स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
क्विझ
१. कोणत्या व्यक्तीच्या हस्ते 'ई-ब्लड सर्व्हिसेस' मोबाइल अॅप सुरू करण्यात आले?
अ) राजनाथ सिंग ब) हर्ष वर्धन
क) नरेंद्र मोदी ड) निर्मला सीतारामन
२. ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसेवा दिन’ कधी साजरा केला जातो?
अ) २३ जून ब) २४ जून क) २५ जून ड) २६ जून
३. कोणत्या कंपनीने ‘स्किल्स-बिल्ड रिइग्नाइट’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाबरोबर भागीदारी केली आहे?
अ) अॅमेझॉन ब) इन्फोसिस क) गुगल ड) आयबीएम
४. कोणत्या कंपनीने मुख्यमंत्री दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हरयाणा सरकारबरोबर करार केला?
अ) टाटा स्काय ब) डिश टीव्ही
क) रिलायन्स जिओ ड) एअरटेल
५. कोणत्या देशाने ‘बीदौ उपग्रह प्रणाली’चे प्रक्षेपण पूर्ण केले आहे?
अ) चीन ब) जपान क) मलेशिया ड) भारत
६. कोणत्या संस्थेने ‘जिवाणू पेशी’चे आवरण नष्ट करणारे ‘नॅनोझाइम’ विकसित केले आहे?
अ) भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकी
ब) भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर
क) भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर
ड) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
७. जागतिक बँकेच्या निष्कर्षानुसार, परचेसिंग पॉवर पॅरिटी (PPP) याबाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
अ) तिसरा ब) चौथा क) पाचवा ड) सातवा
८. भारताबाहेरील पहिल्या योग विद्यापीठाचे नाव काय आहे?
अ) योग विद्यालय ब) योग विकास विद्यापीठ
क) योग अभ्यास विद्यापीठ ड) विवेकानंद योग विद्यापीठ
९. रमेश पोखरियाल यांनी उद्घाटन केलेल्या द्वितीय आवृत्तीच्या YUKTI योजनेचे पूर्ण नाव काय आहे?
अ) Young India combating COVID with Knowledge, Technology and Innovation ब) Young India combating COVID with Kindness, Teachings and Inner Satisfaction क) Young India combating COVID with Knowledge Transfer and Innovation
ड) यांपैकी नाही
१०. चीन, जपान आणि तैवान या देशांनी स्वतःचा मालकी हक्क सांगणाऱ्या बेटाला जपानने दिलेले नवीन नाव काय आहे?
अ) टोनोशिरो ब) दिओयू क) ओकिनावा ड) यांपैकी नाही
११. कोणाच्या हस्ते प्रथम ऑनलाइन ‘कान चित्रपट महोत्सव-२०२०’ मधील आभासी ‘इंडिया पॅव्हिलियन’चे उद्घाटन झाले?
अ) अमिताभ बच्चन ब) नरेंद्र मोदी क) प्रकाश जावडेकर ड) हृतिक रोशन
१२. कोणत्या राज्य सरकारने ‘इंदिरा रसोई योजना’ जाहीर केली आहे?
अ) राजस्थान ब) महाराष्ट्र क) केरळ ड) मिझोराम
१३. आंतरराष्ट्रीय संक्रांतीचा उत्सव दिन कधी साजरा केला जातो?
अ) २१ जून ब) २२ जून क) २३ जून ड) २४ जून
१४. कोणाची ‘स्टँडर्ड चार्टर्ड बँक ऑफ इंडिया’चे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली?
अ) राहुल बजाज ब) पीटर सँडस
क) सुनिल कौशल ड) गौरव माहेश्वरी
१५. कोणत्या संस्थेने पहिली आभासी ‘आरोग्यसेवा व वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शनी २०२०' आयोजित केली?
अ) फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री
ब) राष्ट्रीय सॉफ्टवेअर व सेवा कंपनी संघ
क) भारतीय उद्योग संघ
ड) भारतीय गुणवत्ता परिषद
१६. ‘ऑलिंपिक दिन’ कधी साजरा केला जातो?
अ) २१ जून ब) २२ जून क) २३ जून ड) २५ जून
१७. 'लिजेन्ड ऑफ सुहेलदेव : द किंग हू सेव्ह्ड इंडिया' हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले आहे?
अ) दुरजॉय दत्ता ब) प्रीती शेनॉय
क) अमिश त्रिपाठी ड) अनिता देसाई
१८. कोणाची युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’ या संस्थेचे नवे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली?
अ) डॉ. सेतुरामन पंचनाथ ब) झरीन दारूवाला
क) ब्रायन स्टोन ड) एफ. फ्लेमिंग क्रिम
१९. कोणाची ‘भारतीय वित्तीय तंत्रज्ञान व संबंधित सेवा (IFTAS)’ याचे अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली?
अ) डॉ. एन. राजेंद्रन ब) टी. रबी शंकर
क) ए. एस. रामशास्त्री ड) यांपैकी नाही
क्विझचे उत्तर ः
१) ब २) अ ३) ड ४) क ५) अ ६) क ७) अ ८) ड ९) ब १०) ड ११) क
१२) अ १३) ब १४) ड १५) अ १६) क १७) क १८) अ १९) ब