स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. कोणत्या राज्याने ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी २०२० च्या मानांकन यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
अ. ओडिशा
ब. बिहार
क. महाराष्ट्र
ड. गुजरात

२. कोणत्या राज्याने ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कार्यरत केला?
अ. तेलंगणा
ब. आसाम
क. नागालँड
ड. मणिपूर

३. कोणत्या बँकेने लष्करी व निमलष्करी व्यावसायिकांसाठी ‘शौर्य KGC कार्ड’ नामक एक कृषिकर्ज साधन सादर केले?
अ. येस बँक
ब. एचडीएफसी बँक
क. आयसीआयसीआय बँक
ड. कॅनरा बँक

४. कोणत्या राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ओरुणोदोई’ योजना लागू करण्यात आली?
अ. त्रिपुरा
ब. सिक्कीम
क. मिझोराम
ड. आसाम

५. संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या नव्या डिजिटल मंचाचे नाव काय आहे?
अ. प्रेरणा
ब. सृजन
क. सन्मान
ड. संबोधन

६. निधन झालेले रसेल किर्श कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
अ. सिनेमा
ब. लेखक
क. डिजिटल छायाचित्रण
ड. पत्रकारिता

७. कोणत्या अंतराळ संस्थेने भारतीय विज्ञान संस्थेच्या सहकार्याने चंद्रावर विटांसारखी एक संरचना तयार करण्यासाठी एक टिकाऊ प्रक्रिया विकसित केली?
अ. स्पेस-एक्स
ब. नासा
क. ईएसए
ड. इस्रो

८. कोणत्या संस्थेने वैमानिक-रहित विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेबरोबर करार केला?
अ. भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित
ब. भारतीय वायू प्राधिकरण मर्यादित
क. भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित
ड. यापैकी नाही

९. कोणत्या राज्य सरकारने तरुणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी ‘कर्म साथी प्रकल्प’ ही योजना राबविण्यास सुरुवात केली?
अ. पश्‍चिम बंगाल
ब. उत्तरप्रदेश
क. मध्यप्रदेश
ड. राजस्थान

१०. कोणते राज्य सरकार ९२ कोटी रुपयांची ‘स्मार्ट कनेक्ट योजना’ राबवीत आहे?
अ. हरयाणा
ब. राजस्थान
क. पंजाब
ड. गुजरात

११. कोणत्या देशाने अमेरिकेबरोबर F-16 विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली?
अ. दक्षिण कोरिया
ब. तैवान
क. ऑस्ट्रेलिया
ड. स्पेन

१२. कोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेला ‘पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान’ यासाठीचा एक डिजिटल मंच तयार केला?
अ. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी
ब. केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग
क. आयकर अपील न्यायाधिकरण
ड. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ

१३. कोणत्या संस्थेने स्वदेशी ‘AUM (एअर युनिक-मॉनिटरिंग) फोटॉनिक यंत्रणा’ तयार केली?
अ. भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर
ब. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन केंद्र
क. संरक्षण संशोधन व विकास संघटना
ड. भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

१४. कोणत्या राज्याच्या राजकीय गटांकडून संपूर्ण राज्य संविधानाच्या सहावी अनुसूची किंवा ३७१ या कलमाखाली आणले जावे अशी मागणी होत आहे?
अ. अरुणाचल प्रदेश
ब. मिझोराम
क. नागालँड
ड. त्रिपुरा

१५. कोविड-१९ लसीविषयीच्या प्रशासनासंबंधी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
अ. डॉ. हर्ष वर्धन
ब. श्रीपाद नाईक
क. वसंत देसाई
ड. डॉ. व्ही. के. पॉल

१६. ‘अवर ओन्ली होम: ए क्लायमेट अपील टू द वर्ल्ड’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
अ. ए. आर. दासगुप्त
ब. अर्णब जोशी
क. दलाई लामा
ड. व्ही. पी. नाईक

१७. कोणत्या देशाने ‘अ‍ॅरो-२’ नामक लक्ष्यभेदी आंतररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
अ. रशिया
ब. चीन
क. इस्राईल
ड. इराण

१८. कोणत्या अरब देशाने इस्राईलबरोबर केलेल्या अब्राहम कराराला सहमती दिली?
अ. जॉर्डन
ब. संयुक्त अरब अमिराती
क. लेबनॉन
ड. इराक

१९. कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी साहाय्य योजना’ लागू केली?
अ. महाराष्ट्र 
ब. गुजरात
क. मध्यप्रदेश
ड. राजस्थान

उत्तरे
१. अ
२. क
३. ब
४. ड
५. ब
६. क
७. ड
८. अ
९. अ
१०. क
११. ब
१२. ड
१३. ब
१४. अ
१५. ड
१६. क
१७. क
१८. अ
१९. ब

संबंधित बातम्या