स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
मंगळवार, 21 जुलै 2020

क्विझ -

१. ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा.
अ) ॲमेझोनिया-१
ब) ऑफेक
क) स्रोस-१
ड) एरियल

२. कोणत्या व्यक्तीची ब्रिटन-भारत व्यवसाय परिषद (UKIBC) याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर नेमणूक करण्यात आली?
अ) परमजीत सिंग
ब) जयंत कृष्णा
क) किशोर जयरामन
ड) परम सेठी

३. गोवर रोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य गाठणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्षेत्रातल्या दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशातल्या पहिल्या दोन देशांची नावे ओळखा.
अ) भारत आणि मालदीव
ब) भारत आणि श्रीलंका
क) श्रीलंका आणि मालदीव
ड) भारत आणि म्यानमार

४. गुजरात सरकारने _______ करण्यासाठी पाच सदस्यांचा समावेश असलेल्या आयोगाची स्थापना केली.
अ) अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी
ब) महिलांच्या हक्कासाठी
क) बालकांच्या हक्कासाठी
ड) आदिवासींच्या हक्कासाठी

५. कोणत्या बँकेने जीवन विमा सेवा प्रदान करण्यासाठी बजाज आलियान्स लाइफ इन्शुरन्स या कंपनीबरोबर करार केला?
अ) एचडीएफसी बँक
ब) येस बँक
क) भारतीय स्टेट बँक
ड) करुर वैश्य बँक

६. _________ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२०’ प्रसिद्ध केला आहे.
अ) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस
ब) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
क) सिलिकॉन प्रेस
ड) शिकागो प्रेस

७. मायक्रोसॉफ्ट, _____ यांच्या भागीदारीने १२ महिन्यांमध्ये भारतीय तरुणांना डिजिटल कौशल्य प्रदान करणार आहे.
अ) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)
ब) युवक कल्याण महामंडळ
क) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)
ड) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI)

८. _____ या कंपनीद्वारे कोविड-१९ नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.
अ) NABL लॅब
ब) ट्रूथ लॅब सोल्युशन
क) मायलाब डिस्कव्हरी सोल्युशन्स
ड) कोविड स्टॉप सोल्युशन

९. बळी देण्यासाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांगलादेस सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?
अ) ॲनिमल बाजार
ब) डिजिटल हाट
क) बुक माय मीट
ड) कुर्बानी

१०. कोणत्या देयक बँकेने अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?
अ) इंडिया पोस्ट पेमेंट बँक
ब) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड
क) पेटीएम पेमेंट बँक
ड) एयरटेल पेमेंट बँक

११. _____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.
अ) निर्मला सीतारामन
ब) स्मृती इराणी
क) ममता बॅनर्जी
ड) किरण बेदी

१२. कोणत्या डिजिटल व्यासपीठाने फोनपे या ऑनलाइन देयके कंपनीबरोबर करार केला?
अ) उबर
ब) झोमॅटो
क) स्विगी
ड) ओला

१३. कोणत्या संस्थेने ‘व्हिज्युअल आयडेंटिटी’ हे नवीन वैशिष्ट्य सादर केले?
अ) भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ
ब) भारतीय ऑलिंपिक संघ
क) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ
ड) भारतीय बॅडमिंटन संघ

१४. कोणत्या व्यक्तीने ‘ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रीक्स २०२०’ शर्यत जिंकली?
अ) एल. हॅमिल्टन
ब) सी. लेक्लर्क
क) एल. नॉरिस
ड) वाल्टेरी बोटास

१५. भारताचा ६६ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला?
अ) पृथ्वी गुप्ता
ब) जी. आकाश
क) अमेया ऑडी
ड) गिरीश कौशिक

१६. निधन झालेले अर्ल कॅमेरून हे एक _____ होते.
अ) धावपटू
ब) सर्जन
क) अंतराळवीर
ड) अभिनेता

१७. ______ यासाठी जागतिक बँकेने ४०० दशलक्ष डॉलर इतक्या रकमेच्या ऋण करारावर स्वाक्षरी केली आहे.
अ) वनीकरण
ब) गंगा नदी पुनरुज्जीविकरण
क) सौरऊर्जा निर्मिती
ड) शाश्वत विकास प्रारूप उभारणी

१८. कोणत्या राज्याने ‘नेकारा सन्मान योजना’ लागू केली?
अ) महाराष्ट्र
ब) तामिळनाडू
क) केरळ
ड) कर्नाटक

उत्तर
१. अ
२. ब
३. क
४. ड
५. ड
६. ब
७. क
८. क
९. ब
१०. ब
११. क
१२. ड
१३. ब
१४.  ड
१५. ब
१६. ड
१७. ब
१८. ड 

संबंधित बातम्या