क्विझ
स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ
१. कोणत्या राज्याने नुकतेच ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे?
अ. महाराष्ट्र ब. गुजरात
क. गोवा ड. मध्य प्रदेश
२. केंद्र सरकारने Neutrino Observatory कुठे स्थापन करण्याचे प्रस्थावित केले आहे?
अ. आंध्र प्रदेश ब. केरळ
क. तामिळनाडू ड. कर्नाटक
३. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान कल्याण योजना सुरू केली आहे?
अ. झारखंड ब. मध्यप्रदेश
क. ओडिशा ड. महाराष्ट्र
४. महात्मा गांधी नॅशनल फाउंडेशनतर्फे ‘गांधी पुरस्कार २०२०’ कोणाला देण्यात आला?
अ. जयशंकर मेनन ब. राम नाईक
क. नारायण कुरूप ड. संजय सिंग
५. कोणत्या प्रदेशात ‘झॉम्बी फायर’ नामक अग्नी पाहायला मिळाला?
अ. आर्क्टिक ब. आफ्रिका
क. अंटार्क्टिका ड. दक्षिण अमेरिका
६. कोणत्या देशाची अंतराळ संस्था २०२५ मध्ये पाठविण्यात येणाऱ्या शुक्र मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) सहकार्य करणार आहे?
अ. अमेरिका ब. फ्रान्स
क. जपान ड. चीन
७. कोणत्या शहराजवळ भारतीय तटरक्षक दलाचे ‘ICGS कनकलता बरुआ’ हे गतिमान गस्त जहाज तैनात करण्यात आले आहे?
अ. मुंबई ब. चेन्नई
क. कोलकाता ड. विशाखापट्टणम्
८. कोणती सार्वजनिक बँक, आरबीआय कायद्याच्या अनुसूची-II मधून वगळलेली नाही?
अ. बँक ऑफ महाराष्ट्र
ब. युनायटेड बँक ऑफ इंडिया
क. सिंडिकेट बँक ड. यापैकी कोणतीही नाही
९. कोणत्या संस्थेने ‘टाइम यूज सर्व्हे’ हा अहवाल जाहीर केला?
अ. भारतीय वैद्यकीय परिषद ब. नीती आयोग
क. भारतीय स्पर्धा आयोग
ड. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय
१०. कोणत्या संघटनेने भारतातले त्यांचे कार्यालय बंद केले?
अ. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया
ब. चाईल्ड फंड इंडिया
क. सेन्स इंटरनॅशनल इंडिया
ड. गुंज
११. ‘क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हर’ आजार कशामुळे होतो?
अ. डास ब. झूनोसिस
क. विषाणू ड. दूषित अन्न
१२. कोणते मंत्रालय ‘तृतीयपंथी (अधिकारांचे रक्षण) नियम-२०२०’ याची अंमलबजावणी करीत आहे?
अ. गृह मंत्रालय
ब. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
क. अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
ड. यांपैकी कोणतेच नाही
१३. संयुक्त अरब अमिराती या देशाकडून २०२४ मध्ये चंद्रावर पाठविण्यात येणाऱ्या अंतराळयानाचे नाव काय आहे?
अ. रशीद ब. मकतूम
क. याहसॅट ड. दुबईसॅट-1
१४. भारतीय रिझर्व्ह बँकेने........... चे कामकाज पाहण्याकरिता तीन सदस्य असलेली संचालक समिती नेमली.
अ. करुर वैश्य बँक ब. येस बँक
क. लक्ष्मी विलास बँक ड. अॅक्सिस बँक
१५. कोणत्या धूमकेतूची नोंद प्रथमच फार-अल्ट्राव्हायोलेट ध्रुवीय प्रकाशासह विद्युत-चुंबकीय ऊर्जेच्या उत्सर्जनासाठी करण्यात आली?
अ. वाईल्ड 2 ब. 67पी
क. बोरली ड. हॅली
१६. कोणत्या शहरात ‘सेंटर फॉर डिसअॅबिलिटी स्पोर्ट्स’ उभारले जाणार आहे?
अ. भोपाळ ब. ग्वाल्हेर
क. जयपूर ड. मुंबई
१७. ‘आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन २०२०’ याची संकल्पना काय आहे?
अ. अॅक्सेस ऑफ इनफॉर्मेशन सेव्हिंग लाईव्हज, बिल्डिंग ट्रस्ट,
ब्रिंगिंग होप!
ब. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन
क. पॉवरिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ अॅक्सेस टू इनफॉर्मेशन!
ड. लिव्हिंग नो वन बिहाइंड!
उत्तरे
१.अ
२.क
३.ब
४.ड
५. अ
६. ब
७. क
८. अ
९. ड
१०. अ
११. क
१२. ब
१३. अ
१४. क
१५. ड
१६. ब
१७. अ