स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 8 जुलै 2019

क्विझ

क्विझचे उत्तर :
१. ड  २. अ   ३. अ   ४. ब   ५. अ   ६. क   ७. ड.   ८. क  ९. ड   १०. अ  ११. ब
१२. ड    १३. अ   १४. क   १५. ड   १६.  अ   १७. ब   १८. ब

 1. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
  अ) स्टीव्ह रॉजर        ब) जेफ हॉकिन्स  
  क) अँड्रयू हेल     ड) स्कॉट मॉरिसन
   
 2. कोणत्या समुदायाची डोक्‍यावर ‘किपाह’ टोपी घालण्याची परंपरा आहे?
  अ) यहुदी     ब) ख्रिश्‍चन     क) मुसलमान     ड) बौद्ध
   
 3. सुपरकंडक्‍टिव्हिटी या संज्ञेची व्याख्या काय आहे?
  अ) विद्युत प्रवाहाला रोखणारा पदार्थांचा रेझिस्टंस शून्य असतो.
  ब) जेव्हा विद्युत-भारीत कण मुक्त असतात.
  क) जेव्हा विद्युत्‌ प्रवाह गोठविलेल्या पाण्यामधून सोडला जातो.
  ड) यापैकी नाही
   
 4. नेमबाजीमध्ये ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली भारताची सातवी खेळाडू कोण आहे?
  अ) जितू राय    ब) मनू भाकर
  क) अंजली भागवत    ड) विजया कुमार
   
 5. कोणत्या शहरात प्रथम ‘संयुक्त राष्ट्रसंघ-अधिवास सभा २०१९’ पार पडली?
  अ) नैरोबी       ब) जिनेव्हा        क) न्यूयॉर्क     ड) पॅरिस
   
 6. ‘राष्ट्रीय SC/ST हब’ हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे?
  अ) अर्थ मंत्रालय    
  ब) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
  क) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय
  ड) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
   
 7. कोणत्या सरकारी योजनेच्या अंतर्गत पाच किलोग्रॅम वजनी एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार?
  अ) उज्ज्वला डिसकॉम ॲश्‍युरन्स योजना
  ब) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मोहीम
  क) अटल ज्योती योजना
  ड) प्रधान मंत्री उज्ज्वला योजना
   
 8. ‘मिस इंडिया २०१९’ या स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?
  अ) शिवानी जाधव    ब) श्रेया शंकर
  क) सुमन राव           ड) अनामिका कश्‍यप
   
 9. संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
  अ) न्यूयॉर्क      ब) व्हिएना    क) काठमांडू      ड) जिनिव्हा
   
 10. भारत सरकार कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची स्थापना करणार आहे?
  अ) नवी दिल्ली        ब) अहमदाबाद     
  क) चेन्नई               ड) मुंबई
   
 11. सतराव्या लोकसभा अधिवेशनाचे प्रथम सत्र कोणत्या तारखेपासून सुरू झाले?
  अ) १५ जून     ब) १७ जून     क)१८ जून    ड) १९ जून
   
 12. UNCTADच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल २०१९’ नुसार, थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) एक स्रोत म्हणून असलेल्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
  अ) पाचवा     ब) सातवा      क) नववा     ड) दहावा
   
 13. वॉलमार्ट, टार्गेट कॉर्प सहित ६०० हून अधिक कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्या देशाबरोबर सुरू असलेले व्यापार युद्ध संपुष्टात आणण्याचा आग्रह केला?
  अ) चीन     ब) भारत     क) कॅनडा       ड) रशिया
   
 14. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी जगातले सर्वांत उंचीवरचे हवामान केंद्र कुठे उभारले आहे?
  अ) तिबेट     ब) उत्तर ध्रुव     क) एव्हरेस्ट     ड) रॉकी पर्वत
   
 15. इस्रोच्या ‘चंद्रयान-२’ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्त्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे?
  अ) रितू करिधल          ब) मुथैय्या वनिथा
  क) सुनीता कुमारी        ड) अ आणि ब
   
 16. कोणत्या भारतीय शहरात ‘किम्बर्ले प्रोसेस’ संदर्भात आंतरसत्रीय बैठक आयोजित करण्यात आली?
  अ) मुंबई             ब) कोलकता
  क) रायपूर           ड) अहमदाबाद
   
 17. ‘किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) कोणत्या उद्योगाशी     संबंधित आहे?
  अ) कोळसा व्यापार                  ब) हिऱ्यांचा व्यापार
  क) सौर पटलांचे प्रमाणीकरण     ड) जैवतंत्रज्ञान
   
 18. नासाची कोणती अंतराळ दुर्बीण ३० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे?
  अ) हबल          ब) स्पिट्‌झर
  क) मुनलाइट    ड) रॉजर

संबंधित बातम्या