स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020
क्विझ
क्विझचे उत्तर : १) ड २) ब ३) ब ४) ड ५) क ६) ब ७) अ ८) ब ९) अ १०) ब ११) अ १२) ड १३) अ १४) क १५) अ १६) ब १७) ड १८) ब
- मादागास्करमध्ये आपत्ती निवारणात मदतीचा हात देण्यासाठी भारतीय नौदल ‘ऑपरेशन .......................’ राबवत आहे.
अ) निस्तार ब) विस्तार
क) चॉकलेट ड) व्हॅनिला
- कोणत्या देशाने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी ५० पेन्स मूल्य असलेले नवीन नाणे प्रसिद्ध केले?
अ) स्कॉटलंड ब) ब्रिटन
क) आयर्लंड ड) ग्रीस
- कोणत्या शहरात ‘भारत-ब्राझील व्यवसाय मंचा’ची बैठक आयोजित केली गेली
अ) गुरुग्राम ब) दिल्ली
क) नोएडा ड) प्रयाग
- कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ सुरू केले?
अ) महाराष्ट्र ब) बिहार
क) केरळ ड) ओडिशा
- कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधानपरिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील ठराव संमत केला?
अ) तेलंगणा ब) मध्यप्रदेश
क) आंध्रप्रदेश ड) राजस्थान
- कोणत्या शहरात पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते ‘भुवन पंचायत V3’ या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन झाले?
अ) भुवनेश्वर ब) बंगळुरू
क) रायपूर ड) गांधीनगर
- भारतीय बँक संघा(IBA)चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
अ) सुनील मेहता ब) रजनीश कपूर
क) व्ही. जी. मल्होत्रा ड) डॉ. स्वामिनाथन
- ‘हरित रत्न पुरस्कार २०१९’ कोणाला देण्यात आला आहे?
अ) ए. आर. पाठक ब) एन. कुमार
क) पी. व्ही. पटेल ड) डी. बी. सक्सेना
- कोणत्या ठिकाणी पाण्याखालून धावणारी देशातली पहिली मेट्रो सेवा उभारली जाणार आहे?
अ) कोलकाता ब) बंगळुरू
क) पटणा ड) मुंबई
- तरनजित सिंग संधू यांची .......................या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अ) ब्रिटन ब) अमेरिका
क) जर्मनी ड) मलेशिया
- पंतप्रधान मार्जन सारेक यांनी पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत?
अ) स्लोव्हेनिया ब) क्रोयेशिया
क) सर्बिया ड) एस्तोनिया
- ओपो (OPPO) या कंपनीने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भागीदारीने संशोधन करण्यासाठी कोणत्या आयआयटी संस्थेबरोबर सामंजस्य करार केला?
अ) आयआयटी दिल्ली ब) आयआयटी मद्रास
क) आयआयटी मुंबई ड) आयआयटी हैदराबाद
- कोणत्या राज्यात ‘नमामी गंगे’ अभियानाअंतर्गत पाच दिवसांची ‘गंगा यात्रा’ सुरू झाली?
अ) उत्तरप्रदेश ब) उत्तराखंड
क) बिहार ड) पश्चिम बंगाल
- कोणत्या राज्यात ‘इनोव्हेशन फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली?
अ) महाराष्ट्र ब) मेघालय
क) अरुणाचल प्रदेश ड) गुजरात
- कोणत्या व्यक्तीला ‘इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी’ (IFIE) यांच्यावतीने २०१९ साठीचा ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार देण्यात आला?
अ) बिरेंदर सिंग योगी ब) एम. वेंकय्या नायडू
क) हेमंत सोरेन ड) शिल्पा शेट्टी - कोणत्या राज्य सरकारने ‘शिवभोजन’ योजना लागू केली?
अ) गुजरात ब) महाराष्ट्र
क) केरळ ड) कर्नाटक
- कोणता देश नागरिकांना ई-पारपत्र (पासपोर्ट) सुविधा प्रदान करणारा दक्षिण-आशिया प्रदेशातला पहिला देश ठरला?
अ) अफगाणिस्तान ब) भारत
क) श्रीलंका ड) बांगलादेश
- भारत सरकारने कोरोना विषाणूसाठी .......................शहरांमध्ये सर्वकाळासाठी मदत क्रमांक कार्यरत केलेला आहे.
अ) ६ ब) ७ क) ८ ड) ९