब. अरुण जेटली
क. सुषमा स्वराज ड. नितीन गडकरी