स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 26 ऑगस्ट 2019
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब २) ड ३) अ ४) क ५) ड ६) क ७) अ ८) ब ९) क १०) क
११) अ १२) ब १३) ब १४) अ १५) ब १६) ब
- पाच जुलै २०१९ रोजी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केल्याप्रमाणे, २८ जून २०१९ रोजी परकीय चलन साठ्यात १.२६२ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडून त्याने .........................हा नवा उच्चांक गाठला आहे.
अ) ३२७.६७८ अब्ज अमेरिकन डॉलर
ब) ४२७.६७८ अब्ज अमेरिकन डॉलर
क) ५२७.६७८ अब्ज अमेरिकन डॉलर
ड) ६२७.६७८ अब्ज अमेरिकन डॉलर
- कोणती संस्था वा मंडळ गृहनिर्माण वित्त संस्थांची नवी नियामक संस्था असणार आहे आणि ती नॅशनल हाउसिंग बॅंकेची जागा घेणार आहे?
अ) हाउसिंग एजन्सी ऑफ इंडिया
ब) एचडीएफसी बॅंक
क) चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ हाउसिंग
ड) भारतीय रिझर्व्ह बॅंक
- जावेद मियादादचा ४३७ धावांचा विक्रम मोडून १९९२ मध्ये एकाच विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू कोण?
अ) बाबर आझाम ब) शोएब मलिक
क) साद अली ड) हाशीम महम्मद आमला
- कोणत्या व्यक्तीला ब्रिटनच्या ‘इंडियन वुमन ऑफ इन्फ्लुअन्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
अ) चंदा कोचर ब) विनिता बाली
क) प्रिया प्रियदर्शनी जैन ड) नीता अंबानी
- सीमा सुरक्षा दलाचे (BSF) पुढील महासंचालक (DG) म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
अ) रजनीकांत मिश्रा ब) के. के. शर्मा
क) डी. के. पाठक ड) व्ही. के. जोहरी
- ‘अखिल भारतीय व्याघ्र गणना २०१८’च्या चौथ्या फेरीनुसार, २०१८ मध्ये भारतातल्या वाघांची संख्या वाढून ती ........... वर पोचली आहे.
अ) १४०० ब) २८०० क) २९६७ ड) २९९८
- टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत एक हजार धावा आणि गोलंदाजीत १०० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू (पुरुष वा महिला) कोण?
अ) एलिस पेरी ब) मेग लॅनिंग
क) ॲशली गार्डनर ड) एमी जोन्स
- कोणत्या भारतीय शहराचा मोव्हिंगा कंपनीच्या ‘२०१९ इंटरनॅशनल मुव्हिंग प्राइस इंडेक्स’ या यादीत स्थलांतरण करण्यासाठी जगातले सर्वाधिक स्वस्त शहर म्हणून समावेश करण्यात आला?
अ) मुंबई ब) दिल्ली क) चेन्नई ड) कोलकाता
- कोणत्या मेसेंजर कंपनीने महिला उद्योजकता मंच (WEP) याच्या अखत्यारीत भारतातल्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाबरोबर भागीदारी केली?
अ) स्नॅप चॅट ब) फेसबुक क) व्हॉट्सॲप ड) टिकटॉक
- भारताचा राष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रायोजक म्हणून कोणी ऑप्पो इंडिया याला बदलले?
अ) विवो ब) रेडमी क) बायजु ड) स्टार
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच एका ‘बायोमेकॅनिक्स लॅब’ला मान्यता दिली. ती कोणत्या शहरात आहे?
अ) लाहोर ब) इस्लामाबाद
क) शारजाह ड) रावळपिंडी
- कोणत्या बँकेने त्रिपुरा राज्यातल्या वीजनिर्मिती प्रकल्पाची क्षमता आणि वितरण क्षमता वाढविण्यासाठी निधी मंजूर केला?
अ) भारतीय रिझर्व्ह बँक ब) आशियायी विकास बँक
क) जागतिक बँक ड) भारतीय स्टेट बँक
- ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक २०१९’ यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?
अ) ५० वा ब) ५२ वा क) ५४ वा ड) ५७ वा
- श्रीलंकेच्या कोणत्या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली?
अ) नुवान कुलसेखरा ब) दिलहारा फर्नांडो
क) अजंता मेंडीस ड) अँजेला मॅथ्यूज
- ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर कोणाची निवड झाली आहे?
अ) थेरेसा मे ब) बोरीस जॉन्सन
क) डेव्हिड कॅमेरॉन ड) जेरेमी हंट
- भारताच्या जियोसिंक्रोनस सॅटलाइट लाँच व्हेईकल ............. याने ‘चंद्रयान-२’ अंतराळयान यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत सोडले गेले.
अ) GSLV MkIII-M2 ब) GSLV MkIII-M1
क) GSLV MkII-M1 ड) GSLV MkII-M2