स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 9 मार्च 2020

क्विझ
क्विझचे उत्तर :  १) क   २) ब   ३) अ   ४) क   ५) ड   ६) क  ७) अ   ८) ब  ९) अ   १०) ड   
११) अ  १२) क   १३) ड   १४) ब   १५) ब  १६) ड   १७) क

 1. भारतीय विद्यार्थी संसदेकडून कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?
  अ) योगी आदित्यनाथ    ब) अरविंद केजरीवाल
  क) अमरिंदर सिंग          ड) उद्धव ठाकरे
   
 2. सरकारने २२ व्या विधी आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली. तो .................... वर्षांकरिता नियुक्त केला गेला आहे.
  अ) २ वर्षे      ब) ३ वर्षे      क) ४ वर्षे      ड) ५ वर्षे
   
 3. ....................येथे ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद २०२२’ ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
  अ) चंदीगड    ब) नवी दिल्ली
  क) मुंबई        ड) रोहतक
   
 4. ....................राज्यात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबिर’ आयोजित करण्यात आले.
  अ) त्रिपुरा    ब) आसाम     क) सिक्कीम     ड) मणिपूर
   
 5. कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार २०२०’ जिंकला?
  अ) डॉ. ए. जी. के. गोखले    ब) डॉ. आदिती गोवित्रीकर
  क) डॉ. अनिल अग्रवाल       ड) डॉ. नीती कुमार
   
 6. पक्के व्याघ्र प्रकल्पातून ६२९ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प ....................या राज्यात आहे.
  अ) आसाम                ब) मणिपूर
  क) अरुणाचल प्रदेश    ड) कर्नाटक
   
 7. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) मान्यता दिल्यानंतर ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ व्याघ्र प्रकल्प होणार. ‘मलाई महादेश्वर अभयारण्या’ला लागून ....................या राज्यांच्या सीमा आहेत.
  अ) कर्नाटक आणि तामिळनाडू    ब) कर्नाटक आणि केरळ
  क) केरळ आणि तामिळनाडू        ड) कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू
   
 8. शास्त्रज्ञांना....................या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला.
  अ) मणिपूर           ब) मेघालय    
  क) मिझोराम         ड) महाराष्ट्र
   
 9. चौतिसावी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
  अ) डी. गुकेश       ब) अर्जुन एरिगसी
  क) आर्यन चोप्रा    ड) कार्तिक वेंकटरमन
   
 10. कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ‘जागरूकता कार्यक्रम २०२०’ राबवला जात आहे?
  अ) महिला व बाल विकास मंत्रालय    
  ब) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
  क) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
  ड) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय
   
 11. चर्चेत असलेले ‘क्रॅस्पेडोट्रोपिस ग्रेटाथनबर्गे’ हे काय आहे?
  अ) गोगलगायीची नवी प्रजाती       ब) पर्यावरणीय कार्यकर्ता
  क) सस्तन प्राण्याची नवी प्रजाती    ड) जिवाणूची नवी प्रजाती
   
 12. कोणत्या संस्थेने ‘थिरुमती कार्ट अॅप’ विकसित केले?
  अ) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), गोवा
  ब) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), दिल्ली
  क) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), त्रिची, तामिळनाडू
  ड) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), अलाहाबाद
   
 13. ‘जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक’ हा.................... यांचा प्रकल्प आहे.
  १) न्यूक्लिअर थ्रेट इनिशीएटीव्ह (NTI) २) जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी (CHS) ३) इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU)
  दिलेल्यांपैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:
  अ) (१) आणि (२)    ब) (२) आणि (३)
  क) (१) आणि (३)    ड) (१), (२) आणि (३)
   
 14. .................... या शहरात तृतीय चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
  अ) सुरत    ब) अहमदाबाद
  क) नवी दिल्ली    ड) वडोदरा
   
 15. ....................या राज्यात प्रथम ‘भारत-बांगला पर्यटन उत्सव’ आयोजित करण्यात आला.
  अ) पश्चिम बंगाल    ब) त्रिपुरा
  क) आसाम             ड) महाराष्ट्र
   
 16. ‘हेराथ महोत्सव’ हा कोणत्या राज्यातला एक महत्त्वाचा उत्सव आहे?
  अ) मणिपूर    ब) आसाम    क) तेलंगणा    ड) जम्मू व काश्मीर
   
 17. ‘अटल नवकल्पना अभियान’ हा ....................यांचा प्रमुख उपक्रम आहे.
  अ) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
  ब) मनुष्यबळ विकास मंत्रालय
  क) नीती आयोग
  ड) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

संबंधित बातम्या