स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
गुरुवार, 23 जानेवारी 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझचे उत्तर :
 १) ब   २) क  ३) ड   ४) अ   ५) ब  ६) क   ७) ब   ८) ड   ९) अ   १०) अ  ११) क १२) ब   १३) क   १४) ड   १५) क   १६) क   १७) ब   १८) अ

 1. नुकतेच जाहीर झालेले ‘अर्थशॉट पारितोषिक’.....................या विषयाशी संबंधित आहे.
  अ) दहशतवाद निर्मूलन    ब) हवामानातील बदल
  क) जागतिक अर्थकारण    ड) क्रिप्टोकरन्सी
   
 2. धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’...................राज्यामध्ये आहे.
  अ) मेघालय    ब) आसाम
  क) अरुणाचल प्रदेश    ड) त्रिपुरा
   
 3. नीती आयोगाच्या ‘शाश्‍वत विकास ध्येये निर्देशांक’मध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
  अ) महाराष्ट्र    ब) हिमाचल प्रदेश
  क) तामिळनाडू    ड) केरळ
   
 4. दुसरी ‘तेजस’ रेल्वे .....................या शहरांच्या दरम्यान धावणार आहे.
  अ) मुंबई-अहमदाबाद    ब) दिल्ली-जयपूर
  क) अहमदाबाद-दिल्ली    ड) मुंबई-कोलकाता
   
 5. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट २०१९’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात.....................वाढ झाली आहे.
  अ) ७७ चौ. किमी    ब) ५४ चौ. किमी
  क) २१२ चौ. किमी    ड) १७७ चौ. किमी
   
 6. ताज्या ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
  अ) ओडिशा    ब) तामिळनाडू    क) कर्नाटक     ड) आसाम
   
 7. नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ .....................यासाठी आहे.
  अ) हरवलेली बालके    ब) हरवलेले मोबाइल
  क) जनगणना करणे    ड) पशुधन मोजणी
   
 8. अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणाऱ्या महिलेचे नाव काय?
  अ) पेगी व्हीटसन    ब) सुनीता विल्यम्स
  क) अ‍ॅन मॅक्लेन    ड) क्रिस्टिना कोच
   
 9. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाइन लिलाव करण्यासाठी.....................व्यासपीठाचे उद्‍घाटन केले.
  अ) eBक्रय    ब) ईबँक    क) ईबॅकरे    ड) ईबीड
   
 10. ‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे?
  अ) CSIR-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था
  ब) CSIR-केंद्रीय औषधी संशोधन संस्था
  क) भारतीय एकात्मिक औषधी संस्था
  ड) तेजपूर विद्यापीठ
   
 11. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच ३.०७ अब्ज डॉलर्सच्या निधीसह ..................... यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे.
  अ) शांतता प्रक्रिया    
  ब) ज्ञान निर्मिती
  क) युद्ध परिस्थितीतल्या गुन्ह्यांचा तपास    
  ड) मानवतावादी मदत 
   
 12. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात खाली दिलेल्यांपैकी कोणता पहिला जागतिक करार झालेला आहे?
  अ) मॉस्को करार    ब) बुडापेस्ट करार
  क) पालेर्मो करार    ड) रोम करार
   
 13. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व मोठ्या सहकारी बँकांना .....................रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले.
  अ) १ कोटी    ब) ३ कोटी     क) ५ कोटी      ड) ७ कोटी
   
 14.  .....................राज्यातल्या प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवास आरंभ झाला.
  अ) झारखंड    ब) राजस्थान
  क) छत्तीसगड    ड) मध्यप्रदेश
   
 15. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गठित केलेल्या ‘आर्थिक सांख्यिकी’विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे?
  अ) अरविंद पानगरिया    ब) बिबेक देबरॉय
  क) प्रणब सेन    ड) रजनीश कुमार
   
 16. .....................यांच्यावतीने ‘कवींची राष्ट्रीय परिषद २०२०’ आयोजित केली गेली.
  अ) दूरदर्शन    ब) साहित्य आजतक
  क) ऑल इंडिया रेडिओ    ड) द पोएट्री सोसायटी
   
 17. .....................या देशाचा ‘लाँग मार्च-५’ प्रक्षेपक विंचिंग अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आला.
  अ) जपान    ब) चीन
  क) उत्तर कोरिया    ड) दक्षिण कोरिया
   
 18. गुगल सर्च इंजिनवर २०१९ मध्ये सर्वाधिक शोधले गेलेले उद्योगपती कोण आहेत?
  अ) रतन टाटा        ब) आनंद महिंद्रा    
  क) गौतम अदानी    ड) अझीम प्रेमजी

संबंधित बातम्या