स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

- विष्णू फुलेवार
सोमवार, 7 डिसेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. कोणत्या अंतराळ संस्थेने वाढत्या जागतिक समुद्र पातळीवर नजर ठेवण्यासाठी ‘सेंटिनेल-6’ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला?
अ) JAXA
ब) CNSA
क) ISRO
ड) NASA

२. ‘रोरीडोमायसेस फीलोस्टाचीडिस’ कशाची प्रजाती आहे?
अ) बेडूक
ब) मासा
क) गव्हाचे वाण
ड) मशरूम

३. खालीलपैकी कोणत्या बाबीच्या संदर्भात ‘जॉकासौ तंत्रज्ञान’ वापरले जाते?
अ) सांडपाणी, स्वयंपाकघर आणि स्नानासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया
ब) जलविद्युत निर्मिती
क) वृक्षारोपण
ड) औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया

४. ऐंशीव्या ‘अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदे’चे (AIPOC) आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?
अ) दिल्ली
ब) गुजरात
क) कर्नाटक
ड) मध्यप्रदेश

५. भारतातला एकमेव ‘चेरी ब्लॉसम महोत्सव’ कोणत्या शहरात आयोजित केला जातो?
अ) गुवाहाटी
ब) इंफाळ
क) शिलाँग
ड) अगरतळा

६. कोणत्या मंत्रालयाने देशातल्या ‘कट्टरपंथीकरणाची स्थिती’ विषयक संशोधनात्मक अभ्यासाला मान्यता दिली?
अ) विधी व न्याय मंत्रालय
ब) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
क) आदिवासी कल्याण मंत्रालय
ड) गृह मंत्रालय

७. कोणत्या राज्यात सर्वात प्राचीन ज्ञात असलेल्या मानवनिर्मित नॅनो-रचना सापडल्या?
अ) तामिळनाडू
ब) कर्नाटक
क) महाराष्ट्र
ड) गुजरात

८. ‘विलोव वॉर्बलर’ पक्षी प्रथमच भारतात कुठे आढळला?
अ) तामिळनाडू
ब) कर्नाटक
क) केरळ
ड) तेलंगणा

९. ‘SITMEX-20’ नामक सागरी कवायत कुठे आयोजित करण्यात आली?
अ) बंगालचा उपसागर
ब) अंदमान समुद्र
क) हिंद महासागर
ड) अरबी समुद्र

१०. पंधराव्या ‘जी-२० शिखर परिषदे’चा विषय काय होता?
अ) पर्यावरण व ऊर्जा
ब) व्यापार व गुंतवणूक
क) सर्वांसाठी एकविसाव्या शतकाच्या संधी साकारणे
ड) महिला सशक्तीकरण
 
११. कोणत्या योजनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘आवास दिन’ साजरा करतात?
अ) प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण
ब) दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) गृहनिर्माण योजना
क) NTR शहरी गृहनिर्माण योजना
ड) यापैकी नाही

१२. कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?
अ) हिमाचल प्रदेश
ब) उत्तराखंड
क) आसाम
ड) जम्मू काश्मीर

१३. राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी ७२ वा वर्धापनदिन कोणत्या दिवशी साजरा केला?
अ) २१ नोव्हेंबर २०२०
ब) २२ नोव्हेंबर २०२०
क) २३ नोव्हेंबर २०२०
ड) २४ नोव्हेंबर २०२०

१४. कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?
अ) आसाम कराराचे कलम ६
ब) AFSPA कायदा रद्द करणे
क) मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे
ड) राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची अंमलबजावणी

१५. ‘SATAT’ उपक्रम कशाच्या संदर्भात आहे?
अ) सौरऊर्जा निर्मिती
ब) औष्णिक ऊर्जा
क) जलविद्युत निर्मिती
ड) संकुचित जैव-वायू निर्मिती

१६. कोणत्या देशाने ‘APEC शिखर परिषद २०२०’चे आयोजन केले?
अ) चीन
ब) मलेशिया
क) सिंगापूर
ड) जपान

१७. कोणत्या देशासाठी ‘उमंग’ अॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती सादर केलेली नाही?
अ) संयुक्त अरब अमिराती
ब) नेदरलँड
क) न्यूझीलंड
ड) जपान

१८. कोणती संस्था ‘विमानचलन सुरक्षा जागृती सप्ताह २०२०’ (२३-२७ नोव्हेंबर) पाळत आहे?
अ) भारतीय विमानतळ प्राधिकरण
ब) एअर इंडिया
क) भारतीय हवाई दल
ड) यापैकी नाही

१९. लंडनमध्ये ‘२०२० ATP टूर फायनल्स’ ही टेनिस स्पर्धा कोणी जिंकली?
अ) डोमिनिक थीम
ब) डेनिल मेदवेदेव
क) निकोल मेक्टीक
ड) यापैकी नाही

२०. ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती’चे अध्यक्ष कोण आहे?
अ) पंतप्रधान
ब) गृहमंत्री
क) कॅबिनेट सचिव
ड) राष्ट्रपती

उत्तरे
१. ड
२. ड
३. अ
४. ब
५. क
६. ड
७. अ
८. क
९. ब
१०. क
११. अ
१२. ब
१३. ब
१४. क
१५. ड
१६. ब
१७. ड
१८. अ
१९. ब
२०. क

संबंधित बातम्या