स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. कोणत्या देशाला मलेरिया नियंत्रण कार्यक्रमासाठी ११४.२ मेट्रिक टन डीडीटी पदार्थाचा पुरवठा हिंदुस्थान कीटकनाशके मर्यादित (HIL) कंपनीने केला?
अ. झिंबाब्वे
ब. झांबिया
क. नामीबिया
ड. मोझांबिक

२. कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला जातो?
अ. ५ सप्टेंबर
ब. ६ सप्टेंबर
क. ७ सप्टेंबर
ड. ८ सप्टेंबर

३. अटल इनोव्हेशन मिशन (AIM) संस्थेने तळागाळातील लोकांच्या नवोन्मेषाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी कोणत्या माध्यम मंचाबरोबर भागीदारी करार केला?
अ. स्कून्यूज
ब. उडेमी
क. अनअकॅडेमी
ड. लिंक्डइन लर्निंग (लिन्डा)

४. ‘एफ वन इटालियन ग्रँड प्रिक्स २०२०’ शर्यत कोणी जिंकली?
अ. कार्लोस सैन्झ
ब. लेविस हॅमिल्टन
क. पियरे गॅस्ली
ड. लँडो नॉरिस

५. व्हॉट्सअॅप कंपनीने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेबरोबर करार केला?
अ. सायबरऑप्स इन्फोसेक एल.एल.पी.
ब. ईसेक फोर्ट टेक्नॉलॉजीज
क. सायबर पीस फाउंडेशन
ड. सायबरआर्क

६. कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले गांजा औषध प्रकल्प उभारले जाणार?
अ. जम्मू काश्मीर
ब. महाराष्ट्र
क. गुजरात
ड. हिमाचल प्रदेश

७. कोणता देश हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल (HSTDV) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा जगातला चौथा देश ठरला?
अ. जपान
ब. भारत
क. ब्रिटन
ड. चीन

८. कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने जागतिक बँकेबरोबर रस्ते परिवर्तन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८२ दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली?
अ. हिमाचल प्रदेश
ब. जम्मू व काश्मीर
क. अरुणाचल प्रदेश
ड. महाराष्ट्र

९. कोणत्या संघटनेच्यावतीने पहिली ‘आंतरराष्ट्रीय सौर तंत्रज्ञान शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली?
अ. युरोसोलार
ब. सौरऊर्जा उद्योग संघ
क. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा संस्था
ड. आंतरराष्ट्रीय सौर युती

१०.____ या देशाच्या अध्यक्षतेखाली अन्न व कृषी संघटनेची ३५ वी ‘आशिया आणि प्रशांत प्रदेशासाठी क्षेत्रीय परिषद’ पार पडली?
अ. भारत
ब. भूतान
क. नेपाळ
ड. बांगलादेश

११. ‘द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया’ अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत प्रथम स्थानी कोणते राज्य आहे?
अ. कर्नाटक
ब. महाराष्ट्र
क. केरळ
ड. तेलंगणा

१२. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गत वित्तसाहाय्य मिळविण्यासाठी स्टार्टअप उद्योगासाठी उलाढालीची मर्यादा किती आहे?
अ. ५० कोटी रुपये
ब. १०० कोटी रुपये
क. २०० कोटी रुपये
ड. ५०० कोटी रुपये

१३. कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात ‘बॅक टू व्हिलेज’ कार्यक्रमाचा तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे?
अ. लडाख
ब. अरुणाचल प्रदेश
क. आसाम
ड. जम्मू व काश्मीर

१४. कोणत्या देशाबरोबर भारतीय संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तान व द्विपक्षीय सहकार्य तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली?
अ. अमेरिका
ब. इराण
क. रशिया
ड. चीन

१५. इस्रोच्या कोणत्या मोहिमेने पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करणारे पुरावे दिले आहेत?
अ. चंद्रयान २
ब. मार्स ऑर्बिटर मिशन
क. चंद्रयान १
ड. यापैकी नाही

१६. कोणत्या राज्याने राज्यातले हरितक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी ‘आय रखवाली’ नामक मोबाइल अॅप तयार केले?
अ. पंजाब
ब. हरयाणा
क. हिमाचल प्रदेश
ड. महाराष्ट्र

१७. गिझाच्या पिरॅमिडच्या आकारापेक्षा दुप्पट असलेला कोणता लघुग्रह ६ सप्टेंबर २०२० रोजी पृथ्वीच्या जवळून गेला?
अ. 2020 AV2
ब. 465824 2010 FR
क. 2011 ES4
ड. 2020 QR5

१८. रेल्वे पोलीस दलाच्या कोणत्या कर्मचाऱ्‍याला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले?
अ. शैख इम्तियाज अहमद
ब. ए.एस.सी. अनिल कुमार नायर
क. जाहगीर सिंग (मृत)
ड. अशोक कुमार कहार

१९. कोणते राज्य पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूझ जहाज चालविणार आहे?
अ. गोवा
ब. ओडिशा
क. केरळ
ड. पश्चिम बंगाल

२०. कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक मंजूर केले?
अ. केरळ
ब. कर्नाटक
क. आसाम
ड. गुजरात

उत्तरे
१. ब
२. ड
३. अ
४. क
५. क
६. अ
७. ब
८. अ
९. ड
१०. ब
११. क
१२. अ
१३. ड
१४. ब
१५. क
१६. अ
१७. ब
१८. क
१९. ब
२०. क

संबंधित बातम्या